भारतावर २०० वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांना कर्ज देणाऱ्या “मराठा” राजाची अद्भुत कथा
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
लेखक : विशाल दळवी
===
भारतात जेंव्हा इंग्रजांनी पाऊल टाकले तेंव्हा राजघरणे आणि कित्येक राजेरजवड्यांनी त्यांची राज्ये सोडून दिली, कित्येक संस्थाने खालसा केली गेली!
अर्थात यामागे ब्रिटिशांचा मनसुबा काही चांगला नव्हता, त्यांना भारताला गुलाम बनवून आपल्या लोकांवर जुलूम आणि अन्यायच करायचे होते!
भारतीय भूमीवर सत्ता गाजवण्याच्या आकांक्षेने भारतात उतरलेल्या इंग्रजांसमोर कित्येक राज्यकर्त्यांनी आणि संस्थानांनी गुडघे टेकवले.
अशा वेळेस काही अशी घराणी आणि राजे देखील होते ज्यांनी ब्रिटिश सरकारशी हातमिळवणी करून स्वतःची राज्ये सुरक्षित केली, पण ब्रिटिशांनी नंतर त्यांची सुद्धा गय केली नाही!
त्यांना सुद्धा ब्रिटिशांनी नंतर प्रचंड त्रास दिला, दुप्पट कर तसेच इतरही गोष्टी यामुळे कित्येक संस्थाने तर जेरीस आली होती!
पण भारतीय इतिहासात एक असा राजा होऊन गेला ज्याने इंग्रजांच्या सत्तेला भिक घातली नाही.
उलट – या राजाने इंग्रजांना स्वत:पुढे हात पसरवण्यास भाग पाडले.
त्या राजाचे नाव ‘श्रीमंत महाराजा तुकोजीराव होळकर द्वितीय’… ज्याने करोडो रुपयांचे कर्ज देऊन खुद्द इंग्रजांना आपला कर्जदार बनवलं होत.
‘मध्य भारताचे महाराजा’ म्हणून त्या काळी त्यांना ओळखले जायचे.
इंग्रजाच्या रेल्वे प्रकल्पामुळे जनतेला होणारा फायदा लक्षात घेऊन महाराजा तुकोजीराव होळकर यांनी इंग्रजांना पहिल्या टप्प्यासाठी ‘एक करोड रुपये’ कर्ज स्वरुपात दिले.
या कर्जामधून इंग्रजांनी इंदोर जवळची तीन रेल्वे सेक्शन जोडण्याचे काम पूर्ण केले.
महाराजा तुकोजीराव होळकर यांनी दिलेल्या करोडो रुपयांच्या कर्जाच्या माध्यमातून सात वर्षांच्या कालावधीत इंग्रजांनी ‘खंडवा-इंदोर’, ‘इंदोर-रतलाम-अजमेर’ आणि इंदोर-देवास-उज्जैन’ या तीन रेल्वे लाईनचे निर्माण केले.
यापैकी ‘खंडवा-इंदोर’ लाईनला ‘होळकर स्टेट रेल्वे’ या नावाने देखील संबोधले जाते.
महाराजा तुकोजीराव होळकर यांनी १०१ वर्षासाठी द.सा.द.शे. ४.५ टक्के दराने कर्जाची रक्कम इंग्रजांना उपलब्ध करून दिली.
पण राजांचं vision एवढ्यावरच थांबत नाही !
एकीकडे कर्ज देत असतानाच जनतेला होणारा फायदा लक्षात घेऊन त्यांनी रेल्वे रूळ टाकण्यासाठी इंग्रजांना मोफत जमीन देखील दिली…!
डोंगराळ भाग असल्याकारणाने अतिशय मेहनतीने या मार्गांवर रेल्वे रूळ टाकण्यात आले, तसेच मार्गात येणाऱ्या नर्मदा नदीवर देखील मोठे पूल बांधण्यात आले.
इंदोर मध्ये टेस्टिंगसाठी आणले गेलेले पहिले वाफेचे रेल्वे इंजिन हत्तींच्या मदतीने खेचून रेल्वे रूळापर्यंत आणण्यात आले हे विशेष!
सदर घटना भारतीय इतिहासासाठी आणि भारतीय रेल्वेसाठी अतिशय महत्वपूर्ण घटना मानली जाते.
ज्या इंग्रजांसमोर कित्येक निष्पाप बांधवांना नामुष्कीने हात जोडावे लागले, त्याच इंग्रजांनी एका भारतीय आणि महाराष्ट्रीयन घराण्यातील राजासमोर पैश्यांसाठी हात पसरावे लागले यापेक्षा अभिमानाची गोष्ट आपल्यासाठी दुसरी कोणती असेल?!
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर । इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved
गर्व आहे आम्हाला आमच्या या रयतेच्या राजाचा,दाखवा ज्यानी खरा इतिहास लपवला त्यांना खरा इतिहासjay malhar
मी शेतकरी पिज्जा काय असतो माहीत नाही पण मराठी पिज्जा खुप खुप अवडतो थँक्स
हा राजा मराठा-धनगर समाजातील होता, धनगरातील खुटेकर-धनगर समाजातील असो, लेख अप्रतिम आणि संशोधनही उत्तम केले.
-विठ्ठल खोत
My Dear friend, please leave this casteism. this happened with us so far and you still showing what type of cast they have in the subcaste.
Knot saheb tumhi kokanasth ka deshasth.
Tukoji holkarachi thorvi sodun tumhi tyanchi jat dakhwnyacha prayatna karts.
मी माझ्या राजाला नमन.करीतो
Malharrao holkar ,ahilyadevi holkar,yashvantrao holkar ,tukojirao holkar ,these kings are the great kings of holkar danesti .The great maratha wariours.
The great king..proud to be dhangar samrajya.queen of malwa..ahilyadevi holkar .Jay malhar..maratha maharastra..and I hope proud to be every Indian…
Holkar gharanych hitihas mhan ahe, aren’ta velul yetil lenamadhil mandirachi puja 1810 paryant Holkar raje Karath hote,. Mahendra kaldhone mhaswad
Holkar gharanych hitihas mhan ahe, aren’ta velul yetil lenamadhil mandirachi puja 1810 paryant Holkar raje Karath hote,. Mahendra kaldhone mhaswad
महाराजा तुकोजीराव होळकर yanchya jeevanavar
Marathi madhun book available ahe ka ?
धन्यवाद इतिहास के बारे में जानकारी देने के लिए …