पितृप्रेमाची अनोखी कहाणी : २८ हजार किमी भ्रमंती करून त्याने मुलाला दाखवले ४१ देश!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

 

आपल्या मुलांची स्वप्ने पूर्ण करणे हे प्रत्येक माता-पित्याचे कर्तव्य असते. त्यातच प्रमुख भूमिका असते ती पित्याची. आपण आजवर अनेक अश्या गोष्टी ऐकल्या असतील ज्यात वडिलांनी आपल्या मुलांच्या सुखासाठी केलेला पराक्रम म्हणा किंवा एखादी सुखद गोष्ट म्हणा कथन केली असेल. आज आम्ही तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहोत, ज्यात एका पित्याने आपल्या मुलाच्या सुखासाठी फार मोठे पाउल उचलले आणि त्यात त्याला त्याच्या पत्नीचीही साथ मिळाली हे विशेष!

mihai barbu-marathipizza07
metropotam.ro

 

ही कहाणी आहे रोमानियाचे फोटो जर्नलिस्ट मिहाई बर्बू आणि त्यांच्या कुटुंबाची. मिहाई यांना व्लादिमीर नावाचा ४ वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या मुलाच्या मनातही बालसुलभ प्रश्न निर्माण व्हायचे.

जसे की,

पप्पा, तुम्ही नेहमी घराबाहेर का राहता ? माझ्यासोबत का खेळत नाही ? कुठेतरी बाहेर फिरायला का घेऊन जात नाही? हे जग नेमके केवढे आहे ?

अखेर मिहाईने लाडक्या मुलाच्या तक्रारी दूर करण्याचे ठरवले. त्यासाठी आपल्या दुचाकीला नवे रुपडे देऊन त्याला साइड कार लावून घेतली आणि पत्नी आेआनासोबत घराबाहेर पडले.

mihai barbu-marathipizza01
boredpanda.com

अर्थातच लाडक्या व्लादिमीरला जगाची सफर घडवण्यासाठी. मिहाईंच्या कुटुंबाने २०१६ च्या सप्टेंबरमध्ये ही भ्रमंती सुरू केली होती.

mihai barbu-marathipizza02
i.dailymail.co.uk

या पुढील चार महिन्यांत मिहाई युरोप, आफ्रिकेसह ४१ देशांत भटकले. २८ हजार किलोमीटरचा प्रवास केला. त्यांना दर महिन्याला सरासरी १.५ लाख रुपये खर्च आला. त्यांनी ट्रॅव्हल डायरी लिहून फोटो फेसबुकवर शेअर केले होते. उर्वरित अनुभव पुस्तकातून मांडण्याचा त्यांच्या मनसुबा आहे.

mihai barbu-marathipizza03
i.dailymail.co.uk

मिहाई बर्बू म्हणतात,

“मुलांचा आनंद हेच सर्वकाही आहे. त्याचा अनुभव सर्वांनी घेतला पाहिजे, हाच माझा जग भ्रमंतीमागील हेतू आहे. डोळे उघडून नीट बघा. त्यांच्यासाठी काय-काय करता येईल. माझ्यासारखे बाइकवर जाण्याची गरज नाही. भ्रमंती करणारा मी एकमेव असेन असे नाही. भ्रमंतीशिवाय इतर गोष्टीही मुलांसाठी करता येऊ शकतील.”

mihai barbu-marathipizza04
i.dailymail.co.uk

ते पुढे म्हणतात,

“व्लादिमीर कधीही दुचाकीवर बसला नव्हता. गाडीला लावलेली साइडकार त्याला आवडेल की नाही, याचा अंदाज नव्हता. त्याला हे आवडले नसते तर काय केले असते? अशा जाणिवांपासून मी दूर होतो. परंतु निघण्याचा निर्णय घेतला तेव्हा दोन आठवड्यांत परतेन, असे मित्रांना सांगितले होते. थोडा संकोच होता. त्याच स्थितीत डाल्मेशियन किनारपट्टीवरून प्रवासाला आरंभ केला. पहिल्यांदा नॉर्वे, आयर्लंड व नंतर मोरक्कोला दाखल झालो. त्यानंतर इस्तंबूल, तुर्की आणि रोमानियात दाखल झालाे.”

mihai barbu-marathipizza05
intoday.in

“परंतु यादरम्यान व्लादिमीर मनातील सर्व शंका दूर करत गेला. तो खूप आनंदी होता. त्यांचा आनंद बघून मी आणि आेआनाला स्वत:चा थकवाही जाणवत नव्हता. त्याला भटकंतीपेक्षा आपले मम्मी-पप्पासोबत असल्याचा आनंद अधिक वाटत होता. खूप मुलांना आनंद मिळत नाही. त्या गोष्टीचे वाईट वाटते. मुलांना आई-वडिलांनी जास्तीत जास्त वेळ द्यावा, असे वाटते. कारण तुम्हीच त्यांचे जग आहात.”

mihai barbu-marathipizza06
i.pinimg.com

अश्या प्रकारे मुलाचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ह्या बापाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे…!

 

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?