तुम्ही बाहुबली-२ चा २५ वा ट्रेलर पाहत आहात! विश्वास बसत नाही? मग हे वाचाच!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

बाहुबलीच्या पहिल्या भागाने संपूर्ण देशभरात आणि जगभरात घातलेला धुमाकूळ आपण पाहिला.

bahubali-marathipizza
http://www.topnewsportal.in

आता त्याचा दुसरा पार्ट येऊ घातलाय. ‘बाहुबली-२’ असं नाव असलेल्या या दुसऱ्या पार्टचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आणि हा हा म्हणता या ट्रेलरने युट्युबवर व्ह्यूजचा नवा उच्चांक गाठला. जेवढ्या भाषांमध्ये हा ट्रेलर रिलीज झाला तेवढ्या सर्व भाषांमध्ये मिळून फक्त २४ तासांमध्ये या ट्रेलरने तब्बल ५० दक्षलक्ष व्हूज मिळवले.

bahubali-2-marathipizza
http://andhrasamacharam.com


बहुधा हा पराक्रम करणारा हा जगातील पहिलाच चित्रपट असावा. बाहुबली च्या पहिल्या भागापासून या चित्रपटाला ये आश्चर्यांच वलय उत्पन झालं होतं ते दुसऱ्या भागातही जसाच्या तसं दिसून येत आहे. अहो कारण एक नवीन गोष्ट सध्या पुढे आली ती म्हणजे तब्बल २४ ट्रेलर नाकारल्या नंतर दिग्दर्शकाने आज आपण जो पाहतोय तो ट्रेलर मान्य केला.

ही गोष्ट म्हणजे कोणती अफवा नाही कारण ज्याने हा ट्रेलर edit केला अर्थात बनवला त्याने स्वत: ही गोष्ट कबुल केली आहे.

वामसी अटलुरी हा editor म्हणतो,

मी कधीही विचार केला नव्हता की मी edit केलेल्या ट्रेलरला एवढा प्रतिसाद मिळेल. ज्या चित्रपटाची उत्सुकता जगभरातील प्रेक्षकांना लागून आहे त्याचा ट्रेलर बनवणं म्हणजे भलं मोठं शिवधनुष्य पेलण्याचं काम माझ्यावर होतं. दिग्दर्शक राजमौल्ली यांचा मुलगा कार्तिकेय याच्या देखरेखीखाली मी हे काम करणार होतो. कार्तिकेय यांच्या कडे storyboard सुद्धा तयार होता. त्यामुळे मला जास्त प्रयत्न करावे लागणार नव्हते. पण तरीही मनात एक भीती होती की हे काम खरंच आपल्याला जमेल किंवा नाही? पण जसं काम सुरु झालं तसं मला योग्य मार्गदर्शन मिळालं. मला वाटलं की हे काम जास्तीत जास्त ४ दिवसांमध्ये संपून जाईल. पण जवळपास २ महिने मी एकच ट्रेलरवर काम केलं. आम्ही चित्रपटाचे तब्बल २४ ट्रेलर बनवले होते, परंतु सर्व नाकारण्यात येत होते. कारण दिग्दर्शक आणि निर्मात्यांना मनासारखा ट्रेलर मिळत नव्हता. अखेर २५ वा ट्रेलर त्यांच्याकडे गेला आणि जी गोष्ट ऐकण्यासाठी माझे कान आतुर होते ती गोष्ट मला ऐकायला मिळाली आणि तो २५ वा ट्रेलर आज सगळं जग पाहतो आहे.

bahubali-2-marathipizza02
http://andhrasamacharam.com

एका अनोखा विक्रम करणाऱ्या या ट्रेलरच्या व्ह्यूजमध्ये तुमचे योगदान नसेल तर आजच हा ट्रेलर (हिंदी) बघा..

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *