' हे रुग्णालय १०४ वर्षांपासून सेवा करतंय, पण माणसांची वा प्राण्यांची नव्हे चक्क बाहुल्यांची! – InMarathi

हे रुग्णालय १०४ वर्षांपासून सेवा करतंय, पण माणसांची वा प्राण्यांची नव्हे चक्क बाहुल्यांची!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

माणूस आजारी पडला की, त्याला रुग्णालयामध्ये जाण्याशिवाय पर्याय नसतो, कारण तिथेच त्याच्यावर योग्य तो उपचार होतो. आजारपण हे कधीही सांगून येत नाही, म्हणून कधीही थोडे जरी आजारी पडल्यास डॉक्टरकडे किंवा रुग्णालयामध्ये नक्की जावे.

कारण आजकाल खूप विचित्र आजार आणि रोग माणसामध्ये पसरताना आपल्याला दिसतात आणि त्यामुळे एखाद्याचा जीव देखील गमवण्याची भीती असते.

रुग्णालय आपल्या जीवनात महत्त्वाची भूमिका बजावते. पण आज आम्ही तुम्हाला एका वेगळ्याच रुग्णालयाबद्दल सांगणार आहोत जे माणसांचे रुग्णालय नाही, प्राण्यांचे देखील नाही, तर चक्क बाहुल्यांचे आहे. विश्वास नाही बसत ना, हो पण हे सत्य आहे. चला तर मग जाणून घेऊया, या आगळ्यावेगळ्या रुग्णालयाबद्दल…

 

doll-hospital-InMarathi

ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये एक असे रुग्णालय आहे, जिथे फक्त बाहुल्यांचा उपचार केला जातो. येथे खराब बाहुल्यांना रिपेअर करून नवीन बनवले जाते.

आता तुम्ही जर असा विचार करत असाल की, या बाहुल्यांच्या रुग्णालयामध्ये कोण येत असेल. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हे रुग्णालय चालू झाल्यापासून आतापर्यंत या रुग्णालयात जवळपास ३० लाखांपेक्षा जास्त बाहुल्यांचा उपचार करण्यात आलेला आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

या रुग्णालयाची सुरुवात १९१३ मध्ये झाली होती.

ऑस्ट्रेलियाच्या सिडनीमध्ये १९१३ साली या रुग्णालयाची सुरुवात  हारोल्ड चॅपमॅन यांनी केली होती. असे समजण्यात आले आहे की, हारोल्डने सिडनीमध्ये एका जनरल स्टोरच्या रुपात या रूग्णालयाची सुरुवात केली होती.

 

doll hospital 7 InMarathi

 

त्यांच्या भावाचा शिपिंगचा व्यवसाय होता आणि त्याच्यातूनच जपानमधून बाहुल्या आयात केल्या जात असत. या बाहुल्यांच्या शिपिंग दरम्यान बाहुल्यांचे काही भाग तुटत असत, ज्याला हारोल्ड नीट करत असत. हळूहळू त्यांनी या जनरल स्टोरला एका बाहुल्यांच्या रुग्णालयाचे स्वरूप दिले. सध्या या बाहुल्यांच्या रुग्णालयाचे संचालन हारोल्डचा नातू जियोफ करत आहेत.

 

doll hospital 1 InMarathi

 

येथे तुम्हाला एक्स्पर्ट सर्विस मिळेल…

हे रुग्णालय खूप खास मानले जाते कारण येथे बाहुल्यांवर उपचार करण्यासाठी एक्सपर्टस आहेत. येथे एका साधारण रुग्णालयासारखेच वेगवेगळे वॉर्ड बनवले गेले आहेत जेथे वेगवेगळे स्पेशलिस्ट सेवा देतात.

 

doll hospital 3 InMarathi

 

काही स्पेशलिस्ट बाहुल्यांचे डोके रिपेयर करण्यामध्ये पारंगत आहेत तर काही तिचे पाय ठीक करण्यात एक्सपर्ट आहेत. येथे मॉर्ड़न आणि एन्टिक बाहुल्यांसाठी देखील वेगवेगळे सेक्शन बनवण्यात आले आहेत.

येथे बाहुल्यांव्यतिरिक्त अजूनही काही गोष्टी दुरुस्त होतात…

या रुग्णालयाच्या सुरवातीच्या काळामध्ये येथे फक्त बाहुल्याच दुरुस्त केल्या जातात पण जेव्हा १९३० मध्ये हारोल्ड चॅपमॅनच्या मुलाने येथील काम सांभाळले तेव्हा त्यांनी येथे इतर वस्तूंची दुरुस्ती करणे देखील सुरु केले. जसे टेडी बियर, सॉफ्ट टॉयज, छत्री, हँड बॅग इत्यादी. पण तरीही येथील स्पेशालिटी बाहुल्या दुरुस्त करणे हीच आहे.

 

doll hospital 4 InMarathi

 

१९३९ साली या रुग्णालयाचा व्यवसाय चांगला झाला होता…

बाहुल्यांच्या या रुग्णालयाची सुरुवात १९१३ मध्ये झाली होती. परंतु बाहुल्या दुरुस्त करण्याचे हे काम १९३९ मध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी चमकले होते कारण युद्धाच्यावेळी प्रत्येक देशामध्ये त्या वस्तूची कमतरता होऊ लागली होती जी दुसऱ्या देशामधून मागवली जात असे.

त्यामुळे ऑस्ट्रेलियामध्ये देखील नवीन बाहुल्यांची खूपच कमतरता भासू लागली होती. येथे जास्तकरून जपानमधून बाहुल्या येत असत. त्यामुळे त्यांच्याकडे ज्या बाहुल्या आहेत.

 

 

त्यांच्यातच काम चालवावे लागत होते आणि जेव्हा त्या खराब होत असत तेव्हा त्यांना दुरुस्त करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताच मार्ग नव्हता.

 

doll hospital 8 InMarathi

 

लहान मुलांचा आनंद सर्वात महत्त्वाचा आहे…

बाहुल्यांच्या रुग्णालयाचे सध्याचे संचालक जियोफ यांचे म्हणणे आहे की, “जेव्हा एवढी लहान मुलगी आपल्या प्रिय बाहुलीला परत घेण्यासाठी येते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेगळेच हास्य असते आणि त्याच्यापेक्षा मोठं आमच्यासाठी दुसरं काही नाही.

पुढे त्यांनी सांगितले की, “जेव्हा लोक आपल्या प्रिय बाहुलीला येथे दुरुस्तीसाठी द्यायला येतात तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात. पण जेव्हा परत घेऊन जातात त्यावेळी त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू असतात. त्यांचा त्यांच्या बाहुलीवर खूप जीव असतो.”

doll hospital 9 InMarathi

 

असे हे बाहुलीचे रुग्णालय लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच एक आगळेवेगळे सुख देते आणि आपल्या बहुलीमध्ये असलेल्या आठवणी जपण्यास मदत करते.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?