'राहुल गांधी ह्या ६ कसोट्यांवर मोदींपेक्षा सरस ठरतात

राहुल गांधी ह्या ६ कसोट्यांवर मोदींपेक्षा सरस ठरतात

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

२०१९ जवळ येतंय. धुराळा उडायला सुरूवात होतीये. गुजरात निवडणुकांनी यल्गार झालाच आहे. जसजसे दिवस पुढे जातील तसतसा प्रचार आक्रमक होत जाणार आणि राहुल विरुद्ध नरेंद्र लढत रंगत जाणार. साध्याच सोशलमिडीयावर ह्या लढ्याने मोठा स्पेस व्यापला आहे. विविध कसोट्यांवर राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी ह्यांची तुलना होत आहे. अर्थात, राहुल समर्थकांना मोदी कोणत्याच बाबतीत सरस वाटत नाहीत तर मोदी समर्थकांना राहुल गृहीत धरावेसे वाटत नाहीत.

पण काही कसोट्या अश्या आहेत, ज्यांत राहुल गांधी हे मोदींपेक्षा निर्विवादपणे उमदे ठरतात. आणि ह्या कसोट्यांवर खुद्द मोदी समर्थक देखील हे मान्य करतील की राहुल इज बेटर दॅन मोदी. 😀

ही ६ कारणं वाचण्याआधी – एक सूचना –

ही तुलना “राजकीय” अजिबात नाही. शिवाय कोणत्याही दोन व्यक्तींची ज्या सर्वसाधारण कसोट्यांवर जनरली तुलना होते, त्याच ६ कसोट्यांवर केलेली ही तुलना आहे. त्यातून कोणताही गंभीर निष्कर्ष काढणे अपेक्षित नाही! 😀

तर – 😀 लेट दि कम्पॅरिझन बिगिन ! 😀

पहिली कसोटी – लुक्स !

राहुल गांधी हे नरेंद्र मोदींपेक्षा जास्त हॅण्डसम आहेत. 🙂

राहुलची खळी तर त्यांच्या सौंदर्यात अधिकच भर घालते…!

 

modi-rahul-inmarathi03
dnaindia.com

 

दुसरी कसोटी – वय

राहुल गांधी हे नरेंद्र मोदींपेक्षा तरुण आहेत. राहुल ह्यांचं आजचं वय ४७ वर्ष आहे. तर मोदींचं ६७. २० वर्षांचा फरक आहे हा.

 

modi-rahul-inmarathi

 

तिसरी कसोटी – आर्थिक स्थैर्य.

राहुल गांधी हे नरेंद्र मोदी पेक्षा श्रीमंत आहेत. म्हणजे आर्थिक चणचणीची चिंता नाही.

 

modi-rahul-inmarathi02
intoday.in

चौथी कसोटी – शिक्षण

 

शिक्षण आणि पदवी मागचा राजकीय वाद बाजूला ठेऊ. दार्शनिक दृष्ट्या – राहुल गांधीकडे विदेशी पदवी आहे तर मोदींकडे लोकल कॉलेजची. अर्थात, “लोकल” कॉलेज म्हणजे वाईट नसतात. पण राहुल चं कॉलेज कोणतं ही विदेशी नव्हे, केम्ब्रिज विद्यापीठातील ट्रिनिटी कॉलेजची आहे.

 

modi-rahul-inmarathi04
jagran.com

पाचवी कसोटी – दि फॅमिली नेम!

 

राहुल गांधींच्या कुटुंबाचं नाव जगात सुप्रसिद्ध आहे. नरेंद्र मोदी मात्र वाडनगर च्या एका मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत. त्यामुळे ग्लोबल acceptance सहाजिकच राहुल गांधींना खूपच जास्त आहे.

 

modi-rahul-inmarathi01

 

सहावी कसोटी – लग्न

राहुल गांधी याचं अजूनही लग्न झालेलं नाही. पण मोदींचं लग्न झालंय आणि ते त्यातून वेगळेही झाले आहेत.

deccanchronicle.com
abplive.in

अर्थात – ही कारणं “राजकीय” नाहीत. ह्या कारणांवरून राजकीय कसब सिद्ध होत नाही. कर्तृत्व सिद्ध होत नाही.

आधी म्हटल्याप्रमाणे, २ व्यक्तींमध्ये सर्वसाधारणपणे ज्या गोष्टींवर तुलना होते, त्या गोष्टींवर केलेली ही तुलना आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?