' जाणून घ्या : ‘केबीसी’मध्ये अमिताभ बच्चन यांच्या संगणक स्क्रीनवर काय दिसतं? – InMarathi

जाणून घ्या : ‘केबीसी’मध्ये अमिताभ बच्चन यांच्या संगणक स्क्रीनवर काय दिसतं?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

रिअॅलिटी शो हा प्रत्येक टिव्हीप्रेमी व्यक्तीच्या आयुष्यातला महत्त्वाच्या भाग आहे. टिव्हीवर आजकाल खूप नवनवीन रिअॅलिटी शो आपल्याला पाहायला मिळतात.

त्यातलाच एक हिट शो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’ हा आहे. २००० साली आलेल्या या शो ला कमी वेळात खूप प्रसिद्धी मिळाली. या ‘कौन बनेगा करोडपती’ शोचे होस्ट बिग बी म्हणजेच सुपरस्टार अमिताभ बच्चन हे आहेत. लवकरच या शो चा नवीन सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

amitabh-bacchan-marathipizza13

 

हे ही वाचा –

===

 

कौन बनेगा करोडपती यायच्या अगोदर अमिताभ बच्चन बऱ्यापैकी कर्जात बुडालेले होते. त्यांची ABCL Entertainment ही कंपनी कर्जाच्या खोल गाळात रुतली होती.

येणारे सिनेमे एका पाठोपाठ फ्लॉप होत चालले होते आणि आर्थिक स्थिती बऱ्यापैकी कमजोर झाली होती.

 

amitabh-bacchan-marathipizza02

हा एक कार्यक्रम सुरु झाला आणि अमिताभ ने रातोरात फिनिक्स पक्ष्याने ज्याप्रमाणे राखेतून भरारी घ्यावी त्याप्रमाणे आपल्या डबघाईला आलेल्या आर्थिक स्थितीच्या जाळ्यातून फिनिक्स भरारी घेतली.

आजपर्यंत या शो ने कितीतरी लोकांना आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मदत केली आहे. हे जिंकलेले लोक या शोमार्फत लोकांच्या समोर आले आणि त्यांच्या आयुष्याची कथा समोर आली, त्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली.

तुम्ही हा शो नेहमी बघत असाल, तर तुम्हाला माहित असेल की, अमिताभ बच्चन त्यांच्यासमोर असलेल्या संगणकावर बघून “हॉट सीट”वर असणाऱ्या स्पर्धकाला प्रश्न विचारत असतात.

एक शंका नेहमी मनामध्ये निर्माण होते, ती म्हणजे अमिताभ बच्चन यांच्या संगणक स्क्रीनवर नेमके काय दिसते? कारण त्यांच्या संगणकाची स्क्रीन जास्त दाखवली जात नाही.

चला मग जाणून घेऊया, नेमके त्यांच्या स्क्रीन काय दाखवले जाते?

 

amitabh bachchan kbc inmarathi

केबीसीमध्ये भाग घेतलेल्या एका स्पर्धकाने सांगितले की, अमिताभ बच्चन आपल्या ‘कम्युटर जी’ च्या स्क्रीनवर काय-काय बघू शकतात.

अभिनव पांडे यांनी या शोमध्ये भाग घेऊन १२.५ लाख जिंकले होते. त्यांनी क्वोरा या साईटवर या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. त्यांनी सांगितले आहे की,

शो च्या दरम्यान जेव्हा पहिला स्पर्धक हॉट सीटवर होता, तेव्हा ते ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट स्पर्धक’ म्हणून बरोबर अमिताभ बच्चन यांच्या बरोबर मागे बसले होते, जिथून त्यांना अमिताभ बच्चन यांच्या संगणकाची स्क्रीन दिसत होती.

अभिनवने सांगितले की, त्यांचा संगणक रिस्पॉन्सिव आहे, ते त्याला ऑपरेट करू शकतात. पण मुख्य कम्युटर ऑपरेटर हा स्टुडिओच्या ब्लॅक झोनमध्ये बसलेला असतो.

स्पर्धकांचा संगणक अनरिस्पॉन्सिव असतो आणि ब्लॅक झोनमध्ये बसलेला माणूस हे संगणक ऑपरेट करत असतो.

 

amitabh bachchan kbc inmarathi1

 

हे ही वाचा –

===

 

अमिताभ बच्चन यांच्या स्क्रीनवर प्रश्न, ऑप्शन, प्रश्नांचा टप्पा, राहिलेल्या लाइफलाइन दाखवल्या जातात. हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाची माहिती म्हणजेच त्याचे नाव, शहर, व्यवसाय इत्यादी सर्व स्क्रीनवर दिसते.

प्रश्नाचे योग्य उत्तर स्पर्धकाने लॉक करण्याच्या आधीच त्यांना देखील दिसत नाही. उत्तर लॉक केल्यानंतरच त्यांना त्याचे योग्य उत्तर समजते.

 

amitabh bachchan kbc inmarathi2

अमिताभ बच्चन यांच्या स्क्रीनवर एका दुसऱ्या विंडोमध्ये ‘फोन अ फ्रेन्ड’ नॉमिनीजची माहिती देखील दिसते. त्यांच्या स्क्रीनवर टायमर त्यांना ब्रेकच्या वेळेची माहिती देखील देत असते.

जर त्यांना वाटले तर, ते या वेळेला कमी किंवा जास्त करू शकतात. ‘फास्टेस्ट फिंगर फर्स्ट’ च्या दरम्यान ही स्क्रीन ऑफ असते.

टीव्हीवर शो बघत असताना आपल्याला या गोष्टी माहित नसतात, याविषयी उत्सुकता मात्र खूप असते. तुम्हाला पडलेल्या या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं असेल अशी आशा करतो.

==

हे ही वाचा –

===

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?