'औरंगजेबने देखील लावले होते फटक्यांवर निर्बंध...

औरंगजेबने देखील लावले होते फटक्यांवर निर्बंध…

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

 

सुप्रीम कोर्टने दिल्लीत तर हाय कोर्टने मुंबईत फटक्यांवर बंदी घातली आहे. सुप्रीम कोर्टाचे म्हणणे असे आहे की, दिल्लीत प्रदूषण वाढ खूप प्रमाणात होत आहे. त्यामुळे फटाक्यांवर निर्बंधचं उचित आहे.

crackers-ban-marathipizza

बसं मग काय आलं चर्चेच वादळ… जेव्हापासून सुप्रीम कोर्टाने दिल्लीत आणि हाय कोर्टाने मुंबईत फटाक्यांच्या विक्रीवर बंदी लावली आहे. तेव्हापासून राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधान आलय. काही लोकं या निर्णयाचे समर्थन करताहेत तर काही लोकं नेहमीप्रमाणे त्याचा विरोध करत आहेत. या निर्देशामुळे या दिवाळीत फटाके पेटतील की नाही ते माहित नाही पण या विषयावरून नवीन वाद नक्कीच पेटलाय. काही लोकं म्हणताहेत की कोर्टाचा आदेश अतिशय उत्तम आहे, कारण फटक्यांनी वायू तसेच ध्वनी प्रदूषण वाढतंं, तर काही लोकं म्हणतात की फटाके जाळणे ही आपली वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा आहे, त्यावर कोणी बंदी लावू शकत नाही आणि कोणी फटाके जाळावे आणि कोणी नाही हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यावर कोर्टाने निर्देश लादू नये. तर काहीनी याला सरळसरळ हुकुमशाही म्हणून जाहीर केले. सोशल मिडीयावर देखील या विषयावर चर्चांना उधान आलेले दिसले. सामान्य लोकांबरोबरच सेलिब्रिटींंनी देखील यात उडी घेतली. मोठ्या प्रमाणात या विषयावर लोकांनी त्यांचे विचार मांडले.

तर यात काही लोक कोर्टाच्या निर्णयाची मुघल बादशाह औरंगजेब याच्या निर्देशा सोबत तुलना करत आहेत.

aurangjeb-marathipizza
ytimg.com

असे सांगितले जाते की, १६६७ साली औरंगजेबने फटाके जाळण्यावर एक फर्मान जारी करत निर्बंध लावला होता. भारताच्या इतिहासात हे पहिल्यांदाच झाले होते जेव्हा फटाक्यांवर निर्बंध लावण्यात आले होते.

aurangjeb01-marathipizza

 

राजस्थान कॅडरचे वरिष्ठ आईएएस अधिकारी संजय दीक्षित यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर औरंगजेबचा तो फर्मान शेअर केला आहे.

संजय यांनी दावा केला आहे की तो औरंगजेबने जारी केलेला मूळ फर्मान आहे. संजयने या फर्मानचा हिंदी अनुवाद देखील ट्वीटरवर शेअर केला आहे.

आता या ट्वीटमध्ये किती सत्य आहे हे तर माहित नाही, पण जर असे खरच असेल तर परंपरा म्हणून फटाके विक्रीचा विरोध करणाऱ्यांची तोंड नक्की बंद होतील…

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?