विमानातील विष्ठा नेमकी जाते कुठे? प्रत्येकाला भेडसावणा-या या प्रश्नाचं शास्त्रिय उत्तर
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
विमान प्रवास न आवडणारी व्यक्ती क्वचितच! लहानपणी आकाशात झेपावलेलं विमान पाहिलं की एकदा तरी विमानात बसावं ही इच्छा मनात येतेच.
काहींची ही इच्छा लहान वयात पुर्ण होते तर काहींना वाट पहावी लागते.
एअरपोर्टवरचा थाट, झगमगते दिवे, पांढ-याशुभ्र विमानातली आपली सीट, खिडकीतून खुणावणारे आकाश हा अनुभव प्रत्येकाने किमान एकदा तरी घ्यावाच असं म्हटलं जातं. विमानात एअर हॉस्टेस कडून केली जाणारी सरबराई, खाण्यापिण्याची चंगळ यांची तर मजा काही औरच.
अर्थात हा अनुभव चित्तथरारक असला तरी पहिला विमान प्रवास मात्र अविस्मरणीय ठरतो. पहिल्यांदाच हा नव्या जगात सफर करताना काही अडचणी येतात तर काही भन्नाटट गोष्टींचा शोध लागतो.
त्यातलीच एक बाब म्हणजे विमानातील शौचालय.
पहिल्यांदा विमान प्रवास करताना मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. जसे की विमानात कसं वावरावं? नेमक्या कोणत्या गोष्टी कराव्यात? कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी? कशाला प्राधान्य द्यावं? स्वत:ला कम्फर्टेबल फील कसं करून घ्यावं? वगैरे वगैरे…
पण ह्यापेक्षाही सगळ्यात मोठा प्रश्न आपल्या समोर असतो तो म्हणजे शौचास झाली तर काय करावे… कारण आपल्या मनात भीती असते की, विमानात शौचास नेमकं कसं बसावं? शौचालयाचा वापर कसा करावा? आणि मुख्य म्हणजे आपल्या शरीरावाटे बाहेर पडलेली विष्ठा नेमकी जाणार तरी कुठे?
बरेच जण विमानात असल्यावर ह्या भीतीने शौचास जाण्यास घाबरतात की आपल्या शरीरावाटे बाहेर पडलेली विष्ठा नेमकी जाईल तरी कुठे, पण खरचं अशी विष्ठा रोखून धरणे शरीरासाठी अपायकारक आहे.
आपल्या शरीरावाटे बाहेर पडलेली विष्ठा विमानातून नेमकी जाते तरी कुठे? ह्या प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर द्यायचं तर – आपल्या पोटातून बाहेर पडलेली विष्ठा ही विमानाच्या पोटात जाते.
अजूनही लक्षात येत नाहीये? ठीक आहे चला तर मग सविस्तर जाणून घेऊया…
प्रत्येक विमानात प्रवाश्यांची विष्ठा गोळा करण्यासाठी टँक ठेवलेले असतात. ज्यांना सक्शन टँक किंवा होल्डिंग टँक म्हणतात. जेव्हा तुम्ही फ्लश करता तेव्हा तुमची विष्ठा ही थेट या टँकमध्ये जाऊन जमा होते.
परंतु ह्या टँकची देखील एक क्षमता आहे. त्यामुळे एकदा का टँक संपूर्ण भरला की तो तत्काळ बंद करणे गरजेचे असतं. कारण तसं केलं नाही आणि टँकच्या क्षमतेपेक्षा जास्त विष्ठा त्यात सामावली तर ती विष्ठा त्या टँक मधून बाहेर येऊन उडत्या विमानातून खाली जमिनीवर पडू शकते.
म्हणजे ती विष्ठा कोणाच्या घरावर, बागेत किंवा चालणाऱ्या माणसाच्या शरीरावरही जाऊन स्थिरावू शकते आणि पूर्वी अश्या घटना झालेल्या आहेत बरं का!
एक टँकमध्ये २० गॅलन इतकी विष्ठा सामावू शकते. आता तुम्ही विचार करत असाल ह्या टँकचं पुढे काय होतं? तर मंडळी विमान एकदा का जमिनीवर उतरलं की लॅवेटोरी सर्विस ट्रक तेथे आणला जातो.
आणि त्या माध्यमातून विष्ठेने भरलेले टँक खाली केले जातात आणि अश्याप्रकारे विमानातील विष्ठा बाहेर फेकली जाते.
काय? मिळालं ना ह्या चक्रम प्रश्नाचं लॉजिकल उत्तर !
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
that’s right