' 'कायदे आजम' जिन्ना यांची मुलगी भारतातील घराच्या बाल्कनीत लावते २ झेंडे

‘कायदे आजम’ जिन्ना यांची मुलगी भारतातील घराच्या बाल्कनीत लावते २ झेंडे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

कायदे आजम जिन्ना यांची मुलगी भारतातील घरात लावते भारत पाकिस्तान असे २ झेंडे!

भारत पाकिस्तान शत्रुत्व आपल्याला काही नवीन नाही, कित्येक वर्षांपासून हे शत्रुत्व चालत आलं आहे आणि आणखीन किती काळ चालेल हे कोणालाच सांगता यायचं नाही! मुळात याला जवाबदार कोण आहे हे जगजाहीर आहे, त्यामुळे त्या वादाच्या भोवऱ्यात न अडकलेलंच बरं!

भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं पण यामुळे हाच अखंड हिंदुस्तान दोन भागात विभागला गेला, कित्येक लोक एकमेकांपासून दुरावली आणि नाती तुटली, कित्येक वर्षांपासून जपलेल्या ऋणानुबंधांना तिलांजली द्यावी लागली!

 

india pak inmarathi

 

आणि या सगळ्यातूनच निर्माण झाला एक भारत आणि एक पाकिस्तान!

आजही ही विभागणी म्हणजे करोडो  लोकांची कधीही भरून न निघणारी अशीच जखम आहे, पण असो त्यात जास्त न पडता आज आपण एक वेगळीच माहिती जाणून घेणार आहोत!

हे ही वाचा –

 

 

partition inmarathi

 

पाकिस्तानचे संस्थापक आणि पहिले गवर्नर जनरल मुहम्मद अली जिन्ना यांना तर सर्वच ओळखतात. जसं भारतीय नोटांवर महात्मा गांधी यांचे छायाचित्र असतं तसच पकिस्तानच्या नोटांवर मुहम्मद अली जिन्ना याचं छायाचित्र असतं.

 

pakistan currency inmarathi

 

पण तुम्हाला माहित आहे का – की जिन्ना यांची एक मुलगी देखील होती. जी भारत-पाकिस्तान फाळणी नंतर आपल्या कुटुंबापासून वेगळी होऊन भारतात राहिली. भारतात असूनही तिने आपल्या घराच्या बाल्कनीत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे झेंडे लावले.

मुळात हा असला प्रकार आपल्याला काही नवीन नाही, आपल्या देशातल्या कित्येक शहरांत आणि त्या शहरांच्या काही मोहल्ल्यात आपल्याला हे पाकिस्तानचे झेंडे लावलेले सर्रास दिसतात!

 

pakistan flag inmarathi

 

अर्थात भारतासारख्या सगळ्यांना सामावून घेणाऱ्या आणि सेक्युलर अशा देशात ही बाब अगदी नगण्य मानली जाते! कारण आपण सगळ्या जातींचा धर्माचा आदर करतो, म्हणूनच हे फक्त आपल्या देशातच शक्य होऊ शकतं!

पण जिन्ना यांच्या मुलीच्या या कृतीमागच कारण आपण जाणून घेऊया!

 

India-Pak Flags-inmarathi

 

१९४७ साली पकिस्तानला भारतापासून वेगळ करणाऱ्या मोहम्मद अली जिन्ना यांची एकुलती एक मुलगी दीना वाडिया या भारतातील प्रसिद्ध व्यावसायिक वाडिया कुटुंबाच्या सून होत्या. फाळणी नंतर दीना यांनी भारतातच राहण्याचा निश्चय केला. जेव्हाकी त्यांचे वडील आणि कुटुंब पाकिस्तानात गेले.

दीना आणि त्यांचे वडील यांच्यामध्ये नेहेमी वैचारिक मतभेद राहिले. त्यांचे कधीही एकमेकांशी पटले नाही.

हे ही वाचा –

 

dina wadia inmarathi

 

दीना यांचा जन्म १५ ऑगस्ट १९१९ साली झाला आणि योगायोगाने भारतही १५ ऑगस्टलाच स्वतंत्र झाला. दीना जेव्हा १७ वर्षांच्या होत्या तेव्हा त्यांचे एका भारतीय पारसी मुलाशी प्रेम जुळले. पण जिन्ना यांना ही गोष्ट मान्य नव्हती. त्यांची इच्छा होती की दीनाने एखाद्या मुस्लीम मुलाशी लग्न करावं.

जिन्ना यांनी दीनाला सांगितले की,

‘देशात कितीतरी मुस्लीम मुलं आहेत. तू त्यापैकी कोणाशीही लग्न कर.’

यावर दीना यांनी उत्तर दिले की –

‘देशात कितीतरी मुस्लीम मुली होत्या, मग तुम्हाला लग्न करण्यासाठी माझी पारसी आईच मिळाली होती?’

तिचे हे उत्तर एकूण जिन्नाने तिच्याशी बोलणे बंद केले. जिन्ना यांनी रुट्टी पेटीत या पारसी मुलीशी लग्न केले होते.

 

dina wadia marriage inmarathi

 

त्यानंतर दीना यांनी जिन्ना यांच्या मर्जीशिवाय नेविली या मुलाशी लग्न केलं. भारत-पाक फाळणी नंतर दीना काही वर्ष भारतात मुंबई येथे राहिल्या आणि त्यानंतर त्या अमेरिकेत गेल्या.

आपल्याच पित्याने बनविलेल्या पाकिस्तानात, आपल्या जीवनाच्या ९८ वर्षांत दीना केवळ दोनदाच गेल्या. पहिल्यांदा त्या १९४८ मध्ये गेल्या जेव्हा त्यांच्या पित्याचा, म्हणजेच जिन्ना यांचा मृत्यू झाला. त्यानंतर २००४ साली आपल्या पित्याच्या कबरीवर फुलं चढविण्यासाठी त्या परत पाकिस्तानात गेल्या.

 

Dina-Wadia-Inmarathi01

 

भारत–पाक फाळणी वेळी दीना या दुविधेत पडल्या की त्या कुठल्या देशाला आपला देश मानतील. एकीकडे भारत होता जिथे त्यांनी लग्न केल होतं आणि दुसरीकडे पाकिस्तान जो त्यांच्याच पित्याने उभा केला होता.

त्यांना हे दोन्ही देश तेवढेच जवळचे होते त्यामुळे त्यांनी मुंबईच्या कुलाबा येथील त्यांच्या फ्लॅटच्या बालकनीत भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचे झेंडे लावले आणि या दोन्ही देशांप्रती असलेलं आपलं प्रेम व्यक्त केलं.

 

dina wadia 2 inmarathi

 

त्यांच हेअसं दोन्ही देशांप्रति प्रेम व्यक्त करणं योग्य का अयोग्य हे आपण ठरवू शकत नाही, पण ही गोष्ट भारतासारख्या देशात घडू शकते याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, शत्रू जरी असला तरी माणसांच्या भावनांची कदर करणे हे आपल्या लोकांना चांगलेच ठाऊक आहे!

अशा या दीना वाडिया यांचा अमेरिकेच्या न्युयॉर्क शहरात २ नोव्हेंबर २०१७ ला मृत्यू झाला जेथे त्या वास्तव्यास होत्या. तेव्हा त्या ९८ वर्षांच्या होत्या.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “‘कायदे आजम’ जिन्ना यांची मुलगी भारतातील घराच्या बाल्कनीत लावते २ झेंडे

  • March 11, 2020 at 9:31 am
    Permalink

    जेव्हा दिनाने आपल्या पित्याला म्हणजे जिन्नाला प्रश्न केला ‘तुम्हाला लग्न करण्यासाठी पारशी मुलगी मिळाली ,मुसलमान मिळाली नाही काय?ते निरूत्तर कसे राहिले ? त्यांनी असे का म्हटले नाही की’ प्रत्येक मुसलमानाचे कर्तव्यच आहे की दुसऱ्या धर्मातील मुली बरोबर लग्न करून त्यांना मुसलमान बनवणे!. जमल्यास त्यांना जिहादी कामास वापरणे!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?