'पॅरा ऑलम्पिकमधील भारताचे ‘पदकवीर’

पॅरा ऑलम्पिकमधील भारताचे ‘पदकवीर’

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

ब्राझीलच्या रियो डी जानेरो शहरात सुरु असलेल्या पॅरा ऑलम्पिकमध्ये भारताच्या नावे पदकाचं खातं उघडण्याच्या बातम्या प्रसारित होऊ लागल्या आणि पुन्हा एकदा भारतामध्ये ऑलम्पिक हा विषय ट्रेंडीन्ग ठरला.

तामिळनाडू राज्यातील २१ वर्षीय मरियप्पन थंगावेलू आणि उतर प्रदेशाच्या २० वर्षीय वरूण सिंह भाटी यांनी हाय जंम्प खेळ प्रकारामध्ये अनुक्रमे ‘सुवर्णपदक’ आणि कांस्यपदक’ जिंकून इतिहास रचलाय.

paralympics-marathipizza01

स्त्रोत

दीपा मलिक ने गोळा फेक मधे रौप्य पदक जिंकून उरलेली रिकामी जागा भरली आहे! 😀

छातीपासून खाली पूर्ण अपंग असलेल्या दीपाचं हे यश आपले डोळे दिपवणारं आहे.

दीपाची कामगिरी विशेष कातुकास्पद ठरते – कारण पॅरा ऑलम्पिकमध्ये भारतातर्फे पदक जिंकणारी ती पहिली महिला खेळाडू आहे.

deepa-malik-marathipizza

हाय जंम्प प्रकारामध्ये मरियप्पन थंगावेलू याने सर्वात उंच १.८९ मीटर जंम्प मारून सुवर्ण पदकावर नाव कोरलं, तर याच प्रकारामध्ये १.८६ मीटर जंम्प मारून वरूण सिंह भाटी याने कांस्यपदक पदकावर नाव कोरलं.

दुसऱ्या क्रमांकासह अमेरिकेच्या सॅम ग्रैव याने रौप्य पदक पटकावले.

paralympics-marathipizza02

स्त्रोत

मरियप्पन जेव्हा पाच वर्षांचा होता तेव्हा एक अपघातात त्याला आपला पाय गमवावा लागला. पण जिद्द नं हरता आपल्या गरीब आईसाठी काहीतरी करून दाखवण्याच्या इर्षेने तो हाय जंम्प खेळामध्ये उतरला आणि आपल्या देशासाठी सुवर्णपदक मिळवून त्याने आपल्या आईची मान अभिमानाने उंचावली!

paralympics-marathipizza03

स्त्रोत

वरूण सिंह भाटी याला लहानपणीच पोलियोमुळे आपल्या पायाला मुकावे लागले, परंतु खेळाची आवड असलेल्या वरूणने आपला छंद जोपासला. आणि शाळेतील खेळांच्या स्पर्धेमध्ये हमखास पारितोषिक पटकावणाऱ्या या मुलाने थेट पॅरा ऑलम्पिक पर्यंत भरारी घेत कांस्यपदकाला गवसणी घातली.

paralympics-marathipizza04

स्त्रोत

या तीन्ही खेळाडूंच्या अद्वितीय यशाचे सर्वच स्तरांतून तोंडभरून कौतुक होत आहे.

पॅरा ऑलम्पिक ७ सप्टेंबर ते  १६ सप्टेंबर या कालावधीत खेळवण्यात येणार असून आतापर्यंत भारताच्या नावावर ३ पदके जमा झाली आहेत. त्यात एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य पदकांचा समावेश आहे.

 

paralympics-marathipizza05

स्त्रोत

खेळाच्या मैदानात केवळ शरीराने सुदृढ असणे आवश्यक नसते…मन खंबीर असायला हवं, हे या खेळाडूंनी सिद्ध केलं आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 38 posts and counting.See all posts by vishal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?