आठ वर्षांची चिमुकली महिन्याला कमावते ८० लाख रुपये! जाणून घ्या कसे !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

युट्युब हे पैसा मिळवण्याचे उत्तम साधन आहे हे आपल्याला माहीतच आहे. पण त्याचा नेमका कसा वापर करावा आणि त्यातून कसे उत्पन्न मिळवावे हे बऱ्याच जणांना माहित नसते, पण एकदा का ती टेक्निक समजली कि बस मग काय कामाला जायची देखील गरज नाही इतका पैसा मिळू शकतो, सोबत प्रसिद्धी मिळते ती देखील वेगळी. यूट्यूबचे स्टार लोकप्रियता आणि कमाईच्या बाबतीत हॉलीवूड-बॉलीवूडच्या मान्यवरांची बरोबरी करत आहेत. अशीच एक स्टार शेफ आहे आठ वर्षीय चार्ली. ती यू-ट्यूबवर फूड चॅनल चालवते. या चॅनलद्वारे तिची दरमहा कमाई आहे १.२७ लाख डॉलर म्हणजे ८० लाख रुपये! काय ऐकून चक्रावलात ना…!  हो खरंच ह्या चिमुरड्या लाखो रुपये कमावतात!

charlie-marathipizza05
charliscraftykitchen.com

ह्या दोन चिमुरड्या आणि गोंडस मुलीचे युट्युब चॅनेल लाखो लोक नव्या रेसिपीसाठी सबस्क्राइब करतात. जाणून घेऊया या छोट्याशा सेलिब्रिटी शेफची कहाणी…

ऑस्ट्रेलियाच्या क्वीन्सलँडमध्ये राहणाऱ्या चार्लीचे संपू्ण नाव आहे मिनी मार्था स्टीवर्ट. चार्लीला केक, पेस्ट्री आणि कँडी बनवण्याचा छंद आहे. तीन वर्षांपूर्वी पालकांच्या मदतीने तिने यू-ट्यूबवर अकाउंट उघडले. त्याला नाव दिले चार्लीज क्राफ्टी किचन. ते आता यू-ट्यूबची प्रतिमा म्हणून स्थापित झाले आहे. चार्लीची छोटी बहीण अॅश्ले पाच वर्षांची असून ती चॅनलची ‘चीफ टेस्टर’ आहे.

charlie-marathipizza02
i.dailymail.co.uk

चार्लीने बनवलेल्या डिशचा स्वाद घेणे आणि त्यावर आपले मत नोंदवणे हे तिचे काम. ‘आउटरिगर मीडिया’ ही ऑनलाइन व्हिडिओ अॅडव्हर्टाइज कंपनी आणि ‘अॅड एज’च्या टॉप फूड चॅनल्सच्या यादीत चार्लीचे चॅनेल पहिल्या क्रमांकावर आहे. या दोघींचे हे यू-ट्यूब चॅनल आतापर्यंत जवळपास ३ कोटी वेळा पाहिले गेले आहे. साडेतीन लाख लोकांनी ते सबस्क्राइब केले आहे.

charlie-marathipizza03
i.ytimg.com

एवढ्या हिट्स मिळाल्याने चार्लीच्या चॅनलला खूप जाहिरातीही मिळतात. त्याद्वारेच चार्ली आणि अॅश्ले यांची कमाई होते. विशेष म्हणजे जगप्रसिद्ध सेलिब्रिटी शेफमध्ये गणना होत असलेले जेमी ऑलिव्हर या यादीत सर्वांत तळाशी आहेत. त्यांचे ‘फूडट्यूब’ हे चॅनल ६९ लाख लोकांनी पाहिले असून जेमी यांनी त्यातून फक्त २० लाख रुपये कमावले आहेत.

charlie-marathipizza04
i.ytimg.com

काय म्हणता? ह्याला नशीब म्हणायचं की मेहनतीचे फळ???

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?