' जगातील ११ अद्भुत जागा – ज्या “खऱ्या” वाटतच नाहीत! – InMarathi

जगातील ११ अद्भुत जागा – ज्या “खऱ्या” वाटतच नाहीत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

आपण बालपणी अनेक अद्भुत स्वप्न बघत असतो. त्यात आपण कधी सुपरहिरो असतो, कधी मोठे फिल्मस्टार्स…! आणि सर्व स्वप्न ज्या ‘ठिकाणी’ घडत असतात, त्या जागा बहुतेक नेहेमीच जादुई असतात.

आपण मोठे होतो, जीवनातील practicality मान्य करतो आणि हळूहळू, नकळत स्वतःला हे पटवून देतो की ‘तश्या’ जागा अस्तित्वात नाहीत.

पण मित्रांनो…अशा तब्बल ११ जागा आहेत, ज्या आपल्या स्वप्नातील जागांसारख्याच अद्भुत आहेत!

चला, बघा जगातील ११ इतक्या अद्भुत जागा – त्या खऱ्या आहेत असं वाटणार नाही!

1. Door To Hell, Turkmenistan

ही एक नैसर्गिक Gas Field आहे जी 1971 मध्ये collapse झाली. इथे संपूर्ण Methane Gas आहे. Geologists ने याला आग लावली आणि ती आता निरंतर अशीच आहे.

 

Door to Hell

 

2. Fly Geyser, Nevada

Nevada मध्ये एक 5 फूट उंचीचा geyser आहे. Geothermal energy चे संशोधन करतांना विहीर खणताना हे geysers तयार झालेले आहेत.

Fly gyser nevada

 

3. Richat Structure, Mauritania

हे खूपच अचंभित करणारं एक structure आहे. सुरवातीला शास्त्रज्ञांना असं वाटायचं की एखाद्या meteroid – उल्का – च्या impact मुळे हे structure तयार झाला असावं. परंतु ह्याचा अभ्यास केल्यानंतर हे काहीतरी वेगळंच आहे हे सिद्ध झालाय.

परंतु नेमकं काय – हे अजूनही कोणालाच माहित नाही.

 

Richat Structure

 

4. Eternal Flame Falls, Orchard Park, New York

एका धबधब्याच्या खाली एक छोटीशी गुहा आणि त्या गुहेच्या तोंडाशी नैसर्गिक gas ने तयार झालेली flame – असं हे अचंभित करणारं combination! कोणाचंही लक्ष वेधून घेणारं!

 

Eternal Flame Falls

 

ही Flame एकदा lit झाली (म्हणजेच, एकदा पेटली की) की कमीत कमी 1 वर्ष तशीच राहते.

 

5. Salar de Uyuni, Bolivia

एक नैसर्गिक आरसा पसरलेली जमीन.

 

Salar de Uyuni

 

पुरातन काळात, जगामधील सर्वात जास्त मिठाचासाठा असलेल्या जमिनीवर तलाव dry झाल्याने ही अशी आरशासारखी चकचकीत जागा तयार झाली. अतिशय सुंदर आणि बघण्यासारखी जागा .

6. Reed Flute Cave, Guangxi, China

कोणीतरी canvas painting करून आपल्या समोर ठेवलीये अशी ही गुहा.

 

Reed flute cave

 

ही एक नैसर्गिक limestone cave आहे – जश्या जगात भरपूर आहेत परंतु – इथल्या colored lighting चं रहस्य अजून कोणालाच कळलेलं नाही.

7. Upper Kanarra Falls, Kanarraville, Utah

अजस्त्र अश्या पाषाणांमधून वाहत जाणारा हा धबधबा एक नैसर्गिक चमत्कारच आहे. हा कसा तयार झाला ह्या बद्दल geo-scientists अजूनही संशोधन करत आहेत.

 

Upper kanarra falls

 

8. Antelope Canyon, Arizona

Flash flooding आणि sandstone ची नैसर्गिक गंजण्याची प्रक्रिया – ह्या दोन्हीमधून तयार झालेला हा canyon. निसर्गाची एक वेगळीच कलाकृती – आयुष्यात एकदातरी नक्कीच पाहण्यासारखी!

 

Antelope Canyon

 

9. Fingal’s Cave, Scotland

ही गुहा natural acoustics साठी खूप प्रसिद्ध आहे. लावा असलेल्या जमिनीवर, लावाच्या गरम आणि थंड होण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेमुळे ही गुहा बनलेली आहे.

 

Fingal's cave

 

10. Zhangye Danxia Landform, China

चीन मधील जागा जी painting करून ठेवल्यासारखी दिसते. Lakes आणि streams च्या erosion (धूप) मूळे तयार झाल्येल्या नैसर्गिक रंगसंगती इथल्या डोंगर रांगावर एक वेगळीच छबी सोडतात.

Zhangye Danxia

 

11. Skaftafell, Iceland

जेंव्हा हिवाळ्यामध्ये Glacier River आटते तेंव्हाच फक्त ही ice cave naturally open होते. Skating करणार्यांसाठी तर ही एक पर्वणीच आहे.

 

Skaftafell

 

ह्यापुढे जेव्हा जगाची सफर करण्याची planning कराल, त्यावेळी destination शोधायची गरज भासणार नाही… 😉

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?