' कास्टिंग काऊच – बॉलिवूडच्या सृजनशील गोजिऱ्या चेहऱ्यामागचं विकृत वास्तव – InMarathi

कास्टिंग काऊच – बॉलिवूडच्या सृजनशील गोजिऱ्या चेहऱ्यामागचं विकृत वास्तव

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बॉलिबुड असो वा हॉलीवूड महिलांना शय्यासोबत करायला सांगणे, त्याकरता प्रलोभनं दाखवणं, दबाव टाकणं हे काही नवीन नाही. त्यावर अनेक चित्रपटही आले आहेत. उदा. करीना कपूरचा हिरोईन, पेज थ्री इ.इ.

प्रियांका चोप्रा हिने सुद्धा एका मुलाखतीत, बॉलिवूडमध्ये महिलांना “काँप्रमाईज” म्हणजेच शय्यासोबत करण्यास सांगितले जात असल्याचा गौप्यस्फोट अप्रत्यक्षरित्या केला होता.

त्याकरता तिच्यावरही दबाव टाकण्यात आला असल्याचे तिने त्या मुलाखतीत उघड केले होते. तसेच त्याआधी एका राष्ट्रीय न्यूज चॅनलवर कंगणा रणौतनेही याबाबत वाच्यता केली होती.

 

priyanka-chopra-InMarathi
dnaindia.com

 

2000 साली विश्वसुंदरी हा किताब जिंकणाऱ्या प्रियंका चोप्राने बॉलिवूडमध्ये पदार्पण करून आज २० वर्षं झाली आहेत. तसेच काही काळापूर्वी तिने बेवॉच, क्वॉंटिको सारख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या मालिकांमध्ये देखील आपल्या अभिनयाने सर्वांना थक्क करून सोडले.

मेरी क्लिअर पॉवरट्रीप या मुलाखतीच्या कार्यक्रमात प्रियंका कास्टिंग काऊचच्या या अंधारमय जगाबाबत खुलासा केला.

 

casting couch in bollywood - InMarathi04jpg
deccanherald.com

 

महिलांवरच नाही तर पुरुषांवरही शय्यासोबत करण्यासाठी बॉलिवूडमध्ये दबाव आणला जातो.. हो हे खरं आहे.. दिसायला ग्लॅमरस आणि स्वप्नवत वाटणाऱ्या या बॉलिवूड इंडस्ट्रीचं हे एक भयावह असं वास्तव आहे…

कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी इरफान खान या कलाकाराची झुंज अपयशी ठरली. तो सगळ्यांचाच लाडका आणि उत्कृष्ट अभिनेता होता. मात्र याच अभिनेत्याने बॉलीवूडचे एक भयाण वास्तव आणि त्याचा त्याने घेतलेला अनुभव जगासमोर मांडला होता.

 

irfan-khan-inmarathi

 

पुरुषांवरही शय्यासोबत करण्यासाठी दबाव आणला जातो, असा खुलासा दिवंगत अभिनेता इरफान खान याने केला होता. इरफान सारख्या व्यक्तीने याविषयी भाष्य करणं, म्हणजे या बॉलिवूड इंडस्ट्रीचा खरा चेहरा समोर आल्यासारखं होतं.

एका दशकाहून अधिक काळ इरफानने आपल्या अपर कष्टाने आणि अभिनयाने बॉलिवूडमध्ये आपले विशेष स्थान निर्माण केले होते.

सलाम बॉंम्बे, मकबूल, स्लम डॉग मिलियनर, पानसिंग तोमार इत्यादी भुमिकांसाठी नावाजलेला कलाकार म्हणजे इरफान खान!!! त्याचा अभिनय हा अगदी नैसर्गिक होता. दर्शकांसोबत कनेक्ट होण्याची हातोटी त्याच्याकडे होती.

अभिनेता म्हटलं की, सिक्स पॅक अॅब्स, दिसायला देखणा, गोरा-गोमटा चेहरा अशी वस्तुस्थिती असताना यापेक्षा अगदी विपरीत क्वॉलिटीज असून देखील निव्वळ आपल्या अभिनयाच्या जोरावर गाजलेल्या काही निवडक अभिनेत्यांपैकी इरफान हा एक होय.

 

irfan-khan-featured-inmarathi

 

सर्वसाधारण चेहरा, मोठ्ठे डोळे दिलखेचक संवादफेक कमी पण ऑफबीट सिनेमांतच महत्वाची भूमिका, ही त्याची वैशिष्ट्ये होती. इरफान म्हणाला होता की, बॉलिवूडमध्ये शय्यासोबत करण्यासाठी त्यच्यावर दबाव टाकण्यात आला होता. पण त्याने तसे करण्याला नकार दिला.

“या गोष्टी स्त्रियांसोबत अधिक प्रमाणात होत असल्या तरी पुरुषांवरही यासाठी दबाव टाकला जातो. पण आपल्या हातात अशा ऑफर नकारण्याचं धैर्य असायला हवं.”

असं इरफान याने सांगितलं होतं.

 

casting couch in bollywood - InMarathi03
scoopwhoop.com

 

याप्रकरणी त्याने कुणाचेही नाव घेतले नव्हते. पण, काही पुरुषांनी आणि स्त्रियांनीही त्याला शैय्यासोबत केल्यास चांगले काम देऊ असं सांगितलं होतं, हे त्याने स्पष्ट केलं होतं.

इरफानने ‘करीब करीब सिंगल’ या चित्रपटाच्या गाण्याच्या लॉन्चींग दरम्यान हे वक्तव्य केलं होतं.

फिल्म इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊच हे काही नवीन नाही. तसेच चांगल्या कामाच्या आणि यशस्वी होण्याच्या हव्यासापोटी अनेक जण याला बळी देखील पडतात.

यात स्ट्रगलर्सचा तर मोठ्या प्रमाणात समावेश असतो पण यातून मोठ-मोठे नावाजलेले कलाकार देखील सुटलेले नाहीत. हे एक धक्कादायक वास्तव आहे. यावरून लोकांची मानसिकता किती विकृत होत चालली आहे हे कळून येते.

बाहेरून झगमगती आणि कलरफुल दिसणारी ही बॉलिवूड इंडस्ट्री आतून तेवढीच अंधारमय आहे, हेच यावरून दिसून येते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?