' मुंबई-नागपूर अवघ्या ३५ मिनिटात: Hyperloop बदलणार परिवहन तंत्रज्ञानाचं भविष्य!

मुंबई-नागपूर अवघ्या ३५ मिनिटात: Hyperloop बदलणार परिवहन तंत्रज्ञानाचं भविष्य!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

वाऱ्याच्या वेगाने, विद्युत वेगाने, इत्यादी शब्दप्रयोग भाषेत कोणत्या क्रमा ने आले ते नक्की माहीत नाही, पण आपल्या कमाल वेग गाठण्याच्या क्षमते बरोबरच ही गती-विशेषणे वाढतच जाणार हे नक्की. चाकाचा शोध लागल्या पासून ते अगदी superpsonic विमाने शोधण्या पर्यंत पार पडलेला हा प्रवास आता पुढे hyperloop या अफलातून संकल्पने च्या टप्प्या वर येतो आहे.

ज्या वेगाची गोष्ट आपण करतोय त्या प्रकारचा वेग आतापर्यंत लढाऊ विमाने किंवा कॉन्कॉर्डे सारख्या प्रवासी विमानाने च गाठला आहे. इथेच hyperloop या संकल्पनेचं महत्त्व आहे.

Hyperloop ही संकल्पना कुठल्या अत्याधुनिक सैन्य ताफ्यात सामरिक क्षमता वाढवण्या साठी आलेली नसून, प्रवासी वाहतूक, परिवहन या क्षेत्रातली क्रांती आहे…!

साधारण तीन वर्षां पूर्वी म्हणजे २०१३ मध्ये या संकल्पने चे आराखडे Space Ex ने जाहीर केले. Tesla मधून Automobile क्षेत्रात तसेच Space Ex मधून अवकाश संशोधना संबंधित तंत्रज्ञान क्षेत्रात क्रांतीकारक बदल घडवून आणल्या नंतर एलोन मस्क ने हे नवीन परिवहन तंत्रज्ञान विकसित करण्या च्या आघाडी वर काम सुरू केले आहे.

एलोन मस्क बद्दल सांगायचं तर Tony Stark सारख्या काल्पनिक पात्रा ची आठवण करून देण्या सारखं आजवरचं त्याचं काम आहे. म्हणूनच त्याला “खरा Iron Man” म्हटलं जातं.

elon-musk-marathipizza-01

स्त्रोत

विज्ञानकथेतील वाटाव्या अशा संकल्पना वर बोलताना तो सोशल मेडिया वर दिसतो, असं असताना तो चर्चेत राहिला नसता तर नवलच. अन ह्याच ख्यातीला साजेसे काम त्याने hyperloop चं तंत्रज्ञान Open-Sourse करून केलेलं आहे, जेणेकरून इतरांच्या कल्पनांचा हातभार हे तंत्र विकसित करण्यात लागेल.

हे तंत्रज्ञानआपल्याकडे नजीक च्या भविष्यात असणार नाही अशी सर्वसाधारणपणे आपली धारणा होणे स्वाभाविक आहे.

पण हा विषय आत्ता मांडण्या चे कारण म्हणजे, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतेच या सबंधात केलेले वक्तव्य.

त्यांनी त्यांच्या अमेरिका भेटीत Tesla च्या लोकांना भारतात या प्रकारची व्यवस्था विकसित करण्यासाठी निमंत्रित केले आहे. हे तंत्रज्ञान अजून पूर्णपणे विकसित झालेलं नसलं तरी भविष्यात जर ते झालं तर परिवहन मंत्र्यांना मुंबई ते नागपूर अंतर अवघ्या 35 मिनिटात पार करता येईल.

nitin-gadkari-marathipizza

 

स्त्रोत

वेग वाढवण्यातला प्रमुख अडथळा म्हणजे घर्षण! मग ते रस्त्या चे असो किंवा रेल्वे ला रूळा चे अथवा हवेचे. पृथ्वी च्या वातावरणात तरी हवेच्या अवरोधा वर उपाय नाही. Hyperloop नेमके हेच अडथळे प्रथमतः दूर करते.

हवेचा अवरोध कमी करण्यासाठी एका ट्यूब मध्ये निर्वात सदृश परिस्थिती निर्माण केली जाईल म्हणजेच हवेचा दाब अत्यंत कमी ठेवण्यात येईल. ह्याच ट्यूब मधून एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी जाणारी capsule (वाहन) प्रवास करेल.

 

hyperloop-marathipizza

 

अशा प्रकारच्या निर्वाता वर आधारित Atmospheric railway ची कल्पना फार पूर्वी मांडण्यात आली होती, पण तेंव्हा हे तांत्रिक व आर्थिक दृष्ट्‍या परवडणारे नव्हते, अन मुळात त्या साठी लागणारे मूलभूत तंत्रज्ञान ही अस्तित्वात नव्हते. आजच्या काळात कुठले ही तंत्र विकसित करताना खऱ्या अर्थाने त्याला व्यवहार्य बनवणे हाच महत्त्वाचा भाग आहे.

Transformers 2 या चित्रपटात एक Rail-Gun नावाचं अत्याधुनिक हत्यार वापरलेलं आपण पाहीलं, यात linear Induction motor च तंत्र वापरून projectile चा वेग अन मारक क्षमता वाढवलेली असते. या सारखंच तंत्र वापरून capsule ला गती देण्या चा पर्याय hyperloop चे तंत्रज्ञ विकसित करत आहेत. अशा प्रकारे ताशी 1100 किमी वेगाचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट गाठले जाऊ शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही प्रणाली उर्जे चा अपव्यय न करता प्रभावी पणे वापर करण्या साठी विकसित केली जात आहे.

ह्या संकल्पनेत गडकरींनी दाखवलेल्या रुचीमधून आपल्याला एक सत्य लक्षात येईल –

आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्या बाबत आपल्याकडे फारसं काही घडलेलं आपण पाहत नाही, पण अशा तंत्रज्ञानाचे ग्राहक मात्र आपण आज ना उद्या होणारच असतो…!

Hyperloop वरील पुढील २ व्हिडीयो नक्की बघा:

ही संकल्पना, पुढील व्हिडीयोत एलोन मस्क स्वतः समजाऊन सांगतोय.

तसंच – Hyperloop मागचं विज्ञान ह्या व्हिडीयोतून जाणून घ्या.

 

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?