' १००% खोट्या असणाऱ्या `या’ १२ गोष्टींवर आपण लहानपणापासून विश्वास ठेवत आलोय… – InMarathi

१००% खोट्या असणाऱ्या `या’ १२ गोष्टींवर आपण लहानपणापासून विश्वास ठेवत आलोय…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

आपल्याला अनेक वैज्ञानिक तथ्य सांगितली जातात. त्यावर आपण विश्‍वासही ठेवतो. जसे की कॉफी पिण्‍याने शरीरावर वाईट परिणाम होतो. दुस-या दिवशी कॉफी किती आरोग्यास चांगले आहे हेही सांगितले जाते. त्यामुळे आपला गोंधळ उडतो.  आज आम्ही तुम्हाला अशी काही शास्त्रीय तथ्‍ये सांगणार आहोत जी लोकांना माहिती असतात, मात्र प्रत्यक्षात खरी नसतात.

उदाहणार्थ आपण अनेकदा मैदानात एक व्यक्ती लाल रंगाच्या कापडाने रेड्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाहत असतो.

अनेक चित्रपटांतही रेडा लाल रंग पाहताच चिडून मागे लागतो असे दाखवले जाते. पण प्रत्यक्षात तसे नसते. रेड्याच्या चिडण्यामागे भलतेच कारण असते.

चला जाणून घेऊया असे गैरसमज आणि त्यामागचे खरे कारण!

१) च्युइंगम पचायला ७ वर्षे लागतात

 

scinetific-facts-marathipizza01
tasmanhealth.co.nz

जेव्हा आपण च्युइंगम फुगवतो तेव्हा आपल्या मनात एक भीती असते. की आपण गिळलं तर ते आपल्या पोटात ७ वर्षांपर्यंत राहील! तर ही भीती चूक आहे.

वास्तव असे की ते इतर पदार्थांप्रमाणे पचवले जरी जात नसले तरी एक दोन दिवसातच शौचावाटे शरीराबाहेर फेकले जाते.

 

२) जेवल्यानंतर ३० मिनिटे पोहायला जाऊ नये, अन्यथा बुडण्याचा धोका असतो

 

scinetific-facts-marathipizza02
readersdigest.co.uk

हे चुकीचे तथ्‍य आपल्याला पालक आणि नातेवाईक सांगत असतात. जेवल्यानंतर अन्नपचनासाठी जठराकडे ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी भरपूर रक्त लागते. आणि त्यामुळे पोहण्यासाठी स्नायूंना आवश्यक असणारं रक्त कमी पडून तुम्ही बुडून जाल – असा हा समज आहे – जो अगदीच चूक आहे.

आपल्या शरीरात अश्या वेळेसाठी सर्वत्र व्यवस्थित रक्तपुरवठा होण्याइतकं रक्त सहज उपलब्ध असतं. 🙂

 

३) बैलाला लाल रंगाचा येतो राग 

 

scientific-facts-marathipizza01
howwhywhat.net

लाल झेंड्यामुळे बैल क्रोधित होतो, असा आपला गैरसमज असतो पण मुळात त्याचे कपड्यामुळे लक्ष विचलित होते.

 

४) एकाच ठिकाणी वीज दुस-यांदा पडत नाही 

 

scientific-facts-marathipizza04
media.mnn.com

वीज एकाच ठिकाणी एकापेक्षा अधिक वेळा नक्कीच पडू शकते. खरंतर, ज्या वादळ-ढगामुळे वीज कडाडत आहे, ते त्याच ठिकाणी थांबलं तर १० मिनिटांतच पुन्हा त्याच ठिकाणी वीज कोसळू शकते. अशी कित्येक उदाहरणं पहायला देखील मिळतात.

 

५) उल्कापातामुळे डायनोसॉर नष्‍ट झाले

 

scientific-facts-marathipizza05
img00.deviantart.net

असे मानले जाते की डायनोसॉर उल्कापातामुळे – म्हणजेच अवकाशातून मोठी उल्का पृथ्वीवर आढळल्यामुळे – नष्‍ट झालेत. तसे नसून जैवविविधतेच्या ऱ्हासामुळे ह्या महाकाय प्रजातीचे अस्तित्व संपले आहे.

 

६) जीभ विशिष्‍ट चव ओळखते

 

scientific-facts-marathipizza06
eliquidcoast.com

शाळेत असताना आपल्याला शिकवले जाते की जीभेमध्‍ये विशिष्‍ट चवीचे क्षेत्र असतात. ते वेगवेगळ्या चवींसाठी असते. हे पूर्णपणे चुकीचे आहे.

शास्त्रज्ञांच्या शोधानुसार जीभेवर सर्वत्र टेस्ट सेन्सर्स आच्छादलेले असतात. त्याने वेगवेगळ्या चवी ओळखता येतात. एका विशिष्ठ भागात एकच चव ओळखली जाते हे असत्य आहे.

 

७) चंद्रावरुन चीनची भिंत दिसते

 

scientific-facts-marathipizza07
crystalinks.com

चंद्रावरुन चीनची ग्रेट वॉल ही भिंत दिसते असे मानले जाते. मात्र हे खरे नाही. अनेक अंतराळवीरांनी खात्रीने सांगितले की हि गोष्ट खोटी आहे.

 

८) अल्कोहोल तुमचे शरीर गरम ठेवते

 

scientific-facts-marathipizza08
rd.com

आपले बहुतेक मित्र सांगतात, की अल्कोहोल हे थंडीत आपल्यात गरम ठेवते. मात्र हे चुकीचे तथ्‍य आहे. कारण अल्कोहोल तुमचे मूळ तापमान कमी करते.

९) आपल्याला पाच ज्ञानेंद्रिय आहेत

 

scientific-facts-marathipizza09
lydieometto.com

आपण असे समजतो कि माणसाला पाच ज्ञानेंद्रिय असतात. जसे की नाक, जीभ, डोळे, कान आणि त्वचा.

मात्र वास्तविक अनेक ज्ञानेंद्रिय असतात. 

काही न्यूरॉलॉजिस्ट ९ ज्ञानेंद्रिय असल्याचं सांगतात – तर काहींनी ही यादी २१ पर्यंत पुढे नेली आहे.

 

१०) पाण्‍याने तुमची बोटे सूजतात 

 

scientific-facts-marathipizza10
scientific-facts-marathipizza10

आपले बोट सूजणे आणि सूरकुत्या पडणे. याचे कारण त्वचा पाणी शोषत असल्याचे सांगितले जाते. हे चुकीचे आहे. नवीन संशोधन असे सां‍गते, की याच्यामागे ऑटोमॅटिक नर्व्हस सिस्टिम रिअॅक्शन आहे.

 

११) रक्तवाहिन्यांमधील रक्त निळे असते

 

scientific-facts-marathipizza11
ak1.picdn.net

असे समजले जाते की आपल्या रक्तवाहिन्यांमधील रक्ताचा रंग निळा असतो. हे आणखी चुकीचे तथ्‍य ज्यावर आपण विश्‍वास ठेवतो. आपल्या रक्तवाहिन्या निळ्या दिसतात कारण वेव्हलेट लाइट शुध्‍दीकरण त्वचेकडून होत असते.

 

१२) वटवाघूळ पाहू शकत नाही 

 

scientific-facts-marathipizza12
badassoftheweek.com

हे तथ्‍य चुकीचे आहे. खरे म्हणजे वटवाघूळ बायोसोनरचा वापर करुन शिकार करतात.

काय? आहेत कि नाही चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी, तर मित्रांनो आता शहाणे व्हा; आणि अशा वेडगळ गोष्टींमध्ये रमण्या ऐवजी वैज्ञानिक दृष्टिकोनातून जगाकडे पाहायला शिका. अंधश्रद्धेपासून दूर जा, ऐकीव गोष्टींवर, भाबडेपणाने विश्वास ठेवणे सोडून द्या. सृष्टीकर्त्याने निर्माण केलेले हे जग मोकळ्या मनाने एन्जॉय करा.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?