' माहिती आहे का कशी दिली जातात भारतासह जगातील शहरांना नावं? – InMarathi

माहिती आहे का कशी दिली जातात भारतासह जगातील शहरांना नावं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रत्येक माणसाची ओळख जशी त्याच्या नावावरून होते. तसेच प्रत्येक ठिकाणाची ओळख देखील त्याच्या नावावरूनच होत असते. एखाद्या जागेचे किंवा वस्तूचे नाव जर आपल्याला कुणी सांगितले, तर त्याचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर उभे होते.

जर आपण एखाद्या नवीन ठिकाणी गेलो आणि जर आपल्याला त्या ठिकाणाचे नाव माहित नसेल आणि आपण कुठे आहोत हे आपल्याला कुणाला सांगायचे असेल, तर अश्यावेळी आपल्याला त्याला त्या ठिकाणाबद्दल समजवताना खूप त्रास होतो.

 

2 place joined name 2 InMarathi

 

जरा विचार करा जर जगातील कोणत्याही ठिकाणांना नावे नसती, तर काय झाले असते? अर्थातच, असे असते तर सर्वच गोंधळलेले आणि संभ्रमित असते. त्यामुळे ओळख पटवून देण्यासाठी ठिकाणाला नावं देणे महत्त्वाचे आहे.

नाव दिल्यामुळे दोन ठिकाणांमध्ये फरक करण्यास मदत होते. एखाद्या माणसाला किंवा एखाद्या जागेला नाव देण्याचे काम खूप विचारपूर्वक केले जाते. ठिकाणाला नाव देण्यासाठी विविध पद्धती आणि साधने वापरली जातात. प्रत्येक प्रदेशातील काही ठिकाणांची नावे थोड्या फरकाने सारखीच असतात.

 

2 place joined name InMarathi

 

वेगवेगळ्या देशांमध्ये किंवा क्षेत्रांमध्ये एक सारखीच नावे असलेली दोन किंवा त्यापेक्षा जास्त ठिकाणे देखील आढळतात. ठिकाणांची नावे प्रामुख्याने नैसर्गिक वैशिष्ट्ये आणि तोड्ग्यांवरून देण्यात आलेली असतात. ठिकाणाचे नाव, त्याचा मूळ अर्थ, उच्चार आणि वापर यांचा अभ्यास केला जातो. चला तर मग जाणून घेऊया की, एखाद्या ठिकाणाला नावं कश्याप्रकारे दिले जाते..

भौगोलिक नावे :

संभ्रम टाळण्यासाठी ठिकाणांच्या नावामध्ये अचूकता आणि सुसंगतता असणे आवश्यक आहे. भौगोलिकदृष्ट्या ओळखली जाणारी ठिकाणं यांना नावं तेथील भाषा, उच्चार आणि त्या ठिकाणाचे वैशिष्ट्ये यांवरून दिलेली असतात.

तसेच काही टोपणनावे ही तेथे राहणारी माणसे आपल्या सोयीनुसार देतात, त्यामध्ये कोणताही वेगळा संदर्भ नसतो. ठिकाणांची टोपणनावे ही एखाद्या ठिकाणच्या भूगोलामधील अंतर्दृष्टी प्रदान करते. ठिकाणांच्या नावावरून त्या प्रदेशाची संस्कृती आणि इतिहासाचे जतन देखील केले जाते.

 

maharashtra-map InMarathi

 

पारंपारिक नेमिंग सिस्टम :

नावं देण्याची प्रणाली एक देश किंवा स्थानाप्रमाणे बदलू शकते. ठिकाणाचे नाव हे वारंवार विशिष्ट लोक, प्रशासकीय गतीविधी, ऐतिहासिक घटना किंवा भौगोलिक वैशिष्ट्यांशी संबंधित असतात.

अमेरिका सारख्या काही देशांमध्ये काही विशिष्ट विभाग किंवा अधिकाऱ्यांवर महत्त्वाच्या ठिकाणांना नाव देण्यासाठी जबाबदारी असते. एखाद्या ठिकाणाला नाव देण्याआधी तेथील स्थानिक लोकांशी चर्चा केली जाते.

ठिकाणाला नाव देताना तेथील पद्धती किंवा लोकं यांचा विचार केला जातो. काही ठिकाणांची नावे तेथे घडलेल्या अभूतपूर्व घटना किंवा प्रसंग यांच्यावरून दिली जातात.

 

2 place joined name 1 InMarathi

 

ठिकाणांना नावं देण्याची काही उदाहरणं :

बहुतेक ठिकाणांची नावे त्यांचे संस्थापक किंवा राजकारण्यांच्या नावावरून देण्यात आलेली आहे, त्यामुळे ती सहजपणे ओळखली जातात. अमेरिकेतील काही नावे अशीच आहेत.

अमेरिकेतील काही प्रमुख ठिकाणांची नावे जसे, वॉशिंग्टन डीसी (जॉर्ज वॉशिंग्टन), क्लीव्हलँड (जनरल मोसेस क्लीव्हलँड) आणि डेन्व्हर (जेम्स डब्ल्यू डेन्व्हर) ही आहेत.

जगभरातील मुख्य शहरे, शहरांचे मुख्य रस्ते आणि मार्गांची नावे त्या शहरातील प्रमुख व्यक्तींच्या नावावरून देण्यात येतात. इंग्लंडमधील नद्यांच्या बाजूला वसलेल्या काही शहरांची नावे ही त्याच नद्यांच्या नावावरून देण्यात आलेली आहेत. त्यामधील काही शहरांची किंवा ठिकाणांची नावे नद्यांची नावे बदलल्यानंतर बदलली गेली आहेत.

 

washington InMarathi

 

उदा. केंब्रिजचे नाव प्रथम ग्रँटब्रिसिक हे होते, जो ग्रँट नदीवरील एक पूल होता. पण आता त्याचे नाव बदलण्यात आलेले आहे, कारण आता ग्रँट नदीचे नाव बदलून कॅम केले गेले आहे.

हे तर झालं परदेशाच, पण आपल्या देशात देखील ठिकाणांना नावं देण्याकरिता अशीच पद्धती वापरली जाते. आपल्या भारत देशातील शहरं, गावं, प्रमुख रस्ते यांना देखील याचं पद्धतीने नावे पडली आहेत.

 

India-Gate-Delhi InMarathi

 

जसे आपल्या देशाची राजधानी दिल्ली या शहराला मौर्य वंशाचा राजा धीलू याच्या नावावर पडल्याचं इतिहासकार सांगतात. तर मुंबई या शहराचं नावं मुंबा या देवीच्या नावावर ठेवण्यात आलं आहे. सुलतान अहमदशहा याच्या नावावर अहमदाबादचे नाव पडले आहे.

चेन्नई शहराचे नाव तेथील चेन्ना केसवा पेरूमल मंदिराच्या (Chenna Kesava Perumal Temple) नावावर ठेवण्यात आले आहे. तर  ‘पुण्यनगरी’ या शब्दावरून पुणे शहराचं नावं ठेवण्यात आल्याचं मानल्या जात.

 

Chenna Kesava Perumal Temple InMarathi

 

मग मंडळी आता तुम्हाला समजले असेलचं की, एखाद्या ठिकाणाला नाव काही असेच दिल्या जात नाही. तर त्यासाठी एका प्रणालीमधून जावे लागते आणि त्यानंतरच कोणते नाव द्यायला हवे, हे ठरवले जाते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?