…जेव्हा एक किन्नर न्यायाधीश बनते!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

माणूस हा एक असा प्राणी आहे जो आपल्या इच्छाशक्तीच्या बळावर कुणालाही आपल्या समोर नमवू शकतो. माणूस जेव्हा खूप कठीण परिस्थितीत सापडतो तेव्हा तो त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधू लागतो आणि त्याच्या याच प्रयत्नांतून तो अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवतो.

याच गोष्टीला सिद्ध करणाऱ्या उदाहरणांच्या यादीत आता आणखी एक नाव जोडल्या गेलं आहे आणि ते म्हणजे जोयिता मंडल यांचं.

 

Jyoyita-Mandal-InMratahi01
khabarnonstop.com

जोयिता मंडल हे नाव गेल्या एक-दोन दिवसांपासून आपल्या ऐकण्यात वा वाचण्यात आलं असेलच. गेल्या दोन दिवसांपासून हे नाव खूप चर्चेत आहे आणि त्यामागील कारणही तसचं आहे. जोयिता मंडल या भारताच्या पहिल्या ट्रांसजेंडर न्यायाधीश होण्याचा मान मिळविला आहे.

ट्रांसजेंडर म्हणजेच किन्नर, यांच्याबद्दल कुणाला वेगळ्याने सांगायची गरज नाही. किन्नरांना भलेही या जगात स्थान मिळाले असले तरी आपल्या समाजात अजूनही त्यांना हवं ते स्थान मिळालेलं नाही. अजूनही आपण त्यांना मुख्य प्रवाहात समाविष्ट करू शकलेलो नाही, अजूनही आपण त्यांच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघतो. जेव्हा केव्हा सामनतेची गोष्ट निघते तेव्हा आपण केवळ स्त्री-पुरुष समानतेबद्दलच चर्चा करतो आवाज उठवतो, पण आपल्याच अवतीभवती वावरणारे हे किन्नर अस्तित्वात तर नाहीच पण आपल्या वक्तव्यात देखील येत नाही.

 

trasgender-InMarathi
timemail.in

स्त्री आणि पुरुष दोन्ही समान आहेत, त्यांना समाजात सारखाच आदर आणि स्थान मिळायला हवं , स्त्री कुठेही पुरुषापेक्षा कमी नाही – ह्या आणि अश्याच आणि किती तरी वाक्य/विचारांमुळे स्त्री-पुरूष हे दोनच जेंडर अस्तित्वात असल्याचा आपला समज आहे. पण हा समज किती चुकीचा आहे आणि किन्नरांना देखील समाजात समानतेचा अधिकार आहे हे लोकांना पटवून देण्यासाठी अनेक किन्नर आजही झटत आहेत. स्वतःला स्त्री-पुरुषा एवढेच समान बनविण्याचा प्रयत्न अनेक किन्नर करत आहेत आणि या प्रयत्नात जोयिता मंडल या यशस्वी झाल्या आहेत. जोयिता त्या प्रत्येक किन्नरसाठी प्रेरणास्थान आहेत, ज्यांना हा “स्त्री-पुरुष युक्त” समाज तुच्छतेच्या नजरेने बघतो. पण आता लोकांना त्यांच्या मानसिकतेत बदल करण्याची गरज आहे.

असो… तर आज आपण भारताच्या पहिल्या ट्रांसजेंडर न्यायाधीश जोयिता मंडल यांच्याबद्धो जाणून घेणार आहोत.

जोयिता यांची पोस्टिंग पश्चिम बंगालच्या इस्लामपूर येथील लोक न्यायालयात करण्यात आली आहे. राज्य लीगल सर्विस अथॉरिटीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर ८ जुलै ला त्यांची नियुक्ती करण्यात आली. लोक न्यायलयात तीन न्यायाधीशांचे खंडपीठ असतं. एक वरिष्ठ न्यायाधीश, एक वकील आणि एक सोशल वर्कर. जोयिता यांची नियुक्ती सोशल वर्कर या पदाकरिता करण्यात आली आहे.

 

Jyoyita-Mandal-InMratahi02
india.com

आज एवढ्या मोठ्या पदावर येऊन पोहोचणे हे ज्योयिता यांच्यासाठी काही सोपे नव्हते. भारतातल्या प्रत्येक किन्नर प्रमाणे जोयिता यांनाही लोकांचा तिरस्कार सहन करावा लागला आहे.

कोलकाता येथे जयंत मंडल या म्हणून जोयिता यांचा जन्म झाला. पण त्या एक किन्नर होत्या, त्यांच्या वेगळ्या वागणुकीमुळे शाळेतील इतर विद्यार्थी त्यांना चिडवायचे, ज्यामुळे त्यांना घरच्यांचा तिरस्कार सहन करावा लागला आणि अखेर त्यांना त्याचं घर सोडावं लागलं.

किन्नर म्हणून जन्माला येण यात त्यांची काहीही चूक नसते तरी देखील त्यांना लोकांच्या तिरस्काराचा सामना करावा लागतो. त्याहून वाईट म्हणजे जन्मदाते आई-वडील देखील त्यांना स्वीकारत नाहीत.

आधी जोयिता यांना केवळ एक किन्नर म्हणून ओळखल्या जायचं. २०१० साली जेव्हा त्यांच्या किन्नर असल्याकारणाने त्यांना कुणी होटल रूम द्यायला तयर नव्हते तेव्हा त्यांना नाईलाजाने बस स्टॉप वर झोपावे लागले होते. एवढचं काय तर वेळ त्यांच्यावर अशी देखील होती की, त्यांना कुणी काम द्यायला तयार नव्हते तेव्हा पोट भरण्यासाठी त्यांना भिक मागावी लागायची. पण ते म्हणतात न की, सर्वांची वेळ येते.. तसचं काहीसं जोयिता यांच्याबरोबर झालय. ज्या ठिकाणी त्या भिक मागायच्या आज त्याच परिसरातील न्यायालयात त्या न्यायाधीश म्हणून नियुक्त झाल्या आहेत.

त्याच्या या संघर्षाबाबत बोलताना जोयिता सांगतात की,

“मी कॉल सेंटरमध्ये नोकरीला लागले, तिथे देखील लोकं माझी खिल्ली उडवत असत. मला कोणी किरायाने घर देत नसत, त्यामुळे कित्येकदा मला फुटपाथवर रात्र काढावी लागली.”

 

Jyoyita-Mandal-InMratahi
firstpost.com

२०१० साली जोयिता दिनाजपुर आल्या तेव्हा त्यांना एलजीबीटी लोकांच्या हक्कांबद्दल माहिती नव्हती. याची माहिती झाल्यावर त्यांनीनया रोशनी फॉर दिनाजपुर डिस्ट्रिक’ नावाची संस्था बनवून एलजीबीटी समुदायासाठी काम करण्यास सुरवात केली. या संस्थेमार्फत त्या एलजीबीटी कम्युनिटीच्या मूलभूत अधिकारांसाठी कार्यरत आहेत.

त्यांच्या या यशाने केवळ त्याचीच नाही संपूर्ण किन्नर समुदायाची मान उंचावली आहे.

जेवढा अभिमान आपल्याला इतर कुठल्याही भारतीयाच्या चांगल्या कामगिरीवर व्हायला हवा, तेवढाच अभिमान जोयिता मंडल यांच्यावरही असायला हवा…

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?