' चीनमध्ये ह्या गोष्टींवर चक्क बंदी आहे, याला काय म्हणावं? – InMarathi

चीनमध्ये ह्या गोष्टींवर चक्क बंदी आहे, याला काय म्हणावं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

चीन हा देश नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिलेला आहे. चीनचा क्षेत्रफळाच्या बाबतीत जगात चौथा, तर लोकसंख्येच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांक लागतो. चीनची लोकसंख्या जशी जास्त आहे, तसेच तेथील नियम देखील खूप कडक आहेत.

चीन हे पर्यटनासाठी खूप चांगले आहे. पण तेथील काही नियम तुम्हाला न पटणारे असू शकतात. तसेच तेथे बनवलेले नियम पाळले न गेल्यास तुमच्यावर कायदेशीर कारवाई देखील केली जाऊ शकते.

चीनमधील सरकारचे निर्णय अनेकदा हुकूमशाहीचा प्रत्यय येईल असेच असतात. मग ते माध्यमांवरील निर्बंध असो, किंवा जनतेवर लादलेले काही कठोर निर्णय असोत. चीनमध्ये नियम फार काटेकोरपणे पाळले जातात.

 

china-flag-inmarathi

अशाच प्रकारे चीनमध्ये काही गोष्टी अत्यंत कठोरपणे बॅन केल्या गेल्या आहेत. हा बॅन देखील तेवढ्याच कठोरपणे पाळला जातो. वर्षानुवर्षे ही बंदी कायम राहते. एखाद्या चुकीच्या बाबीवर बंदी घालणे काही गैर नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

मात्र चीनने ज्या गोष्टींना बॅन केले आहे, त्यामागची कारणे पाहिली तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल, कदाचित हसूही येईल. अशाच काही बाबी ज्या चीनमध्ये बॅन आहेत, त्याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

१. फेसबुक

 

Facebook Artificial Intelligence.Inmarathi
thehindu.com

२००९ मध्ये ज्याप्रमाणे फेसबुकला लोकप्रियता मिळत होती, हे पाहून चीनच्या सरकारने यावर एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या देशात फेसबुक वापरण्यावर बंदी घातली.

या घातलेल्या बंदीमुळे चीनमधील लोक सकारवर संतापली आणि त्यांनी याच्याविरोधी आवाज उचलला. त्यामुळे चीनने फेसबुकसारखे स्वत:चे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म तयार केले आणि त्याचे आज फेसबुकपेक्षा देखील जास्त वापरकर्ते आहेत.

२. अवतार चित्रपट

 

avatar-InMarathi

२००९ मध्ये अवतार हा चित्रपट रिलीज झाला होता. हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर दोन आठवड्यांमध्येच या चित्रपटाने चीनमध्ये भरघोस कमाई केली होती.

पण हा चित्रपट चीनी चित्रपटांपेक्षा जास्त प्रसिद्ध होऊ नये, यासाठी चीन सरकारने या चित्रपटाच्या टूडी वर्जनवरती बंदी घातली, पण या चित्रपटाचे थ्रीडी वर्जन चालू होते.

३. कॅसिनो (जुगार)

 

casino inmarathi

जर तुम्ही चीनमध्ये असाल आणि तुम्हाला एखाद्या कसिनोमध्ये जाण्याची इच्छा झाली, तरीदेखील तुम्ही जाऊ शकत नाही, कारण येथे कोणतेही कसिनो नाही. चीनमध्ये कुणालाही कासिनो सुरू करण्याची परवानगी दिली जात नाही.

१९४९ पासून चीनमध्ये कसिनोवर बंदी घालण्यात आली आहे. येथे फक्त चीनमध्ये सरकारतर्फे चालू करण्यात आलेल्या दोन लॉटरी चालतात.

४. जॅसमीन (जाईचे फूल)

 

Jasmine Flower Inmarathi

ट्युनेशियामध्ये झालेल्या जॅसमीन क्रांतीनंतर जीनमध्ये जाईच्या फुलावर बंदी घालण्यात आलेली आहे. येथे जाईच्या फुलाची विक्री होत नाही आणि ते घरामध्ये सजवता देखील येत नाही. एवढेच काय, येथे जाईच्या फुलावरील गाणे गाण्यावर देखील बंदी आहे.

तुम्ही येथे जाईचे नाव जरी घेतले, तरी देखील तुम्हाला गुन्हेगार ठरवले जाते. जाईवरील ही बंदी २०११ पासून सुरू करण्यात आलेली आहे.

५. अॅलिस इन वंडरलँड

 

Alice In Wonderland Book InMarathi

अॅलिस इन वंडरलँड ही चार्ल्स लुटविज डॉजसन यांनी लुईस कॅरोल या टोपणनावाने लिहिलेली कादंबरी आहे. या कादंबरीवर चीनमध्ये १९३१ पासून बंदी घालण्यात आलेली आहे.

या कादंबरीमधील जनावरांनी माणसांसारखे बोलणे चीनला आवडले नाही. यामध्ये जनावरे आणि माणसांना समान दर्जा दिला गेला आहे, असे चीनचे मत आहे आणि ते त्यांना पटलेले नाही.

६. सैनिकांसाठी इंटरनेट

 

Army Internet InMarathi

लष्कराची गोपनीय माहिती कुठेही लिक होऊ नये, यासाठी येथील लष्करातील जवानांना इंटरनेट वापरण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. त्यांना ऑनलाईन डेटिंग, मैत्री आणि जॉबही इंटरनेटवरून शोधता येत नाही.

या लष्करातील लोकांना इंटरनेट कॅफेमध्ये जाऊनही इंटरनेट वापरण्यास बंदी आहे.

(हे देखील वाचा : डुप्लिकेट वस्तू बनवण्यात चिन्यांना कोणीही पाठी काढू शकत नाही. जाणून घ्या असं का?)

७. हॅरीसन फोर्ड आणि रिचर्ड गेर

 

harrison-ford-and-richard-gere InMarathi

चीनमध्ये काही परदेशी स्टार्सवर देखील बंदी आहे. हॅरीसन फोर्ड आणि रिचर्ड गेर या दोघांनी एकदा तिबेटचे समर्थन केले होते. त्यामुळे या दोघांना चीनमध्ये जाण्यास सक्त मनाई करण्यात आलेली आहे. त्यांना तिथे प्रवेश देण्यात येत नाही.

८. ब्रॅड पिट

 

Brad Pitt InMarathi

ब्रॅड पिट या हॉलीवूड सुपरस्टारने १९९७ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सेव्हन इयर्स इन तिबेट’ या चित्रपटामध्ये काम केले होते. त्यामुळे त्याच्यावर चीनने बंदी घातलेली आहे. १९९७ पासून ही बंदी त्याचावर घालण्यात आली.

९. माईली सायरस

 

Miley Cyrus inMarathi

माईली सायरस या प्रसिद्ध गायिकेने २००९ मध्ये मित्रांबरोबर चीनी लोकांसारखे डोळे करून फोटो काढले होते. हे तेथील सरकारला आवडले नाही, हा त्यांना आपल्या लोकांचा अपमान वाटला, म्हणून माईली सायरसवर २००९ पासून चीनने बंदी घातली आहे.

१०. ट्विटर

 

Twitter Inmarathi

फेसबुक जसे सोशल मिडियाचे मोठे प्लॅटफॉर्म आहे, त्याचप्रमाणे ट्विटर देखील आहे. चीनमध्ये फेसबुक सारखीच ट्विटरवर देखील बंदी घालण्यात आलेली आहे.

चीनने असे काही फायरवॉल बनवले आहे, ज्यामध्ये जवळपास १००० वेबसाईटवर बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये फेसबुक आणि ट्विटरचा देखील समावेश आहे.

 

CHINA-PAK InMarathi

या आणि यांसारख्या इतर काही गोष्टींवर चीनने बंदी घातलेली आहे आणि या बंदी लोकांवर जबरदस्ती लादण्यात आलेल्या आहेत. मग आता तुम्हीच ठरवा की, चीनने घातलेले हे बॅन योग्य आहेत की अयोग्य.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

 

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?