''रक्ता'विषयी तुम्ही ह्या गोष्टी आजवर कधीही ऐकल्या नसतील !

‘रक्ता’विषयी तुम्ही ह्या गोष्टी आजवर कधीही ऐकल्या नसतील !

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

आपल्या शरीरामध्ये कोणतीही प्रक्रिया होण्यामागे रक्त हे महत्त्वाचे काम करते.

रक्त आपल्या शरीराचे संतुलन बनवून ठेवण्यासाठी खूप गरजेचे आहे.जर शरीरातील रक्त कमी झाले किंवा आपले शरीर रक्ताचा पुरवठा करण्यास असमर्थ ठरले, तर ते आपल्यासाठी खूप घातक ठरू शकते.

डायबिटीस हा आजार रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढल्यानेच होतो, आणि तो अत्यंत घातक असतो..ज्यांचा डायबिटीस जास्त असतो त्यांना इन्शुलिनची ईंजेक्शन थेट घ्यायला लागतात!

तसेच शरीरातल्या रक्तातल्या प्लेटलेट्स चे प्रमाण कमी झाल्याने देखील बरच आजार उद्भवू शकतात, त्यामुळे कितीही नाही म्हंटल तरी या गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष देणं भाग असत!

तंदुरुस्त असलेल्या माणसामध्ये एवढे रक्त असते की, तो दर तीन महिन्यामध्ये रक्तदान करू शकतो आणि शरीर पुन्हा तीन महिन्यामध्ये या रक्ताची उणीव भरून काढते.

रक्ताची गरज काय असते, हे जेव्हा आपल्याला त्याची गरज असते आणि वेळेवर मिळत नसते, तेव्हाच समजते.

तुम्ही नेहमी रक्ताच्या बाबतीत एवढेच ऐकले असेल की, रक्त हे लाल असते आणि शरीरात जवळपास ७० टक्के रक्त असते.

पण तुम्ही रक्ताच्या बाबतीत अजून काही जास्त कदाचित माहिती नसेल. आज आम्ही तुम्हाला रक्ताच्या बाबतीत काही गोष्टी सांगणार आहोत.

 

blood facts inmarathi
gomedii

 

१. पहिल्यांदा रक्ताचे हस्तांतरण दोन कुत्र्यांमध्ये १६६७ रोजी केले गेले होते.

२. जगातील पहिली रक्त पेढी १९३७ रोजी बनवण्यात आली होती.

३. आपल्या शरीरातील रक्ताचा ७० टक्के भाग लाल रक्तपेशींच्या आतमध्ये असलेल्या हिमोग्लोबिनमध्ये असतो. ४ टक्के भाग मांसपेशींच्या प्रोटीन मायोग्लोबीन मध्ये, २५ टक्के भाग यकृत, बोन मॅरो, प्लीहा, मूत्रपिंडामध्ये असते आणि उरलेले १ टक्का रक्त प्लाजमाच्या तरल अंश व कोशिकांच्या एंजाइम्समध्ये असते.

४. १ मिली रक्तामध्ये १०,००० पांढऱ्या रक्तपेशी आणि २,५०,००० प्लेटलेट्स असतात.

५. आपल्या नसांमध्ये ४०० किलोमीटर प्रतितास या वेगाने रक्ताभिसरण होते.

६. रक्त कोशिकांना संपूर्ण शरीरात फिरण्यास ३० सेकंद लागतात. या रक्त कोशिका २० सेकंदामध्ये १२००० किमी अंतर पार करू शकतात.

७. जर आपल्या शरीराने रक्ताला बाहेर पंप केले, तर हे रक्त ३० मीटरपर्यंत उडू शकते.

Blood.marathipizza1
biology-questions-and-answers.com

 

८. मनुष्याचे रक्त फक्त ४ प्रकारचे (O, A, B, AB) असते. पण गाईंमध्ये जवळपास ८००, कुत्र्यांमध्ये १३ आणि मांजरांमध्ये ११ प्रकारचे रक्त पाहण्यास मिळते.

९. नुकत्याच जन्मलेल्या बालकामध्ये फक्त १ कप (२५० एमएल) रक्त असते आणि तरुण माणसामध्ये जवळपास ५ लिटर रक्त असू शकते, म्हणजेच शरीराच्या एकूण वजनाच्या ७ टक्के रक्त असते.

१०. आतापर्यंत कृत्रिम रक्त बनवले गेले नाही आहे.

११. लाल रक्त पेशी ह्या ऑक्सिजनला घेऊन जात असतात आणि कार्बनडायऑक्साईड संपवतात.

१२. पांढऱ्या रक्त पेशी ह्या शरीराला बॅक्टेरीया आणि वायरस यांच्यापासून वाचवतात.

१३. प्लाजमा हे शरीरात प्रोटीन तयार करते आणि रक्ताला गोठण्यापासून वाचवते.

१४. प्लेटलेट्स हे रक्ताला गोठ्ण्यास मदत करते, यांच्यामुळेच जखम झाल्यानंतर काही वेळ रक्त आल्यानंतर रक्त येण्याचे बंद होते.

 

Blood.marathipizza2
multiplesclerosisnewstoday.com

 

१५. गर्भवती स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रिया रक्तदान करू शकत नाहीत.

१६. शारीरिकदृष्ट्या एकाच वेळी लघवी करणे आणि रक्तदान करणे शक्य नाही.

१७. जेम्स हॅरीसन नावाच्या व्यक्तीने गेल्या ६० वर्षांमध्ये १००० वेळा रक्तदान केले आहे आणि २० लाख लोकांचे प्राण त्याने वाचवले आहेत.

१८. प्रत्येक दिवशी जगात ४०००० युनिट रक्ताची गरज असते. ३ पैकी १ व्यक्तीला आपल्या जीवनात कधी न कधी रक्ताची आवश्यकता नक्कीच पडते.

 

blood donation inmarathi

 

१९. स्वीडनमध्ये जेव्हा कोणी रक्तदान करते, तेव्हा त्याला “Thank You” असा मॅसेज केला जातो आणि असाच मॅसेज जेव्हा त्याचे रक्त एखाद्याच्या कमी येते, तेव्हा देखील केला जातो.

२०. जपानमध्ये लोक रक्त गटावरूनच माणसाच्या व्यक्तित्वाचा अंदाज लावतात.

२१. ब्राझील देशात बोरोरो नावाचा आदिवासी समूह आहे, आश्चर्याची बाब म्हणजे या समूहातील सर्व लोकांचा एकच ” O “ रक्तगट आहे.

 

Blood.marathipizza3
blogspot.com

 

२२. जवळपास सर्वांमध्ये लाल रंगाचे रक्त पाहण्यास मिळते, पण कोळी आणि गोगलगायमध्ये हलक्या निळ्या रंगाचे रक्त पाहण्यास मिळते.

२३. आपल्या शरीरामध्ये जवळपास ०.२ मिलिग्रॅम एवढे सोने असते आणि याचे सर्वात जास्त प्रमाण रक्तात आढळून येते.

४०००० लोकांच्या रक्तामधून जवळपास ८ ग्रॅम रक्त काढले जाऊ शकते.

२४. फक्त मादी मच्छरच माणसांचे रक्त शोषून घेते, नर मच्छर हे शाकाहारी असतात आणि ते फक्त गोड द्रव पदार्थ पितात.

मादी मच्छर या आपल्या वजनाच्या तीनपट जास्त रक्त पिऊ शकतात.

२५. तुम्हाला वाटत असेल कि, मच्छर फक्त थोडच रक्त पितात, पण तुम्हाला सांगू इच्छितो की, १२ लाख मच्छर तुमचे पूर्ण रक्त पिऊ शकतात. मच्छर “ O ” रक्तगटाचे रक्त पिणे पसंत करतात.

अशी आहे ही रक्ताविषयी तुम्हाला माहित नसलेली रंजक माहिती

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “‘रक्ता’विषयी तुम्ही ह्या गोष्टी आजवर कधीही ऐकल्या नसतील !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?