' हॉकीचा असा ‘जादूगार’, ज्याच्या स्टिकमध्ये ‘चुंबक’ असल्याची शंका प्रतिस्पर्ध्यांना यायची – InMarathi

हॉकीचा असा ‘जादूगार’, ज्याच्या स्टिकमध्ये ‘चुंबक’ असल्याची शंका प्रतिस्पर्ध्यांना यायची

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

फक्त भारत नव्हे तर संपूर्ण हॉकी विश्वातील सर्वात महान खेळाडू म्हणून आजही मेजर ध्यानचंद यांचे नाव आदराने घेतले जाते. हॉकीतील जादूगार अशीच त्यांची जगभरात ओळख आहे.

आज क्रिडा विश्वातील सर्वोच्च पुरस्काराला राजीव गांधी यांच्या नावऐवजी मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला.

हा निर्णय योग्य वा अयोग्य या वादात न पडता ध्यानचंद यांचं कार्य समजून घेणं प्रत्येक भारतीयासाठी महत्वाचं आहे.

त्यांच्या जन्मदिनानिमित्त भारतात २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो.

तत्कालिन मेजर बल्ले सिंग तोमर यांनी ध्यानसिंगच्या हातात हॉकी स्टिक सोपवली आणि याच हॉकी स्टिकनं पुढे ध्यानसिंग यांना ध्यानचंद बनवलं.

 

major dhyanchand inmarathi

 

मेजर ध्यानचंद यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ ला अलाहाबादमध्ये झाला. वडील सामेश्वरसिंग सैन्यात असल्यामुळं कुटुंबाचं स्थलांतरण कायम ठरलेलं.

त्यामुळे ध्यानसिंग यांना जास्त शिकता आलं नाही. त्यांचं ६ वी पर्यंत शिक्षण झालं.

भारताला Olympics मध्ये सलग ३ दा सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या, हॉकीच्या जादुगार मेजर ध्यानचंद ह्यांच्या काही खास आठवणी आपण जाणून घेणार आहोत!

 

dhyanchand inmarathi

 

१) जगभरात, “हॉकीचे सर्वोत्तम खेळाडू” म्हणून प्रसिद्ध

२) त्यांच्या जन्मदिवशी क्रीडा दिवस साजरा करतात हे आपल्याला माहीत आहेच पण ह्याच दिवशी भारताचे राष्ट्रपती – राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करतात.

 

dhyanchand hockey inmarathi

 

३) वयाच्या १६व्या वर्षी भारतीय सैन्यात दाखल झाले आणि तेव्हाच हॉकीमध्ये प्रगती सुरु केली.

४) त्याचं मूळ नाव “ध्यान सिंग” आहे. परंतु ते रात्री उशीरापर्यंत हॉकीचा सराव करायचे – म्हणून त्यांच्या मित्रांनी त्यांना रात्रीच्या चंद्राची उपमा देऊन त्यांचं ध्यानचंद हेच नाव प्रसिद्ध केलं!

५) १९२८ च्या Amsterdam Olympics मध्ये त्यांनी तब्बल १४ गोल ठोकले होते. भारतीय संघाच्या एका विजयाचं वर्णन करताना एक रिपोर्ट म्हणते – हा हॉकीचा खेळच नाही. ही जादू आहे आणि मेजर ध्यानचंद हे हॉकीचे जादुगार आहेत.

६) १९३२ च्या Summer Olympics मध्ये त्यांनी आणि त्यांच्या भावानी – रूप सिंग – अमेरिका आणि जपानला अनुक्रमे २४-१ आणि ११-१ असं हरवण्यात सिंहाचा वाटा उचलला.

 

major dhyan singh inmarathi

 

एकूण ३५ पैकी २५ गोल ह्या दोघांनी मारले होते. तेव्हापासून त्यांना “hockey twins” – हॉकीचे जुळे – म्हणून ओळखलं जायचं.

७) एका मॅच मध्ये जेव्हा ध्यानचंद गोल करू शकत नव्हते तेव्हा त्यांनी वैतागून match referee कडे गोल पोस्टची तक्रार केली — आणि आश्चर्य हे – की खरंच गोल पोस्ट ठरलेल्या नियमांनुसार नव्हती!

८) क्रिकेटचे सुपरहिरो Sir Don Bradman म्हणायचे – क्रिकेटमधल्या रन्ससारखे ध्यानचंद गोल्स करतात.

९) असं म्हटलं जातं की ध्यानचंदजींच्या बर्लिन ओलिंपिक्समधल्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने त्यांना जर्मन नागरिकत्व आणि जर्मन सैन्यात पद offer केलं होतं. पण ह्या भारतीय जादुगाराने ते नाकारलं.

 

 

१०) आपल्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी तब्बल ४०० गोल केले.

११) नेदरलंडच्या हॉकी ऑथोरिटीने, अक्षरशः त्यांच्या हॉकी स्टिकचे तुकडे करून चाचणी घेतली होती. त्यांना वाटलं होतं की ध्यानचंदजींच्या स्टिकमध्ये चुंबक आहे!

ह्या हॉकीच्या जादुगारास, भारताच्या सुपुत्रास सलाम…! ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार स्विकारण्यासाठी यापुढे प्रत्येक खेळाडू आपलं सर्वस्व पणाला लावेल यात शंका नाही. 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?