' मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ गरजूंसाठी समाजपयोगी उपक्रम राबवणारे दांपत्य! – InMarathi

मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या स्मरणार्थ गरजूंसाठी समाजपयोगी उपक्रम राबवणारे दांपत्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपल्या भारतामध्ये एखाद्या माणसाचा मृत्यू झाला की, त्याच्या घरातील लोक त्याच्या आठवणीने काही न काही लोकांना देतात किंवा त्याच्या श्राद्धाच्या वेळी आजूबाजूच्या लोकांना आणि नातेवाईकांना जेवण खाऊ घालतात. तशी प्रथाच आपल्या भारतामध्ये आहे.

पण असे लोकांना जेवण घालणे हे एकदा किंवा दोनदाच घडते, रोज कुणीही एखाद्याच्या स्मरणार्थ जेवण देत नाही, कारण तसे करण्यासाठी काहींकडे पैसे नसतात आणि पैसे असले तरी देखील ते कुणीही ह्यासाठी वाया घालवत नाहीत.

 

indian thali inmarathi

 

पण आज आम्ही तुम्हाला अश्या पालकांची गोष्ट सांगणार आहोत, ज्यांनी आपल्या मुलाच्या मृत्युनंतर त्याच्या स्मरणार्थ जवळपास १०० वयोवृद्ध माणसांना रोज मोफत जेवण देत आहेत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा डिलीव्हरी बॉयने सुरु केला अफलातून व्यवसाय कमावतोय महिना ८० हजार!

हे ऐकून तुम्ही नक्कीच चकित झाला असाल, पण हे खरे आहे. चला तर मग आज आपण जाणून घेऊया, या गोष्टीमागील संदर्भ..

 

tanna brother inmarathi

 

मुंबईतील एक मध्यवर्गीय जोडपे प्रदीप तन्ना आणि त्यांची पत्नी दमयंती तन्ना मुंबईत गेल्या पाच वर्षांपासून मोफत खाणावळ सेवा सुरू केली आहे. २०११ मध्ये रेल्वे अपघातामध्ये मरण पावलेल्या मुलाच्या स्मरणार्थ ही खाणावळ सेवा सुरू करण्यात आलेली आहे.

ही खाणावळ सेवा खास घरातून बाहेर काढण्यात आलेल्या जेष्ठ नागरिकांसाठी चालू करण्यात आलेली आहे.

या दाम्पत्याच्या मुलाचे नाव निमेश होते. निमेशचा २३ व्या वर्षी चालत्या रेल्वेमधून पडून मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्युनंतर त्याच्या स्मरणार्थ या ट्रस्टला त्याचे नाव देण्यात आले.

या खाणावळ सेवेद्वारे दररोज जवळपास १०० जेष्ठ नागरिकांना मोफत जेवण दिले जाते. २०११ मध्ये निमेश तन्ना मिटिंगला जाण्यासाठी लोकल ट्रेनमध्ये चढला. पण त्याला काय माहित होते की, त्याला ही मिटिंग त्याच्या कुटुंबीयांपासून कायमचे दूर नेणार आहे.

जरा डोकावून बघण्यासाठी निमेशने लोकलच्या बाहेर डोक काढलं तेवढ्यात ट्रॅकला लागून असलेला पोल त्याच्या डोक्याला लागला आणि त्या झटक्यामुळे तो लोकलबाहेर फेकला गेला. या अपघातात नितेशचा जागीच मृत्यू झाला.

 

Mumbai Story.Inmarathi1

पोलिसांनी जेव्हा ही बातमी नितेशच्या पालकांना म्हणजेच प्रदीप तन्ना आणि दमयंती तन्ना यांना दिली, तेव्हा जणू काही त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. या अचानक ओढवलेल्या प्रसंगामुळे त्या दोघांचे जीवन अस्ताव्यस्त झाले.

कितीतरी दिवस त्याच्या आठवणीमध्येच ते जगत  होते. त्याची आठवण नेहेमी ठेवण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी त्याला खूप वेगळ्या मार्गाने श्रद्धांजली दिली आहे.

गरजूंना मोफत अन्न पुरवण्याच्या उद्देशाने ‘श्री निमेश तन्ना चॅरीटेबल ट्रस्टची (एसएनटीसीटी)’ सुरुवात करण्यात आली. हे ट्रस्ट २६ जानेवारी २०१३ रोजी नोंदणीकृत झाले होते.

एसएनटीसीटी सुरुवातीला स्वतःच्या स्वयंपाक घरातून ३० जणांना मोफत अन्न पुरवत होते.

एसएनटीसीटी आता १०० पेक्षा जास्त लोकांसाठी मोफत अन्न प्रदान करत आहे आणि गेल्या दोन वर्षापासून त्यांनी एकही दिवस या कामात खंड पडू दिलेला नाही.

यासाठी त्यांच्या मुलुंडमधील घरी त्यांनी नवीन स्वयंपाकघर तयार केले आहे, जिथे सात कर्मचारी समृद्ध आहार तयार करतात.

 

damayanti mr & mrs inmarathi

 

हे अन्नपदार्थ वेळेवर पोहोचले पाहिजेत, यासाठी त्यांनी मुंबई शहरातील जागतिक प्रसिद्धी असलेल्या डबेवाल्यांची मदत घेतली. बिजनेस स्टँडर्डच्या एका अहवालानुसार, दमयंती तन्ना म्हणाल्या की,

“आम्ही ११० नागरिकांना शिजवलेले अन्न पुरवतो. तसेच दरमहिन्याला आम्ही १०० लोकांना धान्य पुरवतो. जेणेकरून ते स्वतःच अन्न शिजवून खाऊ शकतील. त्याचबरोबर आम्ही कपडे, पुस्तके, स्टेशनरी आदिवासी भागातील गरजू मुलांना देतो. ज्या वृद्ध व्यक्तींना त्यांच्या मुलांनी बाहेर काढले आहे, अश्या लोकांना मोफत डब्बा पुरवतो.”

हे ही वाचा – बालपणी उपासमार सहन केल्याने आता २००० हून अधिक मुलांची भूक भागवणाऱ्या ह्या मुलाला सलाम!

damyanti mess

पुढे बोलताना दमयंती म्हणाल्या की,

“आम्ही हे सर्व आपल्या पैशाने करतो आणि यामध्ये आमचे मित्र आणि नातेवाईक आम्हाला मदत करतात. तसेच आम्ही धर्म, पंथ, वर्ग यावर विश्वास ठेवत नाही” असेही त्या म्हणाल्या…

 

damayanti inmarathi

 

प्रदीप तन्ना यावर म्हणाले की,

“आमच्या मुलाच्या मृत्युनंतर आम्ही खूप हताश झालो होतो, आता काय करावे हे आम्हाला समजत नव्हते. तेव्हा आम्ही केवळ आमचे जीवन जगण्याचा निर्णय घेतला नाही, तर आमच्या मुलाची आठवण जिवंत ठेवण्याचा निर्णय घेतला.

माझ्या पत्नीने हे करण्यास सुचवले होते. आम्ही जात, धर्म, पंथ यांच्यात फरक करत नाही. आम्ही केवळ त्यांनाच अन्न देतो, ज्यांचे वय ६० वर्षापेक्षा जास्त आहे आणि ज्यांना अन्नाची गरज आहे. आम्ही गेल्या पाच वर्षापासून असे करत आहोत.”

या दाम्पत्यामुळे गरजू लोकांना अन्न मिळत आहे आणि त्यामुळे त्यांच्या मुलाची आठवण देखील सदैव त्यांच्या मनात जागृत राहत आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?