' शॉपिंग मॉलमध्ये गरजेपेक्षा जास्त खर्च कसा होतो? या तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर हे नक्की वाचा – InMarathi

शॉपिंग मॉलमध्ये गरजेपेक्षा जास्त खर्च कसा होतो? या तुमच्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर हे नक्की वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

खोगिरभरती.. हा शब्द आपण ऐकला असेल. नको असलेल्या वस्तू जमवणे म्हणजे खोगिरभरती. यामध्ये महिला आघाडीवर असतात असं काही पुरुषांचं म्हणणं असतं. तसेच महिलांनंतर बालहट्टही आपल्याला पुरवावे लागतात.

त्यातच हल्लीचे मॉल्स म्हणजे आणखी खिश्याला कात्री. मॉलच्या झगमगत्या प्रकाशात आणि लाडावून बोलणाऱ्या त्या सेल्समन्सच्या नादात कधी आपला खिसा खाली होतो हे कळतच नाही.

मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येकाने त्या मॉलमधून काहीना काही खरेदी करावी यासाठी तेथील व्यापारी नवनवीन शक्कल लढवत असतात. आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत की, कश्या प्रकारच्या स्मार्ट ट्रिक्सने आपण या मॉल वाल्या मंडळींचे “गिऱ्हाईक” होऊन बसतो.

 खाद्यपदार्थ

प्रवेशद्वारावरच तुम्हाला बेकरी प्रोडक्ट्स किंवा अशा काही पदार्थांचा वास येईल की तुमची भूक चवताळेल. या पदार्थांची रचना अतिशय आकर्षक व सगळे पदार्थ सहज दिसतील अशी असते. ते बघून तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि तुम्ही ते विकत घ्याल याची काळजी घेतली जाते.

शिवाय तेथे गेल्यावर आपल्या लक्षात येते की, एकतर या पदार्थांची किंमत जास्त असते. दुसरे म्हणजे कमी किमतीचे पदार्थ हे सहसा एक नग उपलब्ध न ठेवता ते कमीतकमी दोन किंवा त्यापेक्षा जास्त घेणे बंधनकारक असते. अशावेळी आपण पोटासाठी काय एवढा विचार करायचा म्हणत किंमत आणि विक्रेत्याच्या चलाखीकडे दुर्लक्ष करत काहीतरी घेतोच.

 

bakery-in-mall-inmarathi
eatout.com

 

रचना

मॉलमध्ये आल्यावर आपल्या नजरेत भरतील असे फेमस कंपनींचे भलेमोठ्ठे प्रोडक्ट आकर्षक पद्धतीने ठेवलेले असतात. तसेच तुम्हाला ते सहज दिसतील याची विशेष काळजी घेतली जाते.

त्याच प्रोडक्टची लहान साइज ही नजरेत बसणार नाही अशी ठेवली असते. ज्या कंपनीचे प्रॉडक्ट कमी किमतीचे किंवा कमी नफ्याचे असते ते शेल्फच्या अगदी खालच्या बाजूला जिथे सहज नजर जाणार नाही अशा ठिकाणी ठेवलेली असते.

यामागे मानसशास्त्रीय कारण आहे. ते असे की, ग्राहक त्यांच्या नजरेच्या टप्प्यात आणि डोळ्यांच्या रेषेत असणाऱ्या गोष्टी पटकन खरेदी करतात. त्या रेषेच्या अगदी वरती वा खाली असणाऱ्या वस्तूंकडे ते सहसा लक्ष देत नाहीत.

 

big-bazar-inmarathi

 

रंगसंगती 

एखाद्या प्रोडक्टचा खप वाढवण्यासाठी आकर्षक, सुंदर व सुडौल मॉडेल दाखवले जातातच. पण त्या प्रोडक्टची विक्री करण्याच्या ठिकाणी आकर्षक मांडणी आणि रंगसंगती केली जाते. तुम्ही ज्यावेळी एखादे प्रोडक्ट बघता त्यावेळी तिथे त्या मॉडेलचे पोस्टर तर असतेच पण, तिथे तुम्हाला मुक्तपणे फिरण्यासाठी जागाही सुटसुटीत असते.

आकर्षक रंगसंगती असली की ग्राहक नकळतपणे उत्पादन काय आहे हे बघायला जातात. बरेचदा गरज नसताना ते खरेदीही करतात.

 

display-mall-inmarathi
charles-display-inmarathi

डिस्काउंट

डिस्काउंट हा भारतीयांच्या जिव्हाळ्याचा आणि परवलीचा शब्द आहे. डिस्काउंट दिसला की, आपण नको असलेल्या गोष्टीही विकत घेतो. कारण एकच त्यावर डिस्काऊंट असतं आणि पुढच्यावेळी तो नसेल तर पश्चाताप व्हायला नको. मोठ्या आकारात डिस्काउंटचे फ्लेक्स लावलेले असतात.या डिस्काउंट मध्ये मोठ्या गमती असतात. त्या पुढीलप्रमाणे.

१. ज्या वस्तूंचा लवकर खप होत नाही त्यांच्यावर ऑफर ठेवली जाते.

२. प्रसिद्ध उत्पादनावर नवीन आलेले उत्पादन मोफत दिले जाते जेणेकरून ग्राहकांना त्याची ओळख होईल. एकदा का ते आवडले की, नंतर पैसे मोजून विकत घेतलेच जाते.

३. कपड्यांच्या बाबतीत एकाच नगाची किंमत चिक्कार वाढवली जाते आणि मग त्यावर दुसरा नग मोफत दिला जातो.

४. डिस्काऊंट नसतो त्या वस्तू डिस्काऊंट असलेल्या प्रोडक्टच्या अवती भवती अत्यंत चलाखीने ठेवलेल्या असतात. जेणेकरून तुम्ही त्या घ्याव्यात. ज्यावेळी आपण त्या काऊंटरवर घेऊन जातो त्यावेळी त्यावर डिस्काउंट नसल्याचे लक्षात येतं.

 

discount-mall-inmarathi
hozpitality

 

आवश्यक वस्तू आणि आकार

तुम्ही आवश्यक वस्तू घेण्यासाठीच मॉलमध्ये आलेले आहात याची पूर्ण कल्पना मॉलच्या मॅनेजर्सना असते. म्हणून ते तुम्हाला आवश्यक असलेल्या वस्तू तुमच्या गरजेपेक्षा जास्त मोठ्या पॅकमध्ये ठेवतात. वस्तू नेहमीच लागणार आहे हा विचार करुन तुम्ही मोठा पॅक घेता.

यामुळे त्या माॅॅलचे ठरवून दिलेले टार्गेट पूर्ण होते व कंपनीकडून त्याचा मोबदलाही मिळतो. शिवाय वस्तू भरपुर असल्याने तुम्ही मनमोकळेपणाने वापरता, ती लवकर संपवता व परत खरेदी करायला जाता.

 

grocerystore-inmarathi
Grocerystoreaisle.com

 

वेळेचे भान न रहावे अशी व्यवस्था

तुम्ही मॉलमध्ये, शॉपिंग करण्याच्या ठिकाणी तुम्हाला घड्याळ शोधूनही सापडणार नाही. कारण जर तुम्हाला वेळेचं भान आलं तर तुम्ही आवश्यक वस्तू घेऊन लवकर बाहेर पडाल. शिवाय तेथे खिडक्याही नसतात जेणेकरून आपण खरेदी करता करता बाहेर अंधार पडलाय हे ही आपल्या लक्षात येत नाही.

वेळेचे भान नसले की, ग्राहक कामाशिवाय जास्त वेळ घालवतो. या नादात आवश्यक नसलेले पदार्थ, वस्तू विकत घेतले जातात.  म्हणून इतक्या मोठ्या मॉलमध्ये घड्याळाची व्यवस्था काही केली जात नाही.

 

mall-inmarathi
viettower.ccom

मॉलमध्ये गेल्यावर काय टाळावे 

तुमच्या खिशातील कमीत कमी पैसे मॉलमध्ये खर्च व्हावेत असं तुम्हाला वाटतं का ? तर मग तुम्ही तुमच्या लहान मुलांना मॉलमध्ये घेऊन जाणे टाळा. तसेच तुमच्या पत्नी किंवा पती बरोबर जाणेही टाळा. ते तुमच्या बजेटपेक्षा जास्त खरेदी करू शकतात.

त्याचप्रमाणे मॉलमधील कार्ट वापरू नका त्यामुळे होते असे की आपण फक्त गरजेपुरती शॉपींग केली तर ती त्यामध्ये अगदी थोडी वाटते उचलण्याचा त्रास नसल्याने आपण सहज ती उचलून पटापट आपल्या कार्टमध्ये टाकतो. घरी गेल्यावर आपल्या लक्षात येते की यातल्या काही गोष्टी आपण वापरणारच नाही आहोत .

 

family-in-mall-inmarathi

 

अशाप्रकारे मॉलमध्ये आपल्याकडून पैसे काढून घेतले जातात आणि तेही हसत हसत… खरंतर ग्राहकांकडून अधिकाधिक नफा करून घेण्याच्या या कल्पना दाद देण्याजोग्या आहेत. पण आपल्या खिशाचा विचार करता, यानंतर मॉलमध्ये खरेदी करताना वरील बाबी लक्षात ठेवणे  गरजेचे आहे… म्हणजे पैसे निरुपयोगी वस्तूंवर खर्च होणार नाहीत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?