'याच फिटनेस टेस्टमुळे युवराज आणि रैना झाले होते टीममधून आउट...!

याच फिटनेस टेस्टमुळे युवराज आणि रैना झाले होते टीममधून आउट…!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

क्रिकेट आपल्या देशात सर्वात जास्त खेळल्या जाणारा आणि बघितल्या जाणारा खेळ आहे. आपल्या देशात क्रिकेट लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वचं खेळताना दिसतात. भारतात क्रिकेटचे चाहते इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहेत. हा खेळ पाहताना प्रत्येकाच्याच भावना उफाळून येतात. पण आता यामध्ये खूपच चढाओढ निर्माण झालेली आहे. भारताच्या क्रिकेट संघामध्ये कोण खेळणार आणि कोण खेळणार नाही, हे ठरवणे खूपच कठीण होऊन बसले आहे. सर्वच खेळाडू एकापेक्षा एक सरस खेळ दाखवत आहेत. खरे तर हे भारतीय क्रिकेटसाठी खूप चांगले आहे, कारण अशी चढाओढ निर्माण झाल्यामुळे सर्वोत्तम खेळाडू निवडणे शक्य झाले आहे. भारतीय क्रिकेट संघामध्ये स्थान मिळवणे कठीण झाले आहे, त्यामुळे भारतीय क्रिकेट नियमक मंडळ (बीसीसीआय) यांनी आता भारताकडून खेळण्यासाठी फिटनेस ही मुलभूत आवश्यकता असल्याचे सांगितले आहे.

yo yo test.marathipizza
nyoooz.com

खेळाडूचा असलेला फॉर्म आणि फॉर्मेटच्या आधारावर क्रिकेटपटूंना धैर्याची होणारी चाचणी द्यावी लागणार आहे, तिला यो-यो चाचणी देखील म्हणतात. यामध्ये दुखापत न झालेले खेळाडूंना देखील यामधून वाचणार नाहीत, त्यांना देखील ही चाचणी द्यावी लागणार आहे. इंडियन एक्सप्रेस यांच्या अहवालानुसार, ही चाचणीची बातमी पुढे आली होती, जेव्हा युवराज सिंग आणि सुरेश रैना हे सहनशक्तीच्या चाचणीमध्ये नापास झाल्यानंतर त्यांना संघामध्ये घेण्यात आले नव्हते.

बीसीसीआय सीइओ राहुल जोहरी यांनी याबद्दल सांगितले की,

कर्णधार, कोच आणि मुख्य निवडक हे निवड समितीच्या इतर सदस्यांसह म्हणजेच ट्रेनर आणि फ़िजिओ यांच्याशी सल्ला मसलत करून काही पॅरामिटर्स आखण्यात आले आहेत. फिटनेस पॅरामिटर्समार्फत टीम व्यवस्थापनाकडून ऍथलेटिक्ससची अपरस्परविरोधी निवड केली जाते.

yo yo test.marathipizza1
ytimg.com

जोहरीने असेही सांगितले की, श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत आणि ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या घरगुती मालिकेत खेळलेल्या खेळाडूंनी संघ व्यवस्थापनेच्या गरजेनुसार यो-यो चाचणी पास केली होती.

जागतिक पातळीवर ओळखले जाणारे कार्डिओ ड्रिल प्रत्यक्षात काय आहे, यावर एक नजर टाकूया.

यो-यो चाचणी जी बीप चाचणीचा एक भिन्न प्रकार आहे. ही चाचणी डॅनिश सॉकर फिजिओलॉजिस्ट जेन्स बँग्बो यांनी विकसित केली होते. यामध्ये खेळाडूंच्या एरोबिक एनड्युरन्स फिटनेसची चाचणी घेतली जाते. कार्डिओ ड्रिलमध्ये दोन स्तर असतात, त्यातील प्रथम स्तर नवोदितांसाठी असतो, तर दुसरा स्तर हा प्रगत क्रिडापटूंसाठी असतो.

yo yo test.marathipizza2
allindiaroundup.com

या चाचणीच्या दुसऱ्या स्तरामध्ये खेळाडूंना आपले फिटनेस दाखवावे लागते, यामध्ये २० मीटरच्या अंतरावर दोन त्रिकोणी कोन ठेवण्यात येतात आणि खेळाडूला या कोनांदरम्यान बीप बंद होईपर्यंत धावायचे असते. बीपची गती एका मिनिटानंतर वाढवली जाते. जर खेळाडू या बीपच्या वेळेत पोहोचत नसतील, तर त्यांच्यासाठी अजून दोन बीप वाढवल्या जातात. पण या दोन बीपमध्ये खेळाडूने लाईन क्रॉस करणे अपेक्षित आहे.

बीपची गती पकडण्यास जर खेळाडू अपयशी ठरत असेल, तर चाचणी थांबवली जाते. बीसीसीआयने १६.१ हा स्कोर ही चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी ठेवला आहे, तो गाठणे अनिवार्य आहे. या संपूर्ण प्रक्रियेचे सॉफ्टवेअरद्वारे परीक्षण केले जाते. ही चाचणीने खेळाडूंचा अॅथलीटपणाचा किमान दर्जा बघितला जातो.

yo yo test.marathipizza3
crickettrolls.com/

याचे बेंचमार्क हे प्रत्येक खेळाचे वेगवेगळे असतात. उदा. यो-यो चाचणीमध्ये हॉकी आणि फुटबॉल या खेळांचे बेंचमार्क हे क्रिकेटच्या बेंचमार्कपेक्षा जास्त आहेत, कारण त्यांना आवश्यक असणारी सहनशक्ती ही क्रिकेटपेक्षा भिन्न आहे.

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017 InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?