तुमचा किंवा घरातल्या कोणाचाही रक्तगट O-निगेटिव्ह असेल तर मग हे वाचाचं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

भाईजानचा सलमान खानचा ‘सुलतान’ हा चित्रपट आपण सर्वांनीच बघितला असेल. त्यामध्ये असे दाखविण्यात आले आहे की सलमान म्हण्जेच सुलतान याचा ब्लड ग्रुप एक रेअर ब्लड ग्रुप आहे म्हणजेच O-निगेटिव्ह आहे.

सुलतान हा खेळायला परदेशी गेलेला असताना त्याची बायको म्हणजेच अनुष्का शर्मा ही त्यांच्या बाळाला जन्म देते पण त्या बाळाची प्रकृती खूप नाजूक असते आणि त्याला रक्त चढविण्याची गरज असते.

पण खूप प्रयत्न करून देखील त्या बाळासाठी रक्त मिळू शकत नाही कारण सुलतान प्रमाणेच त्याच्या मुलाचही रेअर ब्लड ग्रुप असत आणि शेवटी तो मृत्यूला कवटाळतो. बस यावरचं त्या चित्रपटाची कहाणी दाखविण्यात आली आहे.

 

Sultan movie InMarathi

 

आता तुम्ही विचार करत असाल की, हे तर सर्वांनाच माहित आहे. O-निगेटिव्ह हा रक्त गट खूप दुर्मिळ आहे. तुमचा देखील रक्तगट दुर्मिळ O-निगेटिव्ह आहे का?

पण काय तुम्हाला माहित आहे की O-निगेटिव्ह पेक्षाही दुर्मिळ एक रक्त गट आहे, जो जगातील बोटावर मोजण्या इतक्याच लोकांचा आहे. या रक्त गटाला जगातील सर्वात दुर्मिळ रक्त गट म्हणून ओळखल्या जाते.

 

o negative InMarathi

 

या रक्त गटाचा शोध १९५२ साली मुंबईच्या एका वैज्ञानिकाने लावला होता. त्यामुळे या रक्त गटाला  Bombay Blood असे नाव देण्यात आले. त्यावेळी केवळ ४ लोकांचं हे रक्त गट असल्याचं समोर आलं होतं.

हा रक्त गट एवढा दुर्मिळ आहे की, जगात आतापर्यंत केवळ ४० लोकांचचं नाव या रक्त गटाच्या यादीत नोंदविण्यात आले आहे.

ज्यापैकी केवळ ९ लोकं या रक्त गटाचे डोनर आहेत. त्यामुळे या रक्त गटाला Golden Blood देखील मानल्या जातं.

 

blood-typing_thumb InMarathi

 

वैज्ञानिकांच्या मते आपल्न्या शरीरातील रक्तात रेड ब्लड सेल मध्ये ३४२ अँटिजेन्स असतात. हे अँटिजेन्स मिळून अॅन्टीबॉडीज बनविण्याच काम करतात. कुठल्याही रक्त गटाचा निर्माण या अँटिजेन्सच्या संख्यांवर अवलंबून असतो.

 

o negative 1 InMarathi

 

साधारणपणे लोकांच्या रक्तात ३४२ मधून १६० अँटिजेन्स असतात. जर रक्तात या अँटिजेन्सची संख्या ९९ टक्क्यांपेक्षा कमी असेल तर त्या रक्त गटाला दुर्मिळ रक्त गटात ठेवल्या जातं आणि हीच संख्या जर ९९.९९ टक्क्यांपर्यंत पोहोचली तर त्या रक्त गटाला दुर्मिळ पेक्षाही दुर्मिळ रक्त गट मानल्या जातं.

 

o negative 2 InMarathi

 

१९४७ साली १० वर्षांच्या थॉमसला ब्लड इन्फेक्शन झालं, ज्यानंतर त्याला जिनेवा येथील युनिवर्सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण हॉस्पिटल आणि सर्व ब्लड बँक शोधून काढल्यानंतरही थॉमसच्या रक्त गट असलेलं रक्त नाही मिळालं, परिणामी थॉमसचा मृत्यू झाला.

 

blood group-inmarathi
bloodjournal.org

थॉमसच्या मृत्यू नंतर येथील डॉक्टरांनी त्याचं ब्लड सॅंपल एम्स्टर्डम आणि पॅरीस येथी वैज्ञानिकांकडे पाठवले. जिथे त्याच्या ब्लड सॅंपलची तपासणी केल्यानंतर त्यांना हे माहिती पडलं की त्याच्या रक्तात Rh होतचं नाही.

आजही हा रक्त गट अतिशय दुर्मिळ आहे आणि आजही वैज्ञानिक त्यावर अध्ययन करत आहेत. हा रक्त गट खूप कमी लोकांच असल्यामुळे डॉक्टर आणि वैज्ञानिक वारंवार ही अपील करत असतात की जर तुमचाही रक्त गट हा Golden Blood असेलं तर ते त्यांना नक्की सांगा.

जेणेकरून या माध्यमातून ते या रक्त गटावर रिसर्च करू शकतील आणि पुढे जाऊन कित्येक लोकांचे प्राण वाचू शकेल.

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?