' या दिवाळीचा लेटेस्ट 'फॅशन ट्रेंड' जाणून घ्या..!

या दिवाळीचा लेटेस्ट ‘फॅशन ट्रेंड’ जाणून घ्या..!

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

सध्या सर्वत्र दिवाळीचा माहोल सुरु आहे. लहान मोठी बाजारपेठं दिवाळीसाठी सज्ज झालेली आहेत. दिवाळी या सणाची सर्वजन आतुरतेने वाट बघत असतात. या सणाला मोठ्या प्रमाणत खरेदीही केली जाते. पण दिवाळीची खरेदी करताना जर सर्वात जास्त कन्फ्युजन कशात होत असेल तर ते असते कपड्यांचं. आजकाल दररोज फॅशन बदलत असते. मग अशात कपडे कसे घ्यावे जे दिसायला स्टायलिश असतील आणि आजच्या फॅशन ट्रेंड ला मॅच देखील होतील.

diwali fashion trends09-marathipizza
http://khoobsurati.com

दिवाळीत सर्वांचीच ओढ ही एथनिक कपड्यांकडे असते. आतातर एथनिक कपड्यांत कितीतरी वेगवेगळ्या फॅशन देखील आल्या आहेत. तुम्ही एकाच ड्रेसला कितीतरी पद्धतीने घालून त्याला नेहमी फ्रेश आणि न्यू लूक देऊ शकता.

यावेळी दिवाळीचा काय ट्रेंड आहे आणि तुम्ही कुठले स्टाईल यावेळी ट्राय करू शकता याचीचं एक छोटीशी लिस्ट आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहेत.

फॉर गर्ल्स : 

सिगरेट पॅण्ट्स विथ लॉंग जॅकेट :

 

diwali fashion trends01-marathipizza

shaadietyadi.com

जर तुम्ही उंच असाल तर हा एथनिक ट्रेंड फक्त तुमच्यासाठीचं आहे. या ड्रेस ने तुमच्या फिगरला कॉम्प्लीमेंट करेल. यासाठी तुम्ही हेवी वर्क केलेला कुर्ता कम जॅकेट सोबत प्लेन अथवा वर्क केलेले सिगरेट पॅण्ट्स पेअर करू शकता. हा लूक कॅरी करायला खूप इझी असून तो तुम्हला परफेक्ट एथनिक लूक देखील देईल.

चुडीदार विथ फ्लोअर लेन्थ कुर्ता :

 

diwali fashion trends-marathipizza
indianews99.com

चुडीदार आणि कुर्ता हा तसा खूप कॉमन ट्रेंड आहे पण तुम्ही त्यात एक्सपेरिमेन्ट नक्की करू शकता. हल्ली उंची मुली चुडीदार सोबत लॉंग कुर्ता पेअर करतात. पण जर तुमची उंची कमी असेल तर तुम्ही चुडीदार सोबत फ्लोअर लेन्थ कुर्ता नक्की ट्राय करू शकता हा देखील तुम्हाला खूप छान लूक देईल.

 

हेवी स्कर्ट विथ क्रॉप टॉप :

 

diwali fashion trends03-marathipizza
weddingsonline.in

जर तुम्हाला वेस्टर्न वेअर जास्त आवडत असेल आणि हे एथनिक कपडे कॅरी करायला जड जात असेल तर हा लूक तुम्ही नक्की ट्राय करायला हवा. हेवी स्कर्ट आणि क्रॉप टॉप हे एक फ्युजन आहे. त्यासोबतच ते कम्फटेर्बल देखील आहे. तुम्ही एखादा एम्ब्रॉयडरी केलेला किंवा प्रिंटेड स्कर्ट आणि त्यासोबत एखाद क्रॉप टॉप पेअर करू शकता. हा लूक तुम्हाला तुमच्या ऑफिस दिवाली पार्टीमध्ये नक्कीच एक वेगळेपण जाणवून देईल.

 

धोती स्टाईल कुर्ता :

 

diwali fashion trends02-marathipizza
pinterest.com

हा सध्याचा लेटेस्ट ट्रेंड आहे. जरी हे आउटफिट तुम्हाला किचकट दिसत असलं तरी ते कॅरी करायला खूप इझी आहे. नुकतेच एका गरबा पार्टीत बॉलीवूड डिवा आलीया भट्ट ही या लूक मध्ये दिसली. तिने एक पांढऱ्या रंगाचा धोती स्टाईल कुर्ता घातला होता, ज्यात ती स्टनिंग तर दिसतच होती त्यासोबतच ति ज्या कॉन्फीडन्सने त्याला कॅरी करत होती त्यावरून हे कळत होत की, ते आउटफिट किती कम्फटेर्बल आहे. या दिवाळीत तुम्ही देखील हा ड्रेस ट्राय करू शकता. हा एक ट्रेडीशनल बट कम्फटेर्बल ड्रेस आहे.

 

साडी विथ केप टॉप :

 

diwali fashion trends04-marathipizza
cloudfront.net

जर तुम्ही साडी लव्हर असाल तर तुम्ही हे नक्की ट्राय करायला हवं. मध्यंतरी जवळजवळ सर्वच बॉलीवूड तारका या लूक मध्ये दिसल्या. मग ती सोनम असो की दीपिका, या सर्वांचाच हे एक फॅशन स्टेटमेंट बनलेलं. हा देखील एक नवा ट्रेंड असून त्यामुळे तुमचं व्यक्तिमत्व अधिक खुलून दिसत. एखाद्या साडीसोबत केप टॉप जबरदस्त लूक देतंं. त्यामुळे या दिवाळीत हा लूक तर ट्राय करायलाच हवा. यामुळे सर्वांच्या नजरा तुमच्यावर खिळून राहतील.

फॉर बॉईज :

एथनिक म्हंटले की मुलींएवढी वेरायाटी मुलांसाठी नसते. पण तरी तुम्ही त्यात अनेक एक्सपेरिमेन्ट करू शकता. नेहमीच्या कॉमन एथनिक लुक एवजी तुम्ही काही वेगळ ट्राय करून जरा हटके दिसू शकता.

नेहमीच्या स्ट्रेट कुर्त्याएवजी तुम्ही अनारकली कुर्ता ट्राय करू शकता. अनारकली ही मुलींची फॅशन आहे म्हणताय..? पण मुलंही हा पॅटर्न कॅरी करू शकतात. अनारकली कुर्त्यासोबत तुम्ही पॅण्ट पेअर करू शकता. त्यासोबतच जर तुम्ही एम्ब्रॉयडरी स्टोल कॅरी करू शकता. हा पेहराव तुम्हाला अगदी शाही लुक देईल.

diwali fashion trends05-marathipizza
pinterest.com

 

कॉटन सिल्क धोती आणि कुर्ता हा पेहरावही बेस्ट आहे.

 

diwali fashion trends06-marathipizza
reshareit.com

शॉर्ट कुर्ता आणि नेहरू जॅकेट ही फॅशन सध्या ट्रेंड मध्ये आहे.

 

diwali fashion trends07-marathipizza
pinterest.com

जर तुम्हाला साध सिंपल सोबर लुक हवं असेल तर तुम्ही एखादा छानसा प्रिंटेड कुर्ता ट्राय करू शकता. यात तुम्हाला फ्लोरल प्रिंटचं ऑप्शन देखील ट्राय करता येईल.

 

diwali fashion trends08-marathipizza
pinterest.com

या काही फॅशन आयडियाज तुम्हाला दिवाळीत वेगळं दिसण्याकरिता नक्की मदत करतील…

लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?