'आपल्या मुलांना "शहाणं" करण्यासाठी शिकवा या पाच गोष्टी!

आपल्या मुलांना “शहाणं” करण्यासाठी शिकवा या पाच गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

घरातल्या महिलेने गुडन्युज दिल्यापासूनच प्रत्येकाच्या आनंदाला उधाण येतं.

मग मुलगा होणार की मुलगी ही उत्सुकता, नावांची यादी, डोहाळजेवण इथपासून अगदी बाळाच्या प्रतिक्षेपर्यंत प्रत्येक दिवस मोठा उत्साहात सादरा केला जातो.

 

pregnancy inmarathi
marathi movie

 

आणि मग बाळाचा जन्म हा तर सर्वाधिक आनंदाचा क्षण.

मग सगळं घर त्या बाललिलांनी भरून जातं.

बोबडे बोल, त्याचे खेळ, बाळासाठी केली जाणारी खरेदी आणि बाळाचं पहिलं पाऊल या सगळ्यात त्याचं बालपण कधी सरत हे कळतही नाही.

 

saif and karina inmarathi
the live mirror

 

मुल जसजसं तरुण होतं तसतसं पालकांवरचं दडपण वाढू लागतं.

आपला मुलगा वाईट लोकांच्या संगतीत तर नाही ना? त्याला नको ते व्यसन तर नाही लागलं ना? तो एवढा वेळ बाहेर काय करत असतो? त्याचे मित्र कोण? एवढा वेळ फोन का आणि कुणासाठी हातात असतो? असे खूप प्रश्न असतात.

मुलींच्या पालकांचं तर विचारूच नका. मुलीला घरी यायला पाच मिनिटं उशीर झाला तरी पालकांची धडधड वाढते. त्यात आजकालच्या बातम्या.

खरंच पालक होणं अवघड आहे. कारण त्यांच्याशी कठोर वागलं तर मुलं आपल्याशी चांगलं बोलणार नाही ह्याच दडपण आणि बंधनं ठेवली नाहीत, तर मुलगा हाताबाहेर जाण्याची भिती.

मग कुणीतरी सांगतं त्यांचं मित्र व्हा. पण म्हणून काय त्यांना आपल्याशी काहीही बोलू द्यायचं? मित्र म्हणून? अशा वेळी कधीकधी मुलांना शिकवण्यापेक्षा मुलंच पालकांना शिकवून नादी लावतात. मग होते आरडाओरड!

scolding-inmarathi-00

 

मग पालकांनी करावं तरी काय? आपली मुलं सद्गुणी बनवण्यासाठी त्यांना कुठले धडे द्यावे?

आमच्याकडे आहे नं उत्तर!

पालकांनी आपल्या मुलांना/मुलींना खालील गोष्टी शिकवाव्यात…

१  पालकांनो, संयम ठेवा

आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी शिकविण्यासाठी प्रत्येक पालक प्रयत्नशील असतात.

आपल्या मुलाने आपलं सगळं ऐकावं, त्याला चांगल्या सवयी लागाव्यात, त्याने आपली प्रत्येक गोष्टी ऐकावी असं पालकांना वाटणं योग्य आहे.

मात्र या गोष्टी शिकविताना पालकांना संयम राखणं गरजेचं आहे. तुम्ही एखादी गोष्ट विनाकारण चिडून सांगितली तर मुलांकडून त्याला प्रतिसाद दिला जाणार नाही.

मुलांवर वारंवार ओरडणं हा योग्य उपाय नसून अत्यंत संयमाने, मुलांचं म्हणणं समजून घेत त्यांना या गोष्टी समजावणं गरजेचं आहे.

यासाठी पालकांनी आपला संयम कसा वाढवता येईल याचा विचार करणं गरजेचं आहे. त्यासाठी योगा,चांगल्या पुस्तकांचं वाचन, तज्ञांशी संवाद यांसह मुलांशी मित्रत्वानं चर्चा करणं हे उपाय नक्कीच उपयुक्त ठरतील.

 

२  सामाजिक भान शिकवा

आजची मुलं हे उद्याचे सक्षम नागरिक आहेत हे पालकांनी विसरून चालणार नाही.

त्यामुळे तुम्ही त्यांना जे शिकविता, त्याचे परिणाम देशालाही भोगावे लागु शकतात.

आपल्या मुलाला किंवा मुलीला केवळ स्वतःपुरता, किंवा कुटुंबापुरता विचार करण्याची सवय लावु नका.

आपण समाजाचं देणं लागतो, आपल्या वैयक्तिक आयुष्यातून किमान थोडा वेळ हा समाजासाठी राखून ठेवला पाहिजे ही शिकवण मुलांना द्या.

अनाथाश्रम, वृद्धाश्रम, सामाजिक संस्था यांबाबत मुलांना माहिती देत, त्यांना तेथे मदत करण्यासही प्रोत्साहन द्या.

समाजातील प्रत्येक व्यक्तीशी कसं वागावं, इतरांना कशी मदत करावी आणि सामाजिक कार्यात आपला सहभाग कसा राखावा याचा धडा पालकांकडून मिळणं अतिशय गरजेचं आहे.

 

३  समानता शिकवा

लहानपणी मनावर जे संस्कार होतात, कळत नकळत जे शिकलं जातं ते कायमचं रुजतं हे लक्षात ठेवा.

त्यामुळे लहान मुलांना तुम्ही काय सांगता, काय शिकवता, यावर त्यांचं पुढचं सगळं आयुष्य अवलंबून असतं.

 

parents-with-child-marathipizza

 

यामध्ये विशेषतः बालपणीच मुलांना समानता हा पहिला धडा देणं गरजेचं आहे.

जातीभेदाचं सावट आजही आपल्या समाजावर कायम आहे, त्यामुळे आपल्या मुलांना लहानपणीच जातीभेद, वर्णभेद, उच्चनीच भेदभाव किंवा रंग, रुप, आर्थिक स्थिती अशा कोणत्याही बाबतीत भेदभाव न करण्याची शिकवण द्या.

हा विषय गंभीर असला, तरी हलक्याफुलक्या सोप्या उदाहरणांमधून, त्यांच्याशी गप्पा मारत तुम्ही त्यांना हे नक्कीच शिकवु शकतात.

 

equality inmarathi

 

अर्थात मुलं ही पालकांकडूनच शिकतात, त्यामुळे तुम्ही तुमच्या वागण्यातून ही शिकवण दिलीत, तर तुमची मुलं ही बाब कायमची लक्षात ठेवतील.

४  स्त्रीयांचा आदर

सध्या समाजात जी परिस्थिती निर्माण झाली आहे, ती पाहिल्यानंतर तर मुलांना अभ्यास, गुण, स्पर्धा हे शिकविण्यापेक्षा स्त्रियांबद्दलचा आदर हा गुण शिकवणं किती गरजेचं आहे याची जाणीव होते.

 

family inmarathi

 

शारिरीक अत्याचार, घरात केली जाणारी हिंसा, विवाहितेचा छळ, मुलींचे अपहरण यांसारख्या असंख्य गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या पुरुषांना बालपणी स्त्रियांचा आदर करण्याची शिकवण मिळाली असती तर असे गुन्हे घडले नसते.

त्यामुळे तुमच्य मुलाने चांगले मार्क्स आणण्याबरोबरच स्त्रियांचा आदर केला तर तो ख-या अर्थाने यशस्वी झाला असं म्हणता येईल.

याची सुरुवात घरापासून करा.

घरातील आजी, आई, बहिण, मैत्रिण यांपासून ते घरकाम करणा-या मावशी, सोसायटीतील शेजारी, सफाई कर्मचारी अशा प्रत्येक महिलेचा आदर करण्याची मुलांना सवय लावा.

 

family help inmarathi

 

स्त्रियांचा केवळ आदरचं नव्हे तर त्यांना मदत करा, त्यांचा मान राखा, घरात त्यांच्या जबाबद-या वाटून घ्या अशी शिकवण छोट्या कृतीतून देता येते.

 

mother inmarathi
parenting

 

आजच्या प्रत्येक पालकाने मुलांना अशी शिकवण दिली, तर भविष्यात स्त्रियांवरचे अत्याचार नक्कीच कमी होतील.

५. एक हात मदतीचा

प्रत्येक पालक आपआपल्या मुलाचा हात धरून त्यांना चालायला शिकवतो, त्यानंतर तोच हात धरून अक्षर गिरवतो, आणि त्यानंतर थेट खेळही खेळायला शिकवतो.

मात्र याच हातांनी इतरांना मदत कशी करावी याबाबत मात्र संवाद घरात होताना दिसत नाहीत.

 

help inmarathi
sightsaver.com

 

समाजात अशा अनेक व्यक्ती आहेत, ज्यांना आपल्या मदतीची गरज आहे.

अंध, अपंग, वृद्ध यांना मदत करणं आपल्या प्रत्येकाचं कर्तव्य आहे.

पण तुमची मुलं ही मदत स्वतः, आनंदाने करतात का?

आपल्याच कोषात मुलाने राहु नये, त्याने समाजात मिसळून इतरांना मदत करावी यासाठी तुम्ही काय करता याचा विचार करा.

अगदी घरापासून याची सुरुवात करता येऊ शकतो,

घरातल्या आजीआजोबांना त्यांच्या कामासाठी मदत करणं, सोसायटीतील गरजु व्यक्तीला आधार देणं, ज्येष्ठांना सामान आणून देणं यांसारख्या कृती मुलांना समजावून सांगा आणि त्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या.

 

helping inmarathi
medical express

 

एकदा तुम्ही ही सवय त्यांच्या मनात रुजवलीत की चांगली व्यक्ती

घडविल्याचा आनंद तुम्हाला नक्कीच मिळेल.

या गोष्टी मुलांना शिकवणं अवघड नसतं, मात्र मुलांचे लाड करताना त्यांना काही चांगल्या गोष्टी शिकवण्यातं पालकांच्या लक्षात रहात नाही.

 

care for grandparents inmarathi
lawrato

 

घरात जन्म घेणा-या मुलांचे लाड, कौतुक करायलाच हवं, मात्र त्यासह त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत, त्यांना सुजाण, सक्षम नागरिक बनविण्यासाठी प्रयत्न करावे हे देखील गरजेचं आहे.

मुलांना वाढविताना त्यांच्या वयानुसार वेळोवळी त्यांच्यावर चांगले संस्कार होणंही तितकंच महत्वाचं आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “आपल्या मुलांना “शहाणं” करण्यासाठी शिकवा या पाच गोष्टी!

  • March 25, 2017 at 2:50 pm
    Permalink

    You forgot to mention PATRIOTISM = DeshBhakti = DeshPrem….

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?