भारतीय सैन्यात “मुसलमान रेजिमेंट” नाही, असं कशामुळे?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपल्या भारतीय सेनेत मराठा, जाट, शीख रेजिमेंट आहे, मग मुस्लीम रेजिमेंट का नाही. हा प्रश्न आपल्या सारख्या प्रत्येकाच्याच मनात येत असणार. याच संबंधी एक विडीओ सध्या सोशल मिडीयावर वायरल झाला होता. ज्यात असा दावा करण्यात आला की –

एकेकाळी आपल्या देशात मुस्लीम रेजिमेंट देखील होती. पण मुस्लीम रेजिमेंटच्या २० हजार सैनिकांनी १९६५ च्या युद्धात लढण्यास नकार दिला.

आणि –

त्यामुळे मुस्लीम रेजिमेंटला संपुष्टात आणण्यात आले.

पण हे सत्य आहे का? तर तसं नाहीये. सत्य बरंच वेगळं आहे.

 

muslim-soldier-inmarathi

 

रेजिमेंट हा शब्द रेजिमीन या शब्दापासून तयार झाला आहे. या लॅटिन शब्दाचा अर्थ म्हणजे नियमांची व्यवस्था. रेजिमेंटल सिस्टीम सर्वात आधी इंफेंट्री मध्ये आले. म्हणूनच रेजिमेंट म्हटल की आजही आपल्याला हातात बांधून घेतलेले पायदळ सैन्यच आठवत. इंफेंट्रीमध्ये रेजिमेंट म्हणजे एक असे सैन्य तुकडी ज्यांचा स्वतःचा एक इतिहास आणि स्वतःची एक पद्धत असेल.

प्रत्येक रेजिमेंटचा आपला वेगळा झेंडा, निशाण आणि वर्दी असते. एका रेजिमेंटमध्ये अनेक बटालियन असतात. प्रत्येक बटालियनचा एक नंबर असतो.

 

battle of Saragadhi Inmarathi Feature
Saragarhi: The True Story by KTV

 

भारतात रेजिमेंटची सुरवात इंग्रजांनी केली. त्यासाठी एक थेरी देण्यात आली ज्यानुसार काही समुदायातून येणारे लोकं जास्त लढवय्ये असतात, जसे की, पठाण, कुरेशी, अहिर आणि राजपूत. यांना मार्शल रेस समजण्यात येते. तर इतर समुदायांना नॉन मार्शल रेस म्हटल्या जाते. याप्रकारे क्षेत्र आणि जातीच्या आधारे रेजिमेंट बनल्या.

 

sikh-regiment InMarathi

 

भारत स्वतंत्र झाल्यानंतर ब्रिटीश इंडियन आर्मीचे विभाजन झाले. एक भाग इंडियन आर्मी बनला आणि दुसरा पाकिस्तान आर्मी. मुसलमान सैनिक जास्तकरून उत्तर पश्चिम येथून होते. त्यामुळे ते पाकिस्तानच्या सैन्यात सामील झाले, कारण त्यांचे घर तिथे होते.

म्हणून भारतीय सैन्यात मुस्ललमानांची संख्या कमी राहिली. पण याचा अर्थ असा नाही मुसलमानांना अगदी वेगळं केलं गेलं!

पाकिस्तान विरुद्ध १९६५ मध्ये झालेल्या युद्धात खेमकरणच्या युद्धात ४ ग्रेनेडीयरचे हवालदार अब्दुल हामिद यांना वीरमरण आले. त्यांच्या विरमरणाचा सन्मान म्हणून त्यांना परमवीर चक्र देण्यात आले.

 

Abdul Hameed Inmararhi

 

स्वतंत्र भारतात सेनेने औपचारिकपणे मार्शल रेस थेरी सोडली आहे. इंफेंट्रीमध्ये रेजिमेंट सिस्टीम अजूनही चालत आहे. पण असं नाहीये की रेजिमेंटमध्ये इतर कुठल्या समाजाचे लोकं नाही येऊ शकत.

लढणारे सैनिक हे भलेही एका समाजाने असो तरी त्यांचे ऑफिसर हे कुठल्याही धर्माचे असू शकतात. परमवीर चक्र विजेते मनोज पांडे हे गोरखा नव्हते. तरी कारगिल युद्धात लढताना जेव्हा ते शहीद झाले, तेव्हा ते ११ गोरखा रायफल्सचे अधिकारी होते.

सैन्यात असे म्हटले जाते की, ‘An officer has got the religion of his troops’ म्हणजेच “अधिकाऱ्यांचा कुठलाही धर्म नसतो. त्याच्या सैनिकांची तुकडी हाच त्याचा धर्म असतो”.

 

Indian army praying INMarathi

 

याच बाबतीत लेफ्टनंट कर्नल विरेंदर सिंह म्हणतात की,

मी जाट आहे, पण मी आयुष्यभर शीख रेजिमेंटच्या सैनिकांचं नेतृत्व केलं. माझे जवान माझी जबाबदारी असायचे. ते माझ्या एका सांगण्यावरून जीव द्यायला आणि घ्यायला तयार व्हायचे.

म्हणूनच मी नेहेमी अभिमानाने हे सांगतो की,

I am a proud Sikh of the Sikh Regiment. (मी शीख रेजिमेंटमधील एक शीख आहे, ज्याचा मला अभिमान आहे.)

याचसोबत कुठल्याही बटालियनमध्ये ट्रेड्समॅन आणि क्लर्क हे कुठल्याही जातीचे असू शकतात. इंफेंट्री रेजिमेंटमध्ये वेगवेगळ्या परंपरा असतात. रेजिमेंटची भरती देखील याच परंपरांनुसार होत असते.

जसे की शीख रेजिमेंटचे फायटिंग ट्रूप्स हे जाट शीख असतात. तर महार रेजिमेंटमध्ये महार समाजासोबतच इतर जातींचे जवान देखील असतात. काही रेजिमेंट अश्या देखील असतात ज्यात पूर्ण भारतातून जवान भर्ती केले जातात. जसे की ब्रिगेड ऑफ गार्ड्स.

 

Rajput Regiment InMarathi

 

ब्रिटीश इंडियन आर्मी तसेच भारतीय थलसेनेत कधीच मुस्लीम रेजिमेंट नव्हती. पण इंफेंट्री बटालियनमध्ये मुसलमानांच प्रतिनिधित्व नेहेमी मिळत राहिलेलं आहे.

दुसऱ्या महायुद्धात जेव्हा राजपूत रेजिमेंट लढत होती तेव्हा त्यामध्ये अर्धे हे राजपूत तर अर्धे सैनिक हे मुसलमान होते. तसेच इंडियन आर्मीच्या ग्रेनेडियर रेजिमेंटमध्ये अर्धे सैनिक हे मुस्लीम असतात.

ग्रेनेडियर रेजिमेंटमध्ये भरती होणारे मुसलमान हे जास्त करून राजस्थान या राज्यात राहणारे कायमखानी मुसलमान असतात. तर इतर समाजातील मुस्लिम्स देखील या रेजिमेंट मध्ये भरती होतात.

याचप्रमाणे जम्मू-कश्मीर लाईट इंफेंट्रीमध्ये देखील अर्धे सैनिक हे मुसलमान असतात.

या व्यतिरिक्त सेनेच्या आर्टिलरी आणि आर्मड कोर यामध्येही मुसलमान असतात. जसे नॉन मार्शल समजण्यात येणारे लोकं देखील आज सैन्यात भरती होतात, हे त्याच प्रकारचं आहे.

 

gorkha-regiment InMarathi

 

जाती किंवा क्षेत्राच्या आधारे चालविण्यात येणाऱ्या रेजिमेंटल सिस्टीमला बंद करायला हवे यावर अनेक वेळा चर्चा झाल्या आहेत. कारण स्वतंत्र भारतात कुठलीही व्यक्ती ही डोगरा किंवा मराठा किंवा जाट किंवा ब्राह्मण किंवा महार असं काहीही असण्याआधी ती एक भारतीय आहे.

म्हणून भारताच्या रक्षणासाठी असणाऱ्या भारतीय जवानांना एक भारतीयच असायला हवे. त्यासोबतच नेहेमी ही मागणी होत आली आहे की देशाच्या लोकसंख्येनुसार लोकं सैन्यात घ्यायला हवीत.

 

Maratha Regiment InMarathi

 

रेजिमेंटल सिस्टीमचे फायदे-नुकसान यावर चर्चा व्हायलाच हवी. पण त्यासाठी आधी त्या सिस्टिमला पूर्णपणे समजून घेणेही गरजेचे आहे.

भारतात कुठलही मुस्लीम रेजिमेंट नाही, पण आपल्या सैन्यात मुस्लीम जवान देखील आहेत जे तेवढ्याच आत्मीयतेने आणि शुरतेने आपल्या देशाचे रक्षण करतात जसे इतर कुठल्याही रेजिमेंटचे जवान करतात.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “भारतीय सैन्यात “मुसलमान रेजिमेंट” नाही, असं कशामुळे?

  • September 3, 2018 at 11:24 pm
    Permalink

    Indian Army Mein Musalman nahi hona chahiye kashmir Kashmir Jaisi Halat Hogi

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?