' “खरंच आपण देशासाठी ५२ सेकंद उभे राहू शकत नाही का?” – InMarathi

“खरंच आपण देशासाठी ५२ सेकंद उभे राहू शकत नाही का?”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : पुष्कर देशमुख 

शाळेत जाऊ लागलो तसा मला शिकवण्यात आलेली पहिली गोष्ट –

एक साथ राष्ट्रगित के लिये खड़े रहेंगे, खड़े रहो

त्यावेळी मला हा प्रश्न पडला नाही की –  नाही उभा राहिलो तर काय होईल? का म्हणायचं राष्ट्रगीत? ते म्हणालो तरच आपलं राष्ट्रप्रेम दिसून येत का? आणि जे मला उभा रहायला सांगत आहेत ते माझ्यावर ती गोष्ट लादत आहेत का? कारण त्यानंतर होणारी प्रतिज्ञा मला नेहमी सांगत असे की-

भारत माझा देश आहे आणि माझ्या गोष्टींसाठी मी वेळ द्यावा हे सांगण्यासाठी कुठल्या न्यायालयाने निर्णय देण्याची मला जरूर वाटली नाही. मला वाटेल ते करण्याची संधी ह्या देशाने वेळोवेळी दिली आणि तिथे कुठेही मला माझ्या राष्ट्रप्रेमाचा दाखला द्यावा लागला नाही पण त्याने माझ्या मनातला देशावर असलेल्या प्रेमातही तिळमात्र फरक पडला नाही.

national-anthem-marathipizza01

काल सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णया नंतर सहज विचार आला की “राष्ट्रप्रेम हा सुद्धा इच्छेचा भाग असू शकतो का?” कारण मी त्याला आजपर्यंत माझा कर्तव्य समजत आलो होतो, कदाचित माझ्या शिक्षणात “आपल्या देशावर प्रेम करणे हा आवडीचा भाग आहे” हे माझे गुरुजन मला सांगायच विसरून गेले.

माझा निर्णयाला विरोध नाही कारण आपल्या देशाने सर्वांना मुक्त विचार करण्याची मुभा दिली आहे, काही शारीरिक विकलांग लोक खरंच नाही उभा राहू शकत राष्ट्रगीतासाठी, आणि लोकांवर राष्ट्रगीत लादून आपण फक्त त्यांचे शरीर उभे करू शकतो मनातले राष्ट्रप्रेम नाही.

 

rashtrageet InMarathi

 

मी दोन्ही बाजूने बोलत आहे ह्याची मला जाणीव आहे, पण नवल ह्या गोष्टीच वाटत आहे, ज्या वयात काहीच कळत नव्हतं त्यावेळी आम्ही अगदी आभाळ भर आवाज घूमेल इतक्या ताकतीने राष्ट्रगीत म्हणायचो आणि आज जेव्हा सुशिक्षित नागरिक म्हणून ह्या देशात वावरत आहे त्यावेळी आमच्या विचारांच्या कक्षा इतक्या विस्तारल्या आहेत की आम्हाला राष्ट्रगीत, राष्ट्रप्रेम हे सगळे मुद्दे इच्छेनुसार हवेत, हरकत नाही.

कारण राष्ट्राभक्ती हा मुळात प्रदर्शनाचा विषय नाहीये पण ज्या घरात जन्माला आलो त्याच आडनाव आपण लावतो त्याच प्रमाणे ज्या देशात जन्माला आलो, जिथल्या संस्कारात वाढलो त्या देशाप्रती मनात प्रेम नसावे इतका असंवेदनशील नसेल कुणी ह्या देशात, पण तरीही आमच्या “राष्ट्रगीता” ला सर्वोच्च न्यायालयात एक अयशस्वी झुंज द्यावी लागली.

 

national-anthem-marathipizza02

आलेला निर्णय हा नक्कीच एका प्रगतीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या देशासारखा वाटत असेल पण राहून राहून एक प्रश्न पडतोय की या पुढच्या पिढीला शाळेत ही घोषणा ऐकायला मिळेल का –

एक साथ राष्ट्रगीत कॊ जिसे खड़े रहेना है, खड़े रहो

मुक्त विचार करण्याची मुभा वापरून जो निर्णय काल आला आणि ज्यांना तो पटला त्यांच अभिनंदन पण तरीही मला अजूनही वाटतं-

खरच आपण देशासाठी ५२ सेकेंड उभे राहू शकत नाही का?

(कुणावर बंधन नाही हा विचार आहे फक्त प्रत्येकाने एकदा तरी करावा असा)

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असे नाही. ।आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?