' निमिषा उभारतेय बेघर कलाकारांसाठी आधारवड – #HomeForArtists! – InMarathi

निमिषा उभारतेय बेघर कलाकारांसाठी आधारवड – #HomeForArtists!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

तुम्हाला तुमची स्वतःची एखादी passion आहे का? काय आहे? त्यासाठी तुम्ही काय करू शकता? जग तुम्हाला विरोध करू शकतं आणि ते करणारंच. त्यात तुमचे स्वतःचे आई बाबा पण असू शकतात. तुमची passion आणि तुम्हाला तिची असलेली भूक किती दांडगी आहे?

 

jogan marathipizza

 

ही आहे जयपूरची निमिषा वर्मा, ही आहे हाडाची कलाकार. हिने आपल्या passion चा पाठलाग करायचा ठरवलं – तिच्या आईबाबांनी विरोध केला. पण तिची passion पक्की होती तिला त्यात कसलाच सौदा करायचा नव्हता. मग काय – आपल्या भाऊ सुधांशूला सोबत घेऊन घराबाहेर पडली. तिथून सुरुवात झाली निमिशाच्या एका मंतरलेल्या प्रवासाची…

घरातून बाहेर पडल्याच्या अनुभवाबद्दल बोलताना ‘जोगन’ निमिषा सांगते..

जेव्हा मी माझ्या आईबाबांचं घर सोडलं तेव्हा सुरुवातीचे काही दिवस खूप खडतर होते. पहिले चार दिवस आम्ही अक्षरशः राहायला जागा शोधण्यासाठी भटकत होतो. ते चार दिवस मी माझ्या आयुष्यात विसरू शकत नाही. तेव्हाच मी ठरवलं की अशी एक कलाकाराची जागा असावी, हक्काची, कलेची, जिथे फक्त कलाकार आणि त्याची कला असावी. ज्याला एक कलाकार घर म्हणू शकेल.

 

आणि अश्या तर्हेने #HomeForArtists नावारूपाला आलं. इथे नवनवीन कलेला वाव आहे. कलाकार हक्काने येतात आपली कला जोपासतात. वाचन, लिखाण, त्यावर चर्चा असं सगळं कलेने भारलेलं वातावरण असतं ह्या घरात. चित्रकला, संगीत, लेखन वा अजून काही तुम्ही कलाकार असाल तर तुमचं स्वागत आहे.

 

home for artist marathipizza

 

#HomeForArtists मधल्या दिनक्रमाबद्दल बोलतांना निमिषा सांगते..

 

आम्ही सकाळी ध्यान करतो, जेवण बनवतो, लिहितो, चित्र काढतो…सगळं एकत्रं. कधीकधीतर आम्ही झोपत पण नाही. मग आम्ही वाचतो, त्यावर चर्चा करतो. नवीन कलाकारांच्या अनुभवाबद्दल गप्पा मारतो.

 

painting

 

raw marathipizza

 

इथल्या कोणत्याही साधारण दिवशी ह्या घराची परिस्थिती अशी असते. जे घरात राहण्याचं भाडं देऊ शकतात ते देतात पण एक-दोन दिवसासाठी आलेल्यांना कुणी पैसे मागत नाही. कलाकार कामात गुंतून मजा करतात, कसलंच टेन्शन नाही नं कसलं टार्गेट नाही, पण नियम आहेत. ह्या छोट्याश्या घराचे पण काही नियम आहेत.

 

rules marathipizza

 

तिच्यासारख्या आपल्या passion ने ‘पछाडलेल्या वेड्यां’ना ती सांगते..

माझ्यासाठी कला म्हणजे बळ. तुम्ही तुमचं सगळं बळ एकवटायचं आणि सुख असो वा दुखः त्यात टाकून तुमच्या कलेत उतरवायचं. मग ते लेखन असो, चित्र वा गाणं. मग हा तुमच्या कलेचा बेजोड नमुना तुमची गोष्ट जगाला सांगतो. तुम्हाला व्यक्त करतो.

 

शेवटी निरोप घेतांना निमिषा म्हणते की ती एवढ्यावरंच थांबणार नाहीये…

 

असंच ह्या घरच मला एका विद्यापीठात रुपांतर करायचंय. जिथे कलाकार लोक पदवीसाठी नाही तर कला जगायला येतील. कला जोपासतील, मोठी करतील. सध्याच्या कागदी घोड्यांना बांधील असलेल्या शिक्षण पद्धतीपेक्षा संपूर्ण वेगळी अशी ती university असेल. लोक तिथे येतील, शिकतील, शिकवतील, आणि अशाच कलेच्या, नैसर्गिक वातावरणात राहतील.

 

निमिशाच्या धैर्याला, कणखरपणाला, चिकाटीला InMarathi च्या टीम कडून सलाम!

team houseforartists marathipizza

 

निमिशाबद्दल जाणून घेण्यासाठी तिचं काम बघण्यासाठी इथे बघा .

ही निमिशाची मुलाखत घेतलीये Scoopwhoop च्या टीम ने.

Image & story Source

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Abhidnya Adwant

Author @ मराठी pizza

abhidnya has 47 posts and counting.See all posts by abhidnya

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?