' रजनीकांत ते अक्षय कुमार : बॉलीवूड स्टार्सची खरी नावं तुम्हाला माहित आहेत का? – InMarathi

रजनीकांत ते अक्षय कुमार : बॉलीवूड स्टार्सची खरी नावं तुम्हाला माहित आहेत का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बॉलीवूड हे भारतीय लोकांच्या मनात वसतं. मोठ्या पडद्यावर दिसणाऱ्या त्या कलाकारांना आपण अक्षरशः डोक्यावर घेतो. त्यांना स्टार बनवतो.

त्यात त्यांच्या अभिनयाचाही तेवढाच हात असतो. त्यासाठी त्या कलाकारांना खूप कष्ट करावे लागतात. रात्रंदिवस मेहनत घ्यावी लागते. तेव्हा कुठे जाऊन एक सामान्य अभिनेता सुपरस्टार होतो.

तसंच त्यांना एवढं यशस्वी बनविण्यात आणि लोकांच्या लक्षात आणून देण्यात त्याचं नावही तेवढीच मोठी भूमिका निभावतं. अमिताभ बच्चन ते शाहरुख खान आणि आता रणबीर कपूर यांना त्यांच्या अभिनयाने नक्कीच यशस्वी बनविलं.

त्यासोबतच त्यांच्या नावानेही आपली जादू दाखविली आणि आज देशातीलच नव्हे तर जगातील कित्येक लोक त्यांच्या नावाचे दिवाने आहेत.

आपल्या आवडत्या अभिनेता/अभिनेत्रीचे नाव एकले की डोळे आनंदाने विस्फारून जातात. जर त्यांना कोणी काही वाईट बोललं, तर आपण लगेच भांडायला देखील तयार होतो. त्यांनी आपल्या मनावर त्यांची छाप सोडलेली असते.

तुम्हाला माहित आहे का की, तुमच्या आवडत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीचं जे नाव तुम्हाला आणि जगाला माहित आहे ते खरं नाव नाहीये. तर त्याचं मूळ नाव काही वेगळंच आहे.

चित्रपट जगतात आपले नाव व्हावं म्हणून या कलाकारांनी चक्क आपलं मूळ नाव बदललं आहे.

चला तर मग आज आपण जाणून घेऊया अश्याच ११ सुपरस्टार्स विषयी ज्यांनी सिनेसृष्टीत आल्यावर आपले मूळ नाव बदललंय…

१. दिलीप कुमार

 

dilip-kumar-inmarathi

 

बॉलीवूडच्या काही महान अभिनेत्यांपैकी एक म्हणजेच दिलीप कुमार, याचं खरं नाव युसुफ खान आहे.

२. मधुबाला

 

madhubala-inmarathi

 

या अभिनेत्रीचं तर केवळ नावच पुरेसं आहे. तिला इतर कुठल्याही स्पष्टीकरणाची गरज नाही. पण तुम्हाला माहित आहे का की तुमच्या आवडत्या मधुबालाचं खरं नाव मुमताज जेहन देहलवी होतं.

३. राजेश खन्ना

 

Rajesh-Khanna-inmarathi

 

काकांना कोण नाही ओळखत, बॉलीवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचे मूळ नाव जतीन खन्ना होते. पण त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती राजेश खन्ना या नावाने.

४. जितेन्द्र

 

jitendra-inmarathi

 

जितेंद्र म्हणजे भारतीय सिनेमाच्या ७०-८० च्या शतकातील उत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक, याचं मूळ नाव रवी कपूर आहे.

५. अमिताभ बच्‍चन

 

amitabh bachchan inmarathi2

 

महानायक म्हणजेच श्री श्री अमिताभ बच्चन ज्यांनी भारतीय सिनेमाला आपल्या अंदाजाने आणि अभिनयाने एक वेगळे वळण दिले. पण बिग बी याचं देखील मूळ नाव अमिताभ बच्चन नसून इंकलाब श्रीवास्तव हे आहे.

६. रजनीकांत

 

rajnikant inmarathi

 

रजनीकांत म्हणजे साउथ इंडस्ट्रीचे देवताच. त्यांच्या काळातील तर ते सर्वात यशस्वी अभिनेता होतेच पण आजही ते कुठल्याही ३० शीतल्या अभिनेत्याला मागे टाकतात. पण त्यांचही मूळ नाव हे रजनीकांत नसून शिवाजी राव गायकवाड आहे.

७. आमिर खान

 

aamir khan featured inmarathi

 

बॉलीवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच आपले आमिर खान यांचे मूळ नाव मोहम्मद आमिर हुसैन खान असे आहे.

८. सलमान खान

 

salman-story bigg boss InMarathi

 

बॉलीवुडचे दबंग भाईजान म्हणजेच सलमान खानच मूळ नाव अब्दुल रशीद सलीम सलमान खान आहे.

९. अजय देवगन

 

ajay-devgn-inmarathi

 

सिंघम अजय देवगण याचं मूळ नाव विशाल वीरू देवगन आहे.

१०. जॉन अब्राहम

 

john abraham-inmarathi

 

बॉलीवूडचा मानिया म्हणजेच जॉन अब्राहम याचं मूळ नाव फरहान अब्राहम आहे.

११. अक्षय कुमार

 

Akshay_Kumar_1 InMarathi

 

खिलाडी अक्षय कुमार याने त्याच्या जीवनात किती स्ट्रगल केलं हे तर सर्वांनाच माहित आहे. पण त्याचं मूळ नाव तुम्हाला माहित आहे का? राजीव हरिओम भाटिया असं या आपल्या अक्षय कुमारचं नाव आहे.

असे हे आणि यांसारखे आपले आवडते कित्येक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांना सिनेसृष्टीत आपलं नाव कमावण्यासाठी मूळ नाव बदलावं लागलं…

तरी आजही त्यांच्या नावाची जादू आपल्यावर कायम आहे आणि ती तशीच राहील…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?