' आईन्स्टाईनच्या हस्ताक्षरातील "सुखी होण्याचं गुपित" लिलावात विकलं गेलंय!

आईन्स्टाईनच्या हस्ताक्षरातील “सुखी होण्याचं गुपित” लिलावात विकलं गेलंय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अल्बर्ट आईन्स्टाईन या महान व्यक्तीला आपण सर्वच ओळखतो. २० व्या दशकातील एक महान भौतिकशास्त्रज्ञ आणि विज्ञानातील महान व्यक्ती म्हणून त्यांना ओळखले जाते. अल्बर्ट आईन्स्टाईन यांचा जन्म १४ मार्च, १८७९ रोजी जर्मनीमधील उलम येथे झाला होता. अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी जगाला विशेषत्वचा सिद्धांत दिला.

त्यांच्यासारखी विद्वान माणसं या जगामध्ये खूप कमी होऊन गेली आहेत. पण त्याचं नाव आणखी एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहेत, त्यांनी सुखी जीवन जगण्यासाठी एक सल्ला लिहिला होता आणि हा टीप दिलेला कागद चक्क एक मिलियन डॉलरला म्हणजे भारतातील जवळपास ६ कोटींना विकला गेला. चला तर मग जाणून घेऊया या माहितीचा आढावा..

 

Albert einstein.inmarathi
echoes.org

 

वॉल्टर इसास्कोनने लिहिलेली आत्मकथा “आईन्स्टाईन: हिज लाइफ अँड युनिव्हर्स” नुसार नोव्हेंबर १९२२ मध्ये, अल्बर्ट आईन्स्टाईन हे एका व्याख्यान मालिकेसाठी युरोपातून जपानला गेले होते. त्यासाठी त्या जपानमधील अजमान प्रकाशकांनी २००० पौंड त्यांना दिले होते. आईन्स्टाईन यांना वयाच्या ४३ व्या वर्षी भौतिकशास्त्रासाठी नोबेल पुरस्कार देण्यात आला होता.

अल्बर्ट आईन्स्टाईन हे जेव्हा जपानला येणार याची बातमी लोकांना समजली. त्यावेळी या नोबेल पारितोषिक मिळालेल्या माणसाची एक झलक पाहण्यासाठी हजारो लोकांनी एकच गर्दी केली होती.

हे सर्व पाहून अल्बर्ट आईन्स्टाईन हे प्रभावित झाले, पण एवढी प्रसिद्धी आणि प्रेम पाहून त्यांना लज्जास्पद वाटले. टोकियोच्या इंपिरियल हॉटेलच्या एक रुममध्ये एकांतात त्यांनी आपले विचार आणि भावना लिहून काढण्याचा प्रयत्न केला.

 

Albert-einstein.inmarathi1
timesofisrael.com

 

एएफपीच्या म्हणण्यानुसार, जेव्हा आईन्स्टाईन त्या हॉटेलमध्ये होते, तेव्हा एक पोस्टमन किंवा कुरियरवाला एका पत्राची डिलिव्हरी देण्यासाठी आला, तेव्हा त्याने त्यांनी दिलेली टीप घेतली नाही किंवा त्यांचाकडे त्याला देण्यासाठी पैसे नव्हते, म्हणून आईन्स्टाईन यांनी दोन लहान नोट्स लिहून त्याला दिल्या.

जर्मनीच्या हॅम्बर्ग येथे राहणाऱ्या आणि त्या पोस्टमन किंवा कुरियरच्या नातेवाईक म्हणजेच लेटरच्या विक्रेत्यानुसार, त्यावेळी आईन्स्टाईन म्हणाले की, ‘जर तुझे नशीब चांगले असेल, तर एकेदिवशी या सुट्ट्यापैशांपेक्षा ह्या नोट्स अधिक किमतीच्या असतील.’

त्या दोन स्वाक्षांकित नोट्स, ज्यामध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी एक आनंदी आणि समाधानकारक जीवन कसे जगावे यावर विचार मांडला. या दोन्ही नोट्सचा लिलाव जवळपास १.८ मिलियन डॉलरमध्ये म्हणजेच जवळपास ११ कोटींना जेरुसलेम ऑक्शन हाऊसमध्ये झाला आहे.

‘न थकता परिश्रम करून कायम यशाच्या मागे धावण्यापेक्षा एक शांत आणि साधं आयुष्य जगा आणि तेच जीवन तुम्हाला खरा आनंद मिळवून देईल’, असे जर्मनीच्या हॉटेलमध्ये अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी लिहून ठेवले होते.

ते वाक्य लिहिलेला कागद १.५६ मिलियन डॉलरना म्हणजेच जवळपास १० कोटींना विकला गेला. विनर ऑक्शन आणि प्रदर्शन संस्थेच्या वेबसाईटनुसार, त्यांना वाटले होते की, हा कागद सुमारे ५००० डॉलर ते ८००० डॉलर पर्यंत विकला जाण्याची अपेक्षा होती. पण हा कागद एवढ्या मोठ्या किंमतीला विकला जाईल असे कोणालाही अपेक्षित नव्हते.

 

Albert einstein.inmarathi2
scmp.com

 

लिलावाचे मुख्य कार्यकारी गॅल विनर म्हणाले की, या नोटवर सुमारे २००० डॉलरपासून बोली सुरू करण्यात आली. पण फक्त २५ मिनिटांमध्येच ही बोली खूप मोठ्या प्रमाणात वाढली आणि एवढ्या मोठ्या रकमेला ही नोट विकली गेली.

‘जिथे इच्छा आहे, तिथे मार्ग आहे’, असे दुसऱ्या एका नोटवर लिहिले होते.

जी एका कोऱ्या कागदावर लिहिण्यात आली होती. लिलावादरम्यान ही नोट २४०००० डॉलरना म्हणजेच जवळपास १ कोटी ५६ लाखांना विकले गेले. ही नोट ६००० डॉलरना विकली जाणे अपेक्षित होते, पण ती खूप मोठ्या किंमतीला विकली गेली.

 

Albert einstein.inmarathi3
independent.co.uk

 

अल्बर्ट आईन्स्टाईन हे जेरुसलेमच्या हिब्रू विद्यापीठाचे संस्थापक होते. १९२३ मध्ये त्यांनी तिथे प्रथम वैज्ञानिक व्याख्यान दिले. त्यांनी आपल्या जवळच्या सर्व वैयक्तिक गोष्टी आणि आयुष्यभर केलेल्या सर्व संशोधनाचे अधिकार या संस्थेला दान केले.

१९२२ मध्ये त्यांनी केलेला जपान दौरा खूप यशस्वी झाला आणि त्याचा जपानला खूप फायदा झाला. अल्बर्ट आईन्स्टाईन यांच्यासारखे भौतिकशास्त्राचे विद्वान आजवर कुणीही झालेले नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?