जगातील सर्वात श्रीमंत पद्मनाभ मंदिराचा सातवा दरवाजा – एक नं ‘उघडलेलं’ रहस्य!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===

केरळचं पद्मनाभ मंदिर, सरकारने तिथल्या तळघरातील दरवाजे उघडल्यापासून सर्वांच्याच परिचयाचं झाल आहे. आपल्या हिंदू देवळांत असलेल्या ऐश्वर्य संपत्तीने शतको न शतकं लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

कित्येक परकीय शासकांनी फक्त ह्या ऐश्वर्यावर कुदृष्टी टाकण्याच्याच हेतूने आक्रमकणं केली आहेत. अश्या मंदिर आणि देवस्थानांपैकीच एक म्हणजे केरळचं पद्मनाभ मंदिर होय.

 

padmnabh marathipizza 01

स्त्रोत

सौंदर्याने आणि अध्यात्मिक अनुभूतीने परिपूर्ण असं हे मंदिर म्हणजे एक मोठं रहस्यच आहे…!

हे मंदिर विष्णू देवाला समर्पित असून मंदिराच्या गर्भागृहात शेषनागवार शयन मुद्रेत भगवान विष्णुंची महाकाय मूर्ती विराजमान आहे.

 

padmnabh marathipizza 07

स्त्रोत

मंदिरातील संपत्ती इतकी अगणित आहे की जगातील महत्वाच्या धर्मस्थळांची कमाई यासमोर पालापाचोळ्याची वाटावी. म्हणूनच या मंदिराला जगातील सर्वात गडगंज श्रीमंत मंदिर म्हणून ओळखलं जातं.

सध्या मंदिरात १,३२,००० करोड किंमतीची संपत्ती आहे. जी स्वित्झर्लंड देशाच्या एकूण संपत्ती एवढी आहे!

परंतु पद्मनाभ मंदिरासाठी ही संपत्ती हेच एकमेव वैशिष्ट्य नव्हे.

 

padmnabh marathipizza 02

स्त्रोत

मंदिराचा इतिहास:

९ व्या शतकातील ग्रंथांमध्ये या मंदिराचा स्पष्ट उल्लेख आढळतो. १८ व्या शतकात त्रावणकोर राजा ने पद्मनाभ मंदिराचा जीर्णोद्धार केला.

१७५० मध्ये महाराज मार्तंड वर्मा यांनी स्वत:ला ‘पद्मनाभ दास’ म्हणजेच ‘प्रभूचा सेवक’ अशी उपाधी दिली. त्यानंतर त्रावणकोर घराण्याने स्वत:ला भगवान पद्मनाभाच्या चरणी अर्पण केलं आणि सर्व संपत्ती मंदिराला दान केली.

 

padmnabh marathipizza 03

स्त्रोत

स्वतंत्र भारतामध्ये सरकारने या मंदिराचा ताबा नं घेता, त्रावणकोर घराण्याच्या वंशजांना हे मंदिर देऊ केलं. सध्या त्यांच्या देखरेखीखाली एक खाजगी ट्रस्ट या मंदिराचे कामकाज पाहत आहे.

 

padmnabh marathipizza 04

 

स्त्रोत

पद्मनाभ मंदिराच्या संपत्तीबद्दल इतक्या अफवा उठत होत्या की अखेर या मंदिराचे सहा दरवाजे खोलण्याला सुप्रीम कोर्टाने मान्यता दिली.

ज्यामध्ये १,३२,००० करोड किंमतीचे सोने, हिरे आणि इतर मौल्यवान वस्तू आढळून आल्या.

परंतु अजूनही सातवा दरवाजा उघडण्यात आलेला नाही. कारण हा दरवाजा उघडण्यामागे अनेक आख्यायिका आहेत.

हा दरवाजा उघडल्यास प्रकोप होऊ शकतो अशी शंका देखील स्थानिकांकडून उपस्थित केली गेली आहे. या दरवाज्यावर कोणतीही कडी किंवा टाळे नाही.

दरवाज्यावर दोन सापांच्या प्रतिमा आहेत. हे साप या दरवाज्याचे संरक्षण करतात असे मानले जाते. दरवाजा उघडण्यासाठी कोणती चावीही उपलब्ध नाही. हा दरवाजा केवळ मंत्रोच्चारानेच उघडला जाऊ शकतो असं म्हणतात…!

 

padmnabh marathipizza 05

स्त्रोत

दरवाजा उघडण्याचा मंत्रोच्चार म्हणजेच ‘गरुड मंत्र’ होय.

एखादा सिद्ध पुरुष, योगी, तपस्वीच ‘गरुड मंत्राचा’ अचूक आणि स्पष्ट उच्चार करून हा दरवाजा उघडू शकतो, तसेच जर उच्चारणात चूक झाली तर त्याचा मृत्यू होणे अटळ आहे अशी दृढ श्रद्धा भाविकांत आहे.

 

padmnabh marathipizza 06

 

स्त्रोत

या सर्व गोष्टींमुळे पद्मनाभ मंदिर सध्या सर्वांच्याच उत्सुकतेचा विषय बनले आहे.

उपरोक्त गोष्टींमध्ये किती तथ्य आहे ते माहित नाही…
पण येणाऱ्या काळात सातव्या दरवाज्याचे हे रहस्य लवकरच जगासमोर येईल ही आशा आहे…!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Vishal Dalvi

Anything, Everything, Whatever I like, I don't wait..I Just write......

vishal has 53 posts and counting.See all posts by vishal

3 thoughts on “जगातील सर्वात श्रीमंत पद्मनाभ मंदिराचा सातवा दरवाजा – एक नं ‘उघडलेलं’ रहस्य!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?