' “या” रहस्यमय गोष्टी पाहून मानवाच्या अज्ञात इतिहासाबद्दल तुम्हीही विचारात पडाल! – InMarathi

“या” रहस्यमय गोष्टी पाहून मानवाच्या अज्ञात इतिहासाबद्दल तुम्हीही विचारात पडाल!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

विज्ञान हे सगळ्या गोष्टींचा शोध लावू शकतं. पण अशाही काही गोष्टी आहेत ज्यांनी विज्ञानाला देखील आश्चर्यचकित केलं आहे.

कॅलिफोर्नियाच्या डेथ व्हॅलीमध्ये दगड सरकण्यामागचं रहस्य काय? रशियाच्या मॉस्कोमध्ये खोदकामादरम्यान मिळालेल्या ३ हजार वर्षे जुन्या लोखंडाच्या बोल्टमागचे रहस्य काय?

त्याबरोबरच प्राचीन मेक्सिकन शहरामध्ये आर्किटेक्टने काय विचार करून अभ्रकाच्या शीटपासून इमारतीच्या भिंती तयार केल्या होत्या?

जगात अशा अनेक गूढ गोष्टी आहेत ज्यांच्याबाबत खुलासा होणं गरजेचं आहे. वैज्ञानिकही त्यासाठी झटत आहेत. या रहस्यांवर अनेक वर्षांपासून चर्चा होत आहे.

पण ती चर्चा कधी पुढे सरकतच नाही. चला तर मग जाणून घेऊयात जगातील अशाच गूढ रहस्यांबाबत, ज्याबाबत नासाच्या वैज्ञानिकांनाही विचार करणं भाग पडलं आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा :

 

१) दगडाची बाहुली

 

unsolved-mystery-marathipizza01

 

१८८९ मध्ये ईदाहोच्या नाम्पाबाबत अचानक वैज्ञानिकांमध्ये रस वाढू लागला. त्याचे कारण म्हणजे याठिकाणी खोदकामादरम्यान आढळलेली दगडाची बाहुली. मानवाने हाताने तयार केलेली ती बाहुली होती.

दगडाची ही बाहुली ३२० फूट खोल खोदकामादरम्यान आढळली. जगात मानवाच्या अस्तित्वात आल्यानंतर अशा बाहुल्या तयार केल्या जात असाव्यात असा अंदाज लावण्यात आला होता. मात्र पडद्यामागील सत्य अजूनही गूढच आहे.

 

२) पिरॅमिड द पॉवर 

 

unsolved-mystery-marathipizza02

 

प्राचीन मेक्सिकन शहराच्या भिंती अभ्रकाच्या मोठ्या शीटपासून तयार करण्यात आलेल्या आहेत. अभ्रकाच्या खाणींबाबत बोलायचे तर त्या ब्राझीलमध्ये आहेत. पण या खाणी शहरापासून हजारो मैल दूर आहेत.

अभ्रकाचा वापर औद्योगिक आणि ऊर्जा उत्पादनासाठी केला जातो. मग या इमारतींसाठी अभ्रकासारख्या खनिजाचा वापर का केला असेल, असा प्रश्न उपस्थित होतो. आर्किटेक्ट शहरात वीजेच्या स्त्रोतासाठी असे करत होते का, असाही प्रश्न आहेच.

 

३) विचित्र रेषांची आकृती

 

unsolved-mystery-inmarathi

 

फोटोमध्ये दिसणाऱ्या या विचित्र रेषा ४० अंश २७’२८.५६ उत्तर व ९३ डिग्री २३’२४.४२ पूर्व दिशेला पाहण्यात आल्या आहेत. या विचित्र आकृतीबाबत फारशी माहिती उपलब्ध नाही. चीनच्या गानसू शेंगच्या वाळवंटात या रेषा आहेत.

इंग्रजीमध्ये याला चीनी मोझॅक लाइन्स म्हटले जाते. महत्त्वाचे म्हणजे या रेषा मोगाओच्या गेहेच्या आसपास रेखाटल्या आहेत.

त्याला जागतिक वारसास्थळाचा दर्जा आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे टेकडी ओबडधोबड असूनही या रेषा अनेक वर्षांपासून सरळच आहेत.

 

४) नेवाडाचा भीमकाय मानव 

 

unsolved-mystery-marathipizza04

 

असं म्हटलं जातं की, नेवाडामध्ये लाल केस असणारे १२ फूट उंच मानव राहत होते. ही कथा अमेरिकींनी एका गुहेत भीमकाय मानवांच्या केलेल्या हत्येबाबत आहे.

१९११ मध्ये खोदकामादरम्यान एक मानवी जबडा आढळला आहे.  त्याशिवाय १९१३ मध्ये दोन सांगाडेही आढळले होते. त्यांची लांबी ८ आणि १० फूट होती.

 

५) दगडांची रचना

 

stone-arrangement-inmarathi

 

सहारा वाळवंटामध्ये जगातील सर्वात मोठे रहस्य दडलेले आहे. ते म्हणजे दगडांची ही विशिष्ट रचना. १९७३ मध्ये खगोल शास्त्रज्ञ सर्वात आधी याठिकाणी पोहोचले होते.

१९९८ मध्ये प्रोफेसर फ्रेड वँडोर्फच्या टीमने दगडांच्या या रचनेचा अभ्यास केला होता. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, ते इसवीसनपूर्व ६००० वर्षांपूर्वी तयार करण्यात आले आहे.

नाब्टा प्लायामध्ये आढळलेल्या दगडांच्या स्ट्रक्चरबाबत संशोधन केल्यानंतर ते खगोल आणि ज्योतिष शास्त्राविषयी असल्याची माहिती मिळाली.

हजारो वर्षांपूर्वीही त्या लोकांनी एवढा विकास कसा केला होता, हा प्रश्न उपस्थित होतो. त्याकाळी ते याचा वापर कसा करायचे? हे आजही एक रहस्य बनलेले आहे.

हे ही वाचा :

 

६ ) प्राचीन रॉकेट

 

unsolved-mystery-marathipizza06

 

फोटोमध्ये तुम्हाला रॉकेटसारखं काहीतरी दिसत आहे. हे जपानच्या एका गुहेत तयार करण्यात आलेलं एक प्राचीन पेंटिंग आहे. हे पेंटिंग ईसवीसनपूर्व ५,००० वर्षे जुनं असल्याचं सांगितलं जातं.

मग प्राचीनकाळात अशा प्रकारचं एखादं विमान होतं की काय, हा प्रश्न अजूूनही संशोधकांच्या मनात आहे. तसं नसेल तर हे चित्र काय विचार करून काढले असेल?

 

७) लोलाडॉफ प्लेट 

 

unsolved-mystery-marathipizza07

 

नेपाळमध्ये १२,००० वर्षांपूर्वी दगडापासून तयार केलेलं ताट वापरलं जात होतं. मात्र हे ताट पाहिलं की यूएफओची प्रतिकृती असल्याचं जाणवतं. ताटावर एलियनसदृश्य चित्र असल्याचं तुम्ही फोटोत पाहू शकता.

 

८) अनाकलनीय खिळा 

 

unsolved-mystery-marathipizza08

 

१९७४ मध्ये ट्रान्सिल्व्हेनियाच्या मूर्स नदीमध्ये २०,००० वर्षे जुन्या हाडांबरोबर एक ॲल्युमिनियमचा खिळा सापडला होता. त्यावर ऑक्साईडचा एक मिमी जाड थर होता.

शास्त्रज्ञांच्या मते, हा खिळा ३०० ते ४०० वर्षे जुना आहे. विशेष म्हणजे ॲल्युमिनियम नेहमी इतर धातुंबरोबर मिश्रित केलेले आढळते.

चारशे वर्षे जुना असलेला हा खिळा पूर्णपणे ॲल्युमिनियमपासून तयार करण्यात आलेला आहे. १८०८ पूर्वीपर्यंत ॲल्युमिनियमचा शोधही लागला नव्हता. मग चारशे वर्षांपूर्वी शुद्ध ॲल्युमिनियम आले कुठून हा प्रश्न उभा राहतो.

 

९) तीन हजार वर्षे जुना लोखंडी नट

 

unsolved-mystery-marathipizza09

 

१९९८ मध्ये रशियाचे वैज्ञानिक दक्षिण-पश्चिम मॉस्कोपासून सुमारे ३०० किमी अंतरावर एका उल्केच्या अवशेषाचे संशोधन करत होते.

यादरम्यान त्यांना एक दगडाचा तुकडा आढळला. त्याला एक लोखंडी नट लावण्यात आलेला होता. भूगर्भ तज्ज्ञांच्या मते हे दगड ३००० ते ३२०० वर्षे जुना आहे.

त्यावेळी पृथ्वीवर केवळ डायनॉसॉर होते. त्यामुळे त्याचे गूढ वाढले आहे. या दगडामद्ये एक सेंटीमीटर लांबीचा आणि तीन मिलीमीटर व्यासाचा नट दिसून येतो.

तर अशी आहेत ही न उलगडलेली रहस्ये ज्यांनी आजही आधुनिक जगताला बुचकळ्यात टाकले आहे. 

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?