'जगात अशक्य असं काहीच नाही हे सांगणारी गुगलचे CEO, सुंदर पिचाई यांची प्रेरणादायी यशोगाथा

जगात अशक्य असं काहीच नाही हे सांगणारी गुगलचे CEO, सुंदर पिचाई यांची प्रेरणादायी यशोगाथा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

परदेशात, विशेषत: अमेरिकेत जाऊन राहणे, तिकडची जीवनशैली अनुभवणे हे अनेक तरुणाचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गरज असते अथक प्रयत्नांची आणि प्रबळ इच्छाशक्तीची.

कदाचित त्यामुळेच की काय काही जण कंटाळून या स्वप्नांच्या मागे धावणं बंद करतात आणि सर्वसामान्य जीवन जगतात.

मात्र काही जण अखेरपर्यंत आपल्या स्वप्नांची पाठ सोडत नाहीत आणि ती स्वप्ने सत्यात साकारून आपलं कर्तुत्व सिद्ध करतात.

अश्या ‘त्या’ काही जणांपैकी एक तरुण व्यक्ती म्हणजे गुगलचे विद्यमान सीईओ पिचाई सुंदरराजन अर्थात सुंदर पिचाई…!

 

sundar-pichai-inmarathi

स्त्रोत

१२ जुलै १९७२ रोजी जन्मलेला हा तरुण, पूर्वी आपल्या आई-वडिल आणि भावासोबत चेन्नईमध्ये दोन लहान खोल्या असलेल्या घरात राहायचा.

सुंदर पिचाई यांचे वडील इलेक्ट्रिकल उत्पादनांमधील नामवंत अश्या GEC कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून कार्यरत होते तर आई स्टेनोग्राफर होती.

परंतु दोघांनाही पुरेसा पगार मिळत नसल्याकारणाने घरची परिस्थिती म्हणावी तितकी चांगली नव्हती. त्यांच्या घरी ना टीव्ही होता ना मौजमजेची इतर साधनं.

 

sundar-pichai-marathipizza02

स्त्रोत

सुंदर पिचाई १२ वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांनी एक रोटरी टेलिफोन खरेदी केला होता.

सुंदर पिचाई यांचं गणितात इतकं भन्नाट डोक चालायचं की त्यांना एका दिवसात डायल केलेले सर्व नंबर लक्षात राहायचे.

आजही गुगलचे सर्वोच्च अधिकारी त्यांच्या गणिती प्रतिभेला आवर्जुन दाद देतात…!

 

sundar-pichai-inmarathi

स्त्रोत

क्षणाकडे वेगळ्या दृष्टीने बघणाऱ्या सुंदर पिचाई यांनी वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत इंजिनियर बनण्याच्या इच्छेने आयआयटी खारगपूर मध्ये प्रवेश घेतला.

तेथे सर्व स्पर्धा परीक्षा जिंकत त्यांनी स्वत:साठी स्टेन्डफोर्ड युनिव्हर्सिटीची शिष्यवृत्ती मिळवली.

स्टेन्डफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पुढील शिक्षणासाठी त्यांनी मटेरियल सायन्स आणि सेमीकन्डक्टर फिजिक्स हा विषय घेतला.

शिष्यवृत्ती मिळाली असली तरी अमेरिकेला जाण्याचा विमानप्रवास खर्च मात्र सुंदर पिचाई यांना स्वत:च्या खिशातून करावा लागणार होता. यासाठी त्यांच्या वडिलांनी कर्ज काढण्याचे प्रयत्न केले परंतु ते निष्फळ ठरले.

अखेर नाईलाजाने त्यांनी कुटुंबासाठी साठवलेल्या पैश्यांमधून ५०,००० रुपये बाहेर काढले आणि सुंदर पिचाई यांनी नव्या भविष्याची स्वप्ने पाहत स्टेन्डफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पाऊल टाकले.

 

sundar-pichai-marathipizza04

स्त्रोत

 

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर स्टेन्डफोर्ड युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडीचा विचार त्यांनी झटकला आणि Applied Materials कंपनीमध्ये इंजिनियर आणि प्रोडक्ट मॅनेजर म्हणून नोकरी स्वीकारली.

पुढे त्यांनी एमबीएची पदवी मिळवली.

याच पदवीच्या जोरावर त्यांनी १ एप्रिल २००४ रोजी गुगलच्या भल्या मोठ्या विश्वात प्रवेश केला.

आपण गुगलच्या सीईओ पदावर विराजमान होऊ असा स्वप्नात देखील ज्यांनी विचार केला नसेल, ते सुंदर पिचाई, अवघ्या १० वर्षांत जगातील एका श्रीमंत उद्योगांपैकी एक असलेल्या Googleचे नेतृत्व करत आहेत.

 

sundar-pichai-marathipizza05

 

Search, Ads, maps, the Google Play Store, YouTube, आणि Android यांसारख्या गुगलच्या महत्वपूर्ण फोर फ्रंट प्रोडक्टची जबाबदारी सुंदर पिचाई यांच्याकडे आहे.

भारतीय मूळ असलेल्या ह्या Google CEO ला वर्षाला ५० मिलियन डॉलर म्हणजेच ३१० करोड रुपये पगार मिळतो.

 

sundar pichai inmarathi

 

 

सध्या ते त्यांच्या पत्नी (अंजली पिचाई) आणि दोन मुलांसोबत Los Altos Hills येथील सुंदर घरात राहतात.

सुंदर पिचाई ह्यांच्याकडून “नथिंग इज इम्पॉसिबल” ची प्रेरणा मिळाल्याशिवाय रहात नाही!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?