' Job चा पहिला दिवस अतिशय महत्त्वाचा; या ६ गोष्टी डोक्यात पक्क्या करा

Job चा पहिला दिवस अतिशय महत्त्वाचा; या ६ गोष्टी डोक्यात पक्क्या करा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – अभिजित पानसे 

कॉलेज संपल्यानंतर पहिला job  मिळतो आणि आयुष्याची दिशाच बदलून जाते.

एकीकडे job मिळाल्याचा आनंद आणि दुसरीकडे आपण कसे perform करू ह्याचं टेन्शन.

ह्या सगळ्या गोंधळामध्ये बरेच जण पहिल्या दिवशी काहीतरी विचित्र करून बसतात आणि त्याचं impression तसंच बनून जातं , म्हणतात ना first impression is the last impression!

परंतु ह्या ६ गोष्टी जर तुम्ही follow केल्या तर तुमचा पहिला आणि त्यानंतरचे सगळे दिवस office मध्ये छान जातील ह्यात शंका नाही.

ह्या गोष्टी induction संपून तुम्ही actual team बरोबर काम सुरु करायच्या पहिल्या दिवशी करायच्या आहेत.

१. आनंदी ,उत्साही आणि नीटनेटकेपणा…!

 

suits InMarathi

तुमचा office च्या पहिल्या दिवशी जर तुमचा mood चांगला नसेल तर अक्खा दिवस  खराब जाऊ शकतो.

सकाळी लवकर उठा – जेणेकरून तुम्ही ऑफिसला पोहोचेपर्यंत सकाळची मरगळ निघून गेलेली असेल – आणि हो –

जर तुम्हाला breakfast ची सवय नसेल तर ती ह्याच दिवशी लावून घ्या कारण ह्या एका सवयीमुळे तुम्ही रोज सकाळी फ्रेश राहू शकता.

सगळयात महत्वाचं – Professional कपडे घालून जा , jeans आणि T-Shirt बिलकुल नाही…! (आजकाल हे सांगावं लागतं! 😀 )

२. ऑफिसच्या वेळेत पोहोचा (Be on – time)

on-time_marathi-piza

 

पहिल्याच दिवशी जर तुम्ही उशिरा पोहोचलात तर तुमचं  impression नक्कीच खराब होणार – उशीर होण्यासाठी कारण कितीही genuine असलं तरीसुद्धा…!

सांगितलेल्या वेळेच्या कमीतकमी १०-१५ मिनिटे आधी पोहोचण्याचा प्लांनिंग करा म्हणजे बाकीचे ऑफिसमध्ये येईपर्यंत तुम्ही त्या जागेशीही adjust व्हाल.

३.   Colleagues ची ओळख करून घ्या

Normally, सगळ्या ऑफिसेसमध्ये नवीन कोणी join झालं की ओळख करून द्यायची पद्धत असते. परंतु तशी ओळख झाली नसेल तर, तुम्ही स्वतः जाऊन ओळख करून घ्या.

तुमची जर personal  ओळख झाली तर सुरवाती-सुरवातीला येणाऱ्या अडचणींसाठी तुम्ही सहज मदत मागू शकता. शिवाय लोक तुम्हाला anti -social सुद्धा समजणार नाहीत.

४. खूप जास्त बोलू नका 😀

 

office-worker-suffering-InMarathi

 

 

ओळख करून घेण्यापर्यंत आणि अगदी नेटकं बोलण्यापर्यंतच पहिला दिवस असू द्या.

अजून तुम्ही तिथे कोणाला personally ओळखत नाही आणि जर तुम्ही जास्त बडबड केलीत तर तुमचे colleagues तुम्हाला unprofessional समजू शकतात.

त्यामुळे उगीचच दुरावा निर्माण होऊ शकतो जो तुमच्या career वर परिणाम करू शकतो. म्हणून – सर्वांशी बोला, पण मोजकंच बोला.

५. कामात लक्ष द्या

“पहिलाच दिवस आहे, मला काय काम असणार आहे?!” – असं म्हणून time pass करू नका…!

तुमच्या manager ला विचारा की चालू असलेल्या कामात तुम्ही काही मदत करू शकता का किंवा जर new joiners साठी काही तुमच्या कामाच्या संबंधीत माहिती संग्रहित करून ठेवलेली असेल तर ती वाचा.

ह्या एका गोष्टीमुळे तुमच्या वरिष्ठांच्या लक्षात येईल की तुम्हाला कामाची आवड आहे आणि तुम्ही जबाबदार देखील आहात!

६. सगळे निघाल्यावरच घरी जा

पहिल्या दिवशी करायला काम असो नसो – घरी जायची घाई करू नका.

तुमचे colleagues निघाल्याशिवाय तुम्ही पण निघू नका. निघतांना तुमच्या manager किंवा supervisor ची permission घेऊनच निघा, जेणेकरून त्यांना माहित असेल की तुम्ही घरी जात आहात.

ह्या सहा गोष्टींमधील काही गोष्टी तुम्हाला कदाचित अवास्तव वाटत असतील. परंतु हे लक्षात घ्या की ह्या सगळ्या गोष्टींमुळेच तुमचा office मधील पुढील आयुष्य सुरळीत जाईल.

आणि हो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला नेहमी सांगत राहा की I Love my job! कारण तेच तुमचं motivation ठरेल…!

===

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?