पासपोर्ट साठी अर्ज करताय? इकडे लक्ष द्या- परराष्ट्र मंत्रालयाने नवीन नियम जारी केलेत!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza

===

आपल्याला परदेशात फिरायला किंवा काम करण्यास जाण्यासाठी पासपोर्टची आवश्यकता असते. पासपोर्ट हे आपल्यासाठी परदेशामध्ये जाण्यासाठी लागणारे ओळखपत्र असते. पासपोर्टशिवाय आपल्याला परदेशामध्ये जाता येत नाहीत आणि तसे केल्यास तो गुन्हा मानला जातो. पासपोर्ट मिळवण्यासाठी तुमचा कोणताही क्रिमिनल रेकॉर्ड नसणे, गरजेचे असते. पासपोर्ट मिळवताना पोलीस व्हेरीफिकेशन केले जाते. तुम्ही पासपोर्टसाठी ऑनलाईन अप्लायदेखील करू शकता. पण आता हा पासपोर्ट मिळवण्यासाठी अजून काही नवीन नियम काढण्यात आलेले आहेत. चला तर मग जाणून घेऊया की, हे नियम नक्की काय आहेत…

परराष्ट्र मंत्रालयाने नुकतीच पासपोर्टसाठी अर्ज करण्यासाठीच्या नियमाच्या नवीन संचाची घोषणा केली आहे, त्याचा संक्षिप्त आढावा घेऊया.

Passport rules.marathipizza
newspatrolling.com

• जन्म तारखेसाठी लागणारी कागदपत्रे

पूर्वीच्या नियमांनुसार २६ जानेवारी १९८९ च्या नंतर जन्माला आलेल्या अर्जदारांना जन्म प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य होते. पण आता तयार करण्यात आलेल्या नवीन नियमांनी यामध्ये सवलत दिलेली आहे. आता खालीलपैकी कोणतेही कागदपत्र अर्जदाराच्या जन्मतारखेसाठी पुरेसा असे.

• भारतात जन्मलेल्या आणि जन्माची व मृत्यूची नोंदणी ठेवणाऱ्या महानगरपालिकेचे किंवा जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ नुसार नोंदणी करण्याचा अधिकार असलेल्या निर्धारित प्राधिकार्याद्वारे नोंदणी असल्यास चालते.

• मान्यताप्राप्त शैक्षणिक मंडळाकडून मिळालेला शाळा सोडल्याचा दाखला किंवा शाळा बदलल्याचा दाखला.

• पॅन कार्ड

• आधारकार्ड / ई – आधार

• ड्रायव्हिंग लायसन्स (चालक परवाना)

• भारतीय निवडणूक आयोगाने जारी केलेले निवडणूक ओळखपत्र

• सार्वजनिक जीवन विमा कंपन्यांनी दिलेले पॉलिसी बाँड

Passport rules.marathipizza1
redbus2us.com

• पालक किंवा कायदेशीर पालकांचा तपशील

नवीन पासपोर्ट नियमांनुसार अर्जदाराच्या अर्जावर दोन्ही पालकांच्या नावाची आवश्यकता नाही आहे. अर्जदाराने आता फक्त पालकांपैकी एक किंवा कायदेशीर पालक यांचे नाव देणे आवश्यक आहे. यामुळे एकच पालक असलेल्या किंवा अनाथ असलेल्या मुलांना पासपोर्टसाठी अर्ज करणे, सोपे झाले आहे. आध्यात्मिकरित्या जगणारे लोक (साधू संन्यासी) यांच्यासाठी देखील तरतूद करण्यात आलेली आहे. असे लोक पालकांऐवजी अध्यात्मिक नेत्याचे नाव सांगू शकतात.

• अॅनेक्सस

अॅनेक्सची एकूण संख्या १५ पासून ९ पर्यंत कमी करण्यात आलेली आहे. अॅनेक्स ए, सी, डी, ई, जे आणि के वगळण्यात आलेले आहे. कमी अॅनेक्सस म्हणजे आपल्याला दस्तऐवजीकरण जुळवण्यासाठी असणाऱ्या समस्या कमी होणार.

• प्रमाणित करणे

सर्व अॅनेक्ससना पहिल्यांदा नोटरी करावी लागत असे किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावे लागत असे. पण आता एका कोऱ्या कागदावर सेल्फ – डिक्लरेशन दिले तरीदेखील चालून जाते. यामुळे जे पूर्वी कागदपत्रे प्रमाणित नसतील, तर थांबावे लागत असे. पण आता तसे होत नाही.

Passport rules.marathipizza2
wp.com

• विवाहित किंवा घटस्फोटीत माणसे.

आताच्या नियमांनुसार अर्जदाराला विवाह प्रमाणपत्राची गरज भासणार नाही. तसेच, घटस्फोटीत माणसांच्या बाबतीत अर्जदाराला त्यांच्या जोडीदाराचे नाव देणे आवश्यक नाही. हे एक अजून सामजिक बदलानुसार तयार करण्यात आलेले नियम आहेत.

• कामाच्या निगडीत तात्काळ पासपोर्ट

जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला तातडीने पासपोर्ट पाहिजे असल्यास, त्याला एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) किंवा नियुक्त करणाऱ्या कंपनीकडून ओळख प्रमाणपत्र देणे गरजेचे आहे. पण जर त्याच्याकडे हे नसेल तर, तो एक सेल्फ – डिक्लरेशन देऊ शकतो, ज्यामध्ये नियुक्त करणाऱ्या कंपनीला त्याने पासपोर्ट काढत असल्याची सूचना दिलेली असेल.

Passport rules.marathipizza3
amazingindiablog.in

परराष्ट्र मंत्रालयाकडून तयार करण्यात आलेल्या या नवीन नियमांनी पासपोर्ट अर्जदारांना खूप फायदा होणार आहे आणि पासपोर्ट मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे कुणीही पासपोर्ट मिळत नाही, म्हणून परदेशात जाण्यापासून वंचित राहणार नाही.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: MarathiPizza.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/MarathiPizza । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?