' बच्चन साब, आज ही तुम्ही जिथे उभे असता, बॉलिवूडमधील लाईन तिथूनच सुरू होते! – InMarathi

बच्चन साब, आज ही तुम्ही जिथे उभे असता, बॉलिवूडमधील लाईन तिथूनच सुरू होते!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

लेखक : हर्षद बर्वे

===

एक सिनेमा आला होता, नाव डॉन. हेलन गाणे गाऊन त्याला अडकवते आणि त्याच्या पिस्तुलातल्या गोळ्या काढून घेते. यावेळी मुद्रा-अभिनयात या माणसाने जे काही करून दाखवले आहे ते गझब आहे.

खूनशी आणि कोणतीही दयामाया न दाखवणारा डॉन त्याने एकही डेसिबल आवाज न वाढवता रंगवला आहे. त्या हिरव्या रंगाच्या शर्टात त्याने अनेकींच्या हृदयाचे ठोके चुकवले आहेत.

 

amitabh-bacchan-marathipizza02
amitabhbachchan.ucoz.net

हे ही वाचा –

===

 

एक सिनेमा आला होता, नाव जंजीर. पोलीस स्टेशन मध्ये फाईल बघत बसलेला इन्स्पेक्टर आणि हजर झालेला शेर खान. खुर्चीला पडलेली लाथ आणि मघ येणारा डायलॉग.

प्राण साहेबांसारखा उत्तुंग मोठा अभिनेता आणि याची जेमतेम सुरवात.

परत एकदा कोणताही आक्रस्ताळेपणा न करता त्याने पंचला पंच मॅच केला आहे.

सिनेमा आला होता दिवार, खुर्चीवर आपले लांबच लांब पाय ठेवून बसलेला तो, तोंडात बिडी, खाकी पॅन्ट आणि तो जगप्रसिद्ध निळा शर्ट.

पीटरची गॅंग त्याच्याकडे दात ओठ खावून बघते आहे आणि म्हणतात न, झुंड में तो सुअर आते है, शेर अकेला आता है. इथे चार पाच लोकांना लोळवतांना तो कुठेही कमी वाटत नाही.

दिवार हा सिनेमा फक्त आणि फक्त त्याचा आहे. बाकीचे सगळे फक्त तोंडी लावायला.

 

amitabh-bacchan-marathipizza04
outlookindia.com

 

नमक हराम मध्ये राजेशला परत न्यायला आलेला तो. लांब लांब ढांगा टाकत तो वस्तीत येतो आणि संपूर्ण वस्तीला आव्हान देतो. राजेश खन्ना परतायला नकार देतो आणि मग जुगलबंदी.

प्रीमियर संपल्यावर राजेश खन्ना म्हणाला होता “और एक सुपरस्टार आ गया.”

 

amitabh-bacchan-marathipizza05
jansatta.com

 

हे काही सिन्स आहेत साल २००० च्या आधीचे पण बच्चन मला त्याच्या सेकंड इनिंगमध्ये पण तितकाच आवडतो. त्याला पैशाची गरज होती आणि बुजुर्गच्या भूमिकेसाठी बॉलीवूडला देखणा आणि सशक्त अभिनेत्याची.

किती दिवस ओम पुरी सारखे चेहरे बघणार? मृत्यूदाता, लाल बादशाह, अजूबा आणि असे अनेक तद्दन भिकारडे चित्रपट त्याचे करून झाले होते.

डोक्यावर एबीसीएलचे भलेमोठे कर्ज होते. वय ५८ झाले होते. या वयात आपण रिटायरमेंट प्लान्सवर जमा झालेला बोनस बघतो.

तो मात्र आपली संपूर्ण मायनस झालेली बॅलन्स शिट बदलायला निघाला होता. दिवाळ्याचा अर्ज मागवून हात वर करणे हा सगळ्यात सोपा मार्ग त्याने मागे टाकला होता.

सिनेमा आला मोहबत्ते आणि सिनेमाचा प्रीमियर बघून शाहरुखला वाटले असणार. सुपरस्टार वापस आ गया.

हे ही वाचा –

===

 

amitabh-bacchan-marathipizza06
i.imgur.com



 

पाठोपाठ आला अक्स. या सिनेमा त्याने खाऊन टाकला आहे.

 

amitabh-bacchan-marathipizza08
india.com

 

त्याला सिनेमात घेण्याचा मोह कारण जोहरला देखील आवरला नाही. त्याच्यासाठी स्क्रिप्टमध्ये तुफानी बदल करण्यात आले.

त्याला शोभेल अशी भूमिका लिहिण्यात आली आणि चित्रपट आला कभी खुशी कभी गम.

चित्रपट भिकारडा होताच पण बच्चन आणि काजोलने चार चांद लावले सिनेमाला.

 

amitabh-bacchan-marathipizza09
dooleyonline.typepad.com

 

मग पांढऱ्याशुभ्र केसात अनिल कपूर सोबत अरमान. अनिलला हा चित्रपट आणि त्यात अभिनय करणे किती जड गेले असेल याचा मला अंदाज आहे.

हे सगळे व्यवस्थीत सुरु असतांना बूम का केला असेल त्याने, कदाचित पैशासाठी. पैशाचे, कर्जाचे ओझे माणसाला काहीही करायला लावते.

 

amitabh-bacchan-marathipizza010
navbharattimes.indiatimes.com

 

पण मग आला बागबान आणि अमिताभ हेमाची तुफान केमेस्ट्री सगळ्यांना आवडून गेली. शेकडो वेळा हा सिनेमा टीव्हीवर लागला असेल. पण मी थांबतो बघत.

मला या चित्रपटाचा अंत आणि त्यावेळी त्याने केलेले भाषण फार आवडते. साला त्याने बोललेले शब्द किठेतरी मनात आरापार उतरतात…!

 

amitabh-bacchan-marathipizza11
etc.in



असाच अजून आवडता सिनेमा म्हणजे खाकी. खाकीने त्याला हवे तेवढे व्यावसायिक यश दिले नसेल. पण बच्चन नावाचे नाणे बॉलीवूड मध्ये परत एकदा खणखणीत वाजायला लागले होते.

 

amitabh-bacchan-marathipizz12
rediff.com

 

संजय लीला भंसालीचा ब्लॅक अभिनेता म्हणून त्याची कसोटी बघणारा. बच्चनने तुफानी काम केले आहे. अमोल पालेकरने काढलेला पहेली.

समांतर चित्रपट करायचा पण व्यावसायिक यश मिळवायचे हा किडा शाहरुखला चावला होता.

शाहरुखने या चित्रपटात अतिशय सुंदर काम केले आहे. बच्चनचा गदारिया मात्र आपली वेगळी उंची दाखवून जातो.

बंटी और बबली कदाचित त्याने अभिषेक साठी केला असावा. कोणाला आपला मुलगा पुढे यावा असे वाटत नाही. त्यात चूक पण काही नाही.

सिनेमा संपल्यावर मला उगाच वाटून गेले बाप बेटा एकत्र नको होते. अभिषेकच्या सुंदर कामावर बच्चन भारी पडलाय.

 

amitabh-bacchan-marathipizz13jpeg
dooleyonline.typepad.com

 

किती लिहिणार अजून, वाढदिवस आहे. थोडक्यात असावे. पिकू, पिंक, चीनी कम आणि असे अनेक.

त्याने काय नाही केले. सिनेमा केला, कविता वाचून दाखवल्या, रोज सकाळी उठून लोटापार्टीला बाहेर जाऊ नका असे सांगितले. पोलिओचे डोस द्यायला सांगितले. कचरा करू नका, त्याचे कंपोस्ट करा असे सांगितले.

गिरचे सिंह बघायचे त्याने आमंत्रण दिले तर ताडोबातल्या वाघाच्या पिल्लाचा जन्मोत्सव साजरा केला.

आजही त्याचा कौन बनेगा करोडपती सारखा शो आला की टीव्हीची संपूर्ण टीआरपी त्याने खेचलेली असते. मग त्यावेळी त्याच्या समोर कोणता चित्रपट किंवा कोणता क्रिकेटचा सामना दम मारू शकत नाही.

अनेकांनी हे सगळे त्याने पैशासाठी केले असे बेछूट आरोप केले. पैशासाठीच केले. कर्जात बुडलेला असतांना पळून तर गेला नाही न तो.

 

amitabh-bacchan-marathipizza13
spotboye.com

 

अमिताभच हे ऑनस्क्रीन यश अनेकांना भावते. मला पण. पण मला त्याचे इतर अनेक गुण आवडतात. अनेक दुर्धर आजार उरावर घेवून तो धावतोय हे मला आवडते.

बोफोर्स सारख्या प्रकरणात त्याने न केलेली शो बाजी आवडते आहे. मुख्यमंत्री जायचे आहेत म्हणून त्यांच्या जाण्याची वाट बघत उभा असलेला बच्चन आवडतो.

आपल्या जुन्या सहकारयांना त्याने केलेली मदत आवडते. स्त्री मग कोणत्याही वयाची असो, तिला मान म्हणून उठून उभा राहणारा बच्चन आवडतो.

स्वतः भीष्म पितामह असतांना अंगात असलेला नम्रपणा आवडतो.

 

हे ही वाचा –

===

 

बच्चन साहेब, आपणास अनेक अनेक शुभेच्छा…!

आप को अभी और बहोत काम करना है.

क्यो कि आज भी आप जहां खडे हो जाते है, बॉलीवूड मे लाईन वही से शुरू होती है !!!

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?