नेपाळमध्ये दिवाळी निमित्त कुत्र्यांसोबत जे होतं ते आश्चर्यकारक आहे!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

कुत्रा, घोडा हे माणसाचे आदिमकाळापासूनचे मित्र आहेत. हे आपण मिथ्य़ कथांमधून वाचले आहेच. तसेच अनेक राजांच्या घोड्यांची कथापण आपल्याला माहीत आहे. तसंच भारतात बैलपोळ्याच्या दिवशी बैलांची पुजा होते. त्याचप्रमाणे नेपाळमध्ये दिवाळीच्या दुस-या दिवशी म्हणजे नरक चतुर्थशीच्या दिवशी होते कुत्र्यांची पुजा. काय कारण असेल कुत्र्यांची पुजा करण्यामागे ?

कुत्रा हे भैरव म्हणजेच शंकराचे वाहन होते असे नेपाळी दंतकथांमध्ये सांगितले जाते. मिथक कथेतील त्या कुत्र्याचे नाव शवन असे आहे. तसंच यमराज म्हणजेच मृत्यूची देवता त्याचेही दोन पाळीव कुत्रे आहेत. जे नरकाच्या दाराचे रक्षण करतात. अशी ही दंतकथा नेपाळमध्ये प्रचलीत आहे.

                                                                                

म्हणूनच नरक चतुर्दशीच्या दिवशी कुत्र्यांची पुजा केली जाते. या सणाला नेपाळमध्ये कुकर तिहाड असे म्हणतात. या दिवशी त्यांची आरती करून त्यांना हार घातला जातो. तसंच त्यांना दूध, किमती बिस्किटं,अंडी आणि मटण असे आवडते पदार्थ खायला दिले जातात.

कुत्रा हा माणसाचा मित्र आहे. त्याला बोलवल्यास तो येतो. तसेच त्याला मालकाने कितीही ओरडले तरीही तो एकनिष्ठ राहतो. त्याच्या एकनिष्ठपणाचे कौतुक आपण सर्वच करतो. पण नेपाळमध्ये त्यांची होणारी पुजा हे वाचून कोणालाही आश्चर्यच वाटेल. भारतासह जगभरातील श्वानप्रेमींना ही बातमी वाचून आपल्या आवडत्या कुत्र्याला नक्कीच झप्पी द्यावीशी वाटेल.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?