' आपल्या पृथ्वीवर संत्र्यांच्या आकाराएवढे मेंदू असणारी माणसे होती. वाचा माणसाच्या ‘त्या’ प्रजातीबद्दल – InMarathi

आपल्या पृथ्वीवर संत्र्यांच्या आकाराएवढे मेंदू असणारी माणसे होती. वाचा माणसाच्या ‘त्या’ प्रजातीबद्दल

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

माकड हा प्राणी मानवाचा पूर्वज आहे असे सांगितले असे जाते. विज्ञानाने सुद्धा ही गोष्ट सिद्ध केली आहे. डार्विनचा उत्क्रांतीचा सिद्धांत आणि एकूणच मानवाची उत्क्रांती याविषयी आजही आपल्याला कुतूहल आहे.

म्हणूनच मानवाच्या उत्क्रांतीविषयी आज २१ व्या शतकात सुद्धा संशोधन सुरू आहे आणि अजूनही त्याचे ठोस कारण वा त्या मागचे ठोस निष्कर्ष मिळालेले नाहीत.

ह्यावरून आपण अंदाज बंधू शकतो की हा विषय किती गहन आहे. आजही कित्येक वैज्ञानिक, संशोधक दिवस रात्र एक करून मानवी इतिहासाच्या शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत आणि त्याच दिशेने एक यशस्वी पावले टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

काही वर्षांपूर्वी झालेल्या संशोधनात असेच महत्त्वाचे पाऊल पडले आहे असे म्हणता येईल.

 

homo-naledi-marathipizza01

 

दक्षिण अाफ्रिकेमध्ये मानवाच्या नव्या प्रजातीचा शोधल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे. संशोधकांच्या मते जोहान्सबर्गपासून सुमारे ५० किमी दूर ‘रायझिंग स्टार’ गुहांमध्ये गाडलेले १५ मानवी सांगाड्यांचे अर्धवट भाग आढळले आहेत.

रिपोर्टनुसार त्यांची लांबी ५ फूट आणि वजन ४५ किलोपेक्षा अधिक आहे. ही प्रजाती आजवर माहित असणाऱ्या प्रजातींहून वेगळी असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.

 

homo-naledi-marathipizza02

 

सायन्स मॅगझिन ‘ईलाइफ’ मध्ये पब्लिश झालेल्या स्टडी रिपोर्टवरून असे लक्षात येते की, या प्रजातीतील लोक धार्मिक कामे ही करत असत. ही नवी माहिती, मानवाची ही प्रजाती उत्क्रांतीच्या विषयावरील संशोधनाची दिशा बदलू शकतात.

संशोधकांच्या मते या शोधामुळे पूर्वजांबद्दलचे आपले विचार बदलण्यास मदत होणार आहे. या नव्या प्रजातीला ‘होमो नलेडी’ नाव देण्यात आले आहे. स्थानिक भाषेत त्याचा अर्थ ‘स्टार मॅन’ असा होतो.

रिपोर्टनुसार, नलेडीचा मेंदूही फार छोटा असतो. त्याचा आकार जवळपास एका संत्र्याएवढा असावा. गुहेत खोदकाम करताना संशोधकांना हे मानवी सांगाड्यांचे अवशेष आढळले आहेत.

मेंदूचा आकार लहान असला, तरीही या मेंदूची रचना ही काहीशी गुंतागुंतीची आणि आधुनिक काळातील मानवाच्या मेंदूप्रमाणेच आहे.

या नलेडी प्रजातीतील १५ नवजात बालके आणि प्रौढांच्या सांगाड्याचे भाग असावे, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जवळपास १५५० विशेष यावेळी मिळाले आहेत.

मात्र ही प्रजाती पृथ्वीवर किती वर्षांपूर्वी अस्तित्वात होती याबाबत संशोधकांना अद्याप माहिती मिळालेली नाही.

 

homo-naledi-marathipizza03

 

संशोधकांच्या टीमचे नेतृत्व करणारे प्रोफेसर ली बर्गर यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की,

त्यांच्या मते नवी प्रजाती ‘जिनियस होमो’ म्हणजे आधुनिक मानवासारखी असू शकते. त्यांच्या अंदाजानुसार ही प्रजाती सुमारे 30 लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेमध्ये राहत असावी.

नॅचरल हिस्ट्री म्युझियमचे प्रोफेसर क्रिस स्ट्रींगर यांनी नलेडी यांचा हा शोध अत्यंत महत्त्वाचा असल्याचे म्हटले होते. ह्याविषयी बोलताना ते म्हणाले होते की,

आम्हाला मानवाच्या अधिकाधिक प्रजातींबाबत माहिती मिळत आहे. त्यावरून मानवाच्या विकासासाठी निसर्गाने नेहमीच प्रयोग केले असल्याचे समोर येते.

रिपोर्टनुसार नव्या प्रजातीचे अवशेष जोहान्सबर्गच्या विटवाटर्सरँड युनिव्हर्सिटीच्या एका सेफ रूममध्ये ठेवले आहेत. ही खोली एखाद्या बँकेच्या लॉकरएवढीच सुरक्षित आहे.

 

homo-naledi-marathipizza04

 

ह्या शोधामुळे मानवी उत्क्रांतीबद्दल जाणून घेण्याच्या विषयात क्रांतिकारी बदल घडून आला आहे हे मात्र नक्की !

मानवी उत्क्रांतीविषयी आजच्या काळातही असलेली उत्सुकता, त्याविषयी मिळत जाणारी नवी नवी माहिती हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळेच या नव्या प्रजातीविषयी होत असलेले संशोधन हा संशोधनाला नवी दिशा देणारा टप्पा ठरला आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?