'शिनचॅनच्या जन्मामागची दुःखद कथा!

शिनचॅनच्या जन्मामागची दुःखद कथा!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

शिनचॅन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो पाच वर्षांचा एक खोडकर, खट्याळ मुलगा, जो सदैव त्याच्या खोड्यांनी लहानापासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पोट धरून हसवतो.

अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या कार्टूनच्या जन्मामागची कथा मन हेलावून टाकणारी आहे.

 

shinchan-story-marathipizza01

स्त्रोत

ही कथा जपानच्या माणसांकडून आजही सांगितली जाते.

ही कथा एका जपानी आईची आहे. जिला आपल्या दोन्हीही मुलांना अपघातात गमवावं लागलं.

तिचं नाव मिसाई.

मिसाईला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्ये होती. मुलाचे नाव होते सिनोसुके नोहारा.

एकदा सिनोसुकेने पाहिले की त्याची लहानगी बहिण रस्त्यात खेळत आहे आणि समोरून येणाऱ्या वाहनाकडे तिचे लक्ष नाही. बहिणीचा जीव वाचवण्यास धावलेल्या सिनोसुकेचे प्रयत्न अपुरे पडले आणि वाहनाने दोघांना ही धडक मारली.

या अपघातात दोघा भावा बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला.

 

shinchan-story-marathipizza04

 

मिसाईला  त्यांच्या अकाली मृत्यूचा धक्का पचवणे फार कठीण गेले. ज्या दोन मुलांच्या आयुष्याची सुंदर स्वपे तिने रंगवली होती, त्यांचा असा दु:खद अंत पाहणे तिच्या नशिबी आले. पण या धक्क्यातून सावरत त्यांच्या स्मृती जतन करण्याचे तिने ठरवले. सिनोसुके आणि त्याच्या चिमुरड्या बहिणीसोबत  घालवलेल्या आनंदी आणि खोडकर क्षणांची आठवण म्हणून मिसाईने दरोरोज एका वहीमध्ये त्यांच्या गोड कार्टून्स स्टोरीज रेखाटण्यास सुरुवात केली.

shinchan-story-marathipizza02

स्त्रोत

मिसाईने जतन केलेल्या याच कार्टूनरुपी आठवणींनी प्रभावित होऊन ‘योशितो उसुई’ने क्रेयॉन शिनचॅन नावाच्या मांगा आणि ऍनाईम कार्टूनला जन्म दिला.

योशितो उसुईने नंतर स्वत:हून या कार्टूनसाठी लिखाण सुरु केले. आणि संपूर्ण जगभरात हे कार्टून हिट ठरले.

shinchan-story-marathipizza03

 

सध्या शिनचॅन कार्टूनच्या जन्मामागची ही कथा इंटरनेटवर व्हायरल झाली आहे आणि शिनचॅन प्रेमींमध्ये आपल्या लाडक्या शिनचॅनबदल हळहळ व्यक्त होत आहे.

 

हे गोड कार्टून पात्र खऱ्याखुऱ्या सिनोसुके नोहारा आणि त्याच्या बहिणीच्या स्मृती अखंड तेवत ठेवो आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर  नेहमी हासू फुलवत राहो हीच आशा!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 39 posts and counting.See all posts by vishal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?