' शेतकरी राजा हताश होऊ नको, आता तुझा स्मार्टफोनच तुझ्या पिकांची काळजी घेईल! – InMarathi

शेतकरी राजा हताश होऊ नको, आता तुझा स्मार्टफोनच तुझ्या पिकांची काळजी घेईल!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

शेतकरी हा आपल्या सर्वांसाठीच खूप महत्त्वाचा आहे. त्याने पिकवलेल्या अन्नधान्यावरच आपण जगत आहोत. शेतकरी लोकांची पोटं भरण्यासाठी राब – राब राबत आहेत, पण आज त्याच्यावरच उपासमारीची वेळ येत असल्याचे आपल्याला दिसून येते. गेल्या काही वर्षात खूप शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केल्याच्या बातम्या आपल्या कानावर नक्कीच आल्या असतील. आपल्या बळीराजावर आत्महत्या करण्याची वेळ यावी, यापेक्षा मोठे दुर्दैव दुसरे कोणतेही नाही. कधी नैसर्गिक आपत्तीमुळे, तर कधी कीड किंवा इतर जीव जंतूंमुळे पिकांची नासाडी होती आणि आपल्या बळीराजाची सर्व मेहनतीवर पाणी फिरते. त्याचबरोबर बाजारभावाचा फटका देखील शेतकऱ्यांना बसतो. पण आज आम्ही तुम्हाला शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आलेल्या अश्या एका अॅपबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने शेतकरी आपल्या पिकांची योग्य रीतीने काळजी घेऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया या अॅपविषयी आणि नेमका त्याचा फायदा शेतकऱ्यांना कसा होणार त्याविषयी…

plantix.marathipizza
googleusercontent.com

वोरुगंती सुरेंद्र हा शेतकरी, जो आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात एक एकर क्षेत्रामध्ये भाताची म्हणजेच तांदळाची शेती करतो. तो आणि त्याच्यासारखे शेकडो शेतकरी एक नवीन अॅप्लीकेशन वापरत आहेत, ज्याच्याने ते कीटक आणि रोगांवर आळा घालू शकतात. तो म्हणाला कि,

हे अतिशय उपयुक्त अॅप आहे आणि शेतकऱ्यांना त्याची गरज आहे.

ह्या अॅपला प्लांटिक्स असे म्हटले जाते, हे अॅप हजारो किमी दूर जर्मनीमधील बर्लिन येथे विकसित करण्यात आले होते. यासाठी पदवी मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि शास्त्रज्ञांचा समूह शेतकऱ्यांना रोग, कीटकांपासून होणारे नुकसान आणि त्यांच्या पिकांमधील कमतरतेला भरून काढण्यासाठी एकत्र आले. पिट (प्रोग्रेसिव्ह एनव्हायर्नमेंटल अॅण्ड अॅग्रिकल्चरल टेक्नॉलॉजीज) चे सह – संस्थापक, शार्लट शुमान यांनी सांगितले कि,

शेतकऱ्यांना काय हवे आहे, हे समजून घेणे खरोखरच महत्त्वाचे होते, म्हणून आम्ही भारतामध्ये यावर खूप मुलभूत काम केले

plantix.marathipizza1
genderingermandevelopment.net

जर्मनीच्या या समूहाने भारताच्या ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची संशोधन केली आणि त्यामधून निष्कर्ष काढला कि, प्रतिमा ओळखणारे अॅप्पलीकेशन निदान शेतकऱ्यांना नक्कीच मदत करेल. खासकरून, सध्या स्मार्टफोनच्या किंमती खूपच कमी झालेल्या आहेत, त्यामुळे याची अंमलबजावणी करणे खूपच सोप्पे होईल.

सुरेंद्रच्या कार्लेपालेम गावामध्ये ५०० किंवा त्यापेक्षा जास्त शेतकरी तांदूळ, मका, कापूस, मिरची आणि इतर अनेक पिके वाढवतात. त्यापैकी फक्त २० जणांकडे स्वतःचे स्मार्टफोन्स होते. पण असे असले तरी ते भगवान आहेत, कारण त्यांच्यातील काही एकमेकांना शेअर करतात, जेणेकरून त्यांचे सहकारी शेतकरी त्यांच्या पिकांचे फोटो घेऊ शकतील आणि अॅपवर ते फोटो अपलोड करू शकतील.
शेतकरी नुकसान झालेल्या पिकांची छायाचित्रे काढतो आणि आकृत्या प्रतिमा वाढवण्याच्या डेटाबेसचा वापर करून संभाव्य कीटक आणि रोग ओळखू शकतात.

plantix.marathipizza2
bbci.co.uk

प्लांटिक्स फक्त पिकांच्या रोगाची माहिती देत नाही, तर टोमॅटो संयंत्रात पोटॅशियमची कमतरता, गव्हावरील गंज आणि केळीमधल आहाराची कमतरता यांसारख्या आणि इतर परिणामांचा निष्कर्ष काढून त्यावर सल्ला देखील दिला जातो. पिटच्या डेटाबेसमध्ये सध्या जवळपास १५ लाख छायाचित्रे समाविष्ट आहेत. एका वर्षापूर्वी फक्त १००००० छायाचित्रे होती. भारतामध्ये याचे सध्या ३,००,००० ते ४,००,००० वापरकर्ते आहेत.

जिओ – टॅगिंग हे कोणते पिक कुठे घ्यावे याची माहिती देते, तसेच ते निरोगी आहेत कि नाहीत याची माहिती मिळते. या अॅप्सद्वारे हवामानाचा रेकोर्ड देखील तुम्ही ठेवू शकता आणि त्यानुसार उपाययोजना करू शकता. असे हे ज्ञान शेतकऱ्यांसाठीच नव्हे तर, किटकनाशके उत्पादित करणाऱ्या लोकांसाठी देखील खूप उपोयोगाचे ठरू शकते.

plantix.marathipizza3
bbci.co.uk

क्रॉप इन टेक्नॉलॉजीच्या मिस्टर कुमार यांच्या मते,

फक्त माहिती गोळा करणे हा यामागचा हेतू नाही, तर ते समजून घेऊन ते क्रियाशील अंतर्दृष्टीने सदर करणे खूपच आव्हानात्मक आहे.

असे हे अॅप शेतकऱ्यांचे जीवन बदलण्यासाठी कारणीभूत ठरू शकते आणि शेतकऱ्याला सुजाण व प्रगतीशील बनवू शकते, त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने या अॅपचा वापर करणे खूप गरजेचे आहे.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?