' आता “गूगलच्या” मदतीने “अंतराळाचा” फेरफटका मारणं झालं अधिक सुकर! – InMarathi

आता “गूगलच्या” मदतीने “अंतराळाचा” फेरफटका मारणं झालं अधिक सुकर!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ब्रम्हांडाबद्दल जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. तिकडचे जग कसे असेल, याबद्दलची उत्सुकता नेहमीच आपल्याला मनामध्ये लागून असते. अंतराळ खूप मोठे आहे आणि त्यामध्ये असंख्य ग्रह, उपग्रह आहेत.

ज्यांची माहिती असणे गरजेचे आहे. नासाने देखील अंतराळामध्ये खूप रिसर्च केली आहे आणि अजूनही करते आहे.

सध्या प्रत्येकाकडे स्मार्टफोन्स आहेत आणि सुपरफास्ट इंटरनेट देखील आहे. अगदी तुम्हाला हवी असलेली माहिती एका बोटाच्या क्लिकवर उपलब्ध आहे! त्यामुळे कोणत्याही विषयावरचं अगदी सखोल ज्ञान तुम्हाला चुटकीसरशी मिळतं!

 

Space Google maps.inmarathi
wallpaperbetter.com

 

त्यापैकी सर्वात जास्त वापरलं जाणारं सर्च इंजिन म्हणजे गुगल. आज देशातल्या कानाकोपऱ्यातली प्रत्येक व्यक्ति गुगल ला सारवलेली आहे. काही माहिती हवी असली की घरातलं लहान मुल देखील चटकन गुगल करायचा सल्ला देतं!

गुगल आज आपल्याला कोणत्याही गोष्टीची माहिती अगदी सहज मिळवून देतो. आपल्याला गुगल जमिनीपासून अंतराळापर्यंतची माहिती मिळवून देतो. गुगलच्या मदतीमुळे आता कोणतीही गोष्ट शोधणे अगदी सोपे झाले आहे.

गुगलने आपल्याला अजून काही सुविधा देखील दिलेल्या आहेत. गुगल मॅप्सचा वापर करून आपण आपल्या देशातील आणि इतर देशातील ठिकाणे लगेचच शोधू शकतो.

गुगल आपल्या लोकेशनवरून आपण सर्च केलेले ठिकाण किती लांब आहे आणि तिथे जाण्यासाठी किती वेळ लागतो याची माहिती देखील देते. त्याचबरोबर आपल्याला तिथे जाण्याचा मार्ग देखील दाखवतो.

पण तुम्हाला माहित आहे का? की आता तुम्ही या गुगल मॅप्सच्या मदतीने तुम्ही आता अंतराळाचा देखील फेरफटका मारू शकता. तुम्हाला वाटत असेल की, खरचं हे शक्य आहे का? पण हो!

हे आता शक्य होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया याविषयीची माहिती…

जर तुम्हाला अंतराळामध्ये घडणाऱ्या घडामोडींबद्दल जाणून घेण्याची इच्छा असेल, तर गुगल मॅप्सच्या या फिचरचा फायदा तुम्हाला होणार आहे. या फिचरच्या मदतीने तुम्ही पृथ्वी व्यतिरिक्त इतर ग्रह आणि चंद्र देखील घरबसल्या पाहू शकता.

गुगल मॅप्सच्या मदतीने शनी ग्रहाचा नैसर्गिक उपग्रह इंसेलेडस, डिओन, मिमास, रेआच्या बरोबरच बृहस्पुती ग्रहाचे चंद्रमा युरोपा आणि गनीमेडची यात्रा देखील करू शकता.

गुगलने १२ ग्रह आणि चंद्राला डिजिटाइस केले आहे, ज्याला काही स्मार्टफोन किंवा लॅपटॉपवर देखील पाहता येऊ शकते.

 

Space Google maps.inmarathi1
gazabpost.com

 

गुगलचे प्रोडक्ट मॅनेजर स्टॅफोर्ड मारक्वार्डने सांगितले की,

‘मॅपच्या मदतीने तुम्ही इंसेलेडसच्या बर्फाच्छादित मैदानांचे भ्रमण करू शकता. जिथे कॅसिनी यानने पाणी शोधले होते आणि टाइटनच्या मिथेल तलावाची यात्रा देखील करू शकता.

आम्ही प्लुटो, शुक्र ग्रह आणि इतर चंद्राबरोबर १२ नवीन जगातील नकाशे या अॅपमध्ये समाविष्ट केलेले आहेत.

गुगलने ह्याला तयार करण्यासाठी खगोल शास्त्रज्ञ ब्योर्न जॉन्सन यांची मदत घेतली. ज्यांनी नासा आणि युरोपीय अंतराळ एजन्सीच्या फोटोंच्या मदतीने ग्रह आणि चंद्राचे नकाशे तयार केले आहेत.

google maps inmarathi
cnet.com

 

गुगलने सांगितले आहे की, २० वर्षांपूर्वी एक स्पेसक्राफ्ट कॅसिनीने शनी ग्रह आणि त्याच्या चंद्राच्या रहस्यांना शोधण्यासाठी उडवले होते. या मिशन दरम्यान, कॅसिनीने कितीतरी छायाचित्रे रेकॉर्ड केली होती आणि या १५ लाख छायाचित्रांना पृथ्वीवर पाठवले होते.

याच छायाचित्रांच्या आधारावर शास्त्रज्ञ जगाबद्दल आकलन करण्याचा प्रयत्न करत आहेत. मग आता वाट कसली पाहताय, घरामधूनच जगाबाहेरील गोष्टी आपल्याला कळणार आहेत. अंतराळातील माहिती तुमची वाट पाहत आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?