'नरेंद्र मोदींच्या नावे असलेले आगळेवेगळे गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड

नरेंद्र मोदींच्या नावे असलेले आगळेवेगळे गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारताचे आजवरचे सर्वात Dashing पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना आज जगभरामध्ये ओळखलं जातं!

भारताचा एक नागरिक या नात्याने भारताच्या या Dashing पंतप्रधानांच्या जीवनाविषयी अनेक गोष्टी जाणून घेण्याची आपली उत्सुकता आहे.  प्रसिद्धीत आल्यापासून त्यांची बहुतांश जीवनगाथा तुम्हाला देखील या ना त्या माध्यमातून माहित झाली असेलच;

पण तुम्हाला आम्ही सांगितले की, या माणसाच्या नावावर गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत तर…?

ऐकून विश्वास बसत नाही ना… तर आज त्यांच्याबद्दल काहीतरी हटके जाणून घ्या! आज आम्ही तुमच्यासमोर उलगडतोय त्यांच्या नावे असलेले आगळेवेगळे गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड!

 

 • मोदींनी अमेरीकीचे राष्ट्रपती बराक ओबामा यांची घेतलेली भेट आठवतेय? या भेटीदरम्यान मोदींनी अंगावर चढवलेल्या ‘कढाईदार सुटचा’ जेव्हा लिलाव केला तेव्हा हा सुट ४.३१ करोड रुपयांना विकला गेला. ‘लिलावामध्ये विकला गेलेला आजवरचा सर्वात महाग सूट’ या नावे गिनीज बुक मध्ये या विक्रमाची नोंद झाली. हा सुट सुरतचे हिरा व्यापारी लालजी पटेल यांनी खरेदी केला.

 

modiji-guinnese-world-record-inmarathi

 

 • जनधन योजना तर आपल्या सर्वांना माहीतच आहे! २३ ते २९ ऑगस्ट २०१४ या कालावधीत जनधन योजनेंतर्गत १८,०९६,१३० करोड बँक खाती खोलली गेली. ‘अत्यल्प वेळात उघडण्यात आलेली सर्वात जास्त बँक खाती’ म्हणून या कामगिरीची दखल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे घेण्यात आली.

 

 • २०१४ मध्ये मोदींनी सुरु केलेल्या ‘पहल’ योजनेंतर्गत देशभरातील १८.१० करोड एलपीजी ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये सबसिडीचे २५३ करोड रुपये जमा करण्यात आले. या कामगिरीसोबतच ही योजना ‘जगातील सर्वात मोठी रोख सबसिडी योजना’ बनली.

 

 • २०१३ मध्ये मोदी निवडणुकांसाठी प्रचारसभा घेत होते. एका सभेमधील त्यांचे भाषण 3D मध्ये ५३ ठिकाणी दाखवण्यात आले आणि अशी गोष्ट जगात पहिल्यांदाच घडली असल्याने हा विक्रम गिनीज बुक मध्ये विराजमान झाला.

 

modiji-guinnese-world-record-marathipizza-02

 

 • २१ जून २०१५ रोजी राजपथ मार्गावर साजरा करण्यात आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय योग दिवसाला गिनीज बुक मध्ये दोन विश्वविक्रमांची नोंद झाली. पहिला विश्वविक्रम म्हणजे या दिवशी ३५,९८५ लोकांनी योगाभ्यासाचा अनुभव घेतला. दुसरा विश्वविक्रम म्हणजे या योगदिनी ८४ देशांचे नागरिक उत्साहाने सहभागी झाले होते.

 

modiji-guinnese-world-record-marathipizza-03

 

मोदी पंतप्रधान झाल्यानंतर हे विश्वविक्रम नोंदवले गेले. परंतु या आधीही गुजरातचे मुख्यमंत्री या नात्याने आयोजित केलेल्या ‘गुजरात की स्वर्ण जयंती’ या कार्यक्रमा दरम्यान तब्बल ६ विश्वविक्रम गिनीज बुकमध्ये नोंदवले गेले. (हा देखील एक विक्रमच मानला गेला पाहिजे) हा कार्यक्रम तब्बल वर्षभर साजरा होत होता.

 

 • या कार्यक्रमा दरम्यान नोव्हेंबर २०१० मध्ये १०१ तास २३ मिनिटे निरंतर गाणे गाण्याचा विक्रम. हे गाणे शास्त्रीय गायिका धरी पंचमदा यांनी गायले होते. (सदर विक्रमाचे श्रेय मोदी आणि पंचमदा दोघांना दिले गेले.)
 • पंचमदा यांनी या कार्यक्रमामध्ये २१४ राग आणि २७१ बंदिशी सादर केल्या. जो एक विश्वविक्रम ठरला.
 • डिसेंबर २०१० मध्ये गुजरात युनिव्हर्सिटीमध्ये २० हजार खेळाडूंनी एकच वेळेस बुद्धीबळ खेळून नवा विश्वविक्रम नोंदवला
 • एप्रिल २०११ मध्ये निरंतर सतार वाजवून गायकांनी २९ राग सादर केले आणि नवा विश्वविक्रम रचला.
 • एप्रिल २०११ मध्येच ३१५ वादकांनी एकाच वेळेस तबला वाजवून नव्या विश्वविक्रमाची नोंद केली.
 • मे २०११ मध्ये ४५०० कलाकारांसोबत जगातील सर्वात मोठा नृत्य आणि संगीत कार्यक्रम पार पडला आणि नव्या विश्वविक्रमाची नोंद झाली.

 

modi-speech-marathipizza

 

आणि त्यांच्या ६६ व्या जन्मदिनी एकाच दिवशी तब्बल तीन नव्या विश्वविक्रमाची नोंद झाली-

 • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग नागरिकांनी जगातील सर्वात मोठा व्हीलचेअर लोगो बनविण्याचा विश्वविक्रम केला. व्हीलचेअरवर बसून Happy Birthday PM अश्या अक्षरांत दिव्यांग नागरिकांनी हा विश्वविक्रम केला.
 • ९८९ अपंग व्यक्तींनी एकाचवेळी एकाच ठिकाणी ३० सेकंदामध्ये सर्वाधिक पणत्या पेटवण्याचा विश्वविक्रम नोंदवला.
 • ११३३० अपंगाना assitive kits प्रदान करण्याचा विश्वविक्रम देखील साकारण्यात आला.

मोदींचे एवढेसारे “भक्त” उगाच बनले नाहीत…हो की नाही? 😀

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?