'कंटाळवाणं काम रंजक करण्याचा वस्तुपाठ : हा विमानतळ कर्मचारी सर्व प्रवाश्यांचं मन जिंकतोय!

कंटाळवाणं काम रंजक करण्याचा वस्तुपाठ : हा विमानतळ कर्मचारी सर्व प्रवाश्यांचं मन जिंकतोय!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आजच्या काळामध्ये सोशल मिडीयामुळे जग जवळ आले आहे. आपल्या मित्रमंडळीशी रोज वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी आणि नवीन मित्र बनवण्यासाठी या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. तरुणांमध्ये तर याचे वेड जरा जास्तच आहे. आजची तरुण पिढी मित्रांबरोबर बाहेर जाण्यास कंटाळा करतात आणि या सोशल मिडीयावर दिवसातील तासनतास घालवताना दिसतात. असो, पण या सोशल मिडियाचे काही फायदे देखील आहेत. विचारवंताना या सोशल मिडियामुळे आपले म्हणणे जगासमोर मांडता येते. या सोशल मिडीयावर कोणतीही गोष्ट व्हायरल होण्यासाठी कधीही वेळ लागत नाही. एखादी चांगली किंवा वाईट कोणतीही गोष्ट या सोशल मिडियामुळे वाऱ्यासारखी पसरते. कुठलीही बातमी एखाद्या माणसाला टीव्हीमार्फत जेवढ्या वेळेत समजते, त्यापेक्षा लवकर या सोशल मिडियामार्फत समजते.

सोशल मिडीयावर कधी काय आणि कसे व्हायरल होईल हे कधीच सांगता येत नाही. कधी एखादे छायाचित्र, तर कधी एखादा व्हिडीओ यातील काही असे असतात जे काही काळातच संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतात. असाच एक व्हिडीओ सोशल मिडीयावर सध्या व्हायरल होत आहे, जो थोडा हटके आहे.

 

airport-worker-dance-inmarathi04

 

सध्या न्यूयॉर्कच्या ग्रेट रोचेस्टर आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करणारा एक कर्मचारी आपल्या मनोरंजक अंदाजासाठी सोशल मिडीयावर चर्चेचा विषय बनलाय. कायरन ऐशफोर्ड नावाचा हा कर्मचारी विमानतळावर विमानांना सिग्नल देण्याचे काम करतो. तर आता तुम्ही विचार कराल की, त्यात तो काय वेगळे करतो , सगळे करतात तसेच तर काम करत असेल आणि यात काय वेगळेपण आणि मनोरंजक आहे.

 

airport-worker-dance-inmarathi

 

पण तुम्हाला हे माहित आहे का की, कायरन हा नाचून विमानांना सिग्नल देत असतो आणि त्याच बरोबर विमानात चढणाऱ्या प्रवाश्यांना आपल्याच शैलीमध्ये रॅप करता-करता इन्स्ट्रक्शन देखील देत असतो. याची काम करण्याची ही पद्धत खरच सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आणि प्रशंसनीय आहे.

 

airport-worker-dance-inmarathi02

 

विमानतळावर विमान उतरत असताना किंवा विमान उड्डाण करत असताना, कायरन आपल्याच शैलीमध्ये नृत्याचे जलवे दाखवत विमानाला सिग्नल देत असतो. हे असे तो गेल्या पाच वर्षांपासून करत आहे आणि लोकांना देखील त्याचा हा अंदाज खूप आवडतो. त्याला खूप लोक पसंत करतात. सध्याचं कायरनचा एक व्हिडिओ अमेरिकन म्युझिक आर्टिस्ट टेरी मॅकब्राइड याने आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे आणि त्याला पसंत देखील केले आहे. हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे.

 

airport-worker-dance-inmarathi03

 

हा खाली दिलेला व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि सांगा आम्हाला कसे वाटतेय तुम्हाला या कायरनचे नृत्य.

हे पाहून तुम्हाला नक्की वाटेल की, आपले देखील कुणीतरी प्रवासाला जाताना किंवा तिथे पोहोचल्यावर असे स्वागत करावे.

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?