'तुम्हाला माहित नसलेल्या भारतीय क्रिकेटर्सच्या 'पत्नी'!

तुम्हाला माहित नसलेल्या भारतीय क्रिकेटर्सच्या ‘पत्नी’!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

क्रिकेट आपल्या देशात सर्वात जास्त खेळला आणि पहिल्या जाणारा खेळ आहे. भारतात क्रिकेटचे चाहते इतर कोणत्याही देशापेक्षा जास्त आहेत. हा खेळ पाहताना प्रत्येकाच्याचं भावना उफाळून येतात. धोनी, रैना, रहाणे, भुवनेश्वर यांसारखे क्रिकेटर आपल्याला आवडत असतात. धोनीने तर आपल्या कारकीर्दीमध्ये आणि कॅप्टनशीपमध्ये भारतीय क्रिकेटला एका उंच शिखरावर नेऊन ठेवले होते आणि आजही तो आपल्या भारतीय क्रिकेटसाठी मोलाचे कार्य करत आहे.

प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते, असे म्हटले जाते. हो ते खरे देखील आहे. आता तुम्हाला वाटेल की, मधेच हा विषय कुठून आला. पण आज आम्ही तुम्हाला याचबद्दल सांगणार आहोत. आज आम्ही तुम्हाला या क्रिकेट जगतातील या सुपरस्टार्सच्या बायकांविषयी सांगणार आहोत, ज्या ग्लॅमरस जगतातील नाहीत.

१. महेंद्रसिंग धोनी

Cricketer wife.marathipizza
ytimg.com

धोनी आणि साक्षीच्या प्रेमकथेबद्दल आपण सर्वच जाणतो. २०१५ आलेल्या धोनीच्या बायोपिकमध्ये याची माहिती आपल्याला मिळाली. या दोघांना एक गोंडस मुलगी आहे, तिचे नाव झिवा आहे.

२. सुरेश रैना

Cricketer wife.marathipizza1
yimg.com

सुरेश रैना ह्याने त्याची पत्नी प्रियांका हिच्याबरोबर ३ एप्रिल २०१५ ला लग्न केले. प्रियांका ही बँकिंग सेक्टरमध्ये काम करत आहे, तसेच, विविध फाउंडेशन आणि एनजीओला ती सहयोग करते. त्याचबरोबर तिने ग्रासिया रैना फाउंडेशनची (GRF) स्थापना केली. हे नाव रैना आणि प्रियांका ह्यांना मुलगी ग्रासिया झाल्यानंतर ठेवण्यात आले.

३. गौतम गंभीर

Cricketer wife.marathipizza2
thebridalbox.com

गौतम गंभीरने त्याच्या लहानपणीची मैत्रीण नताशा हिच्याबरोबर २०११ मध्ये लग्न केले. टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टनुसार प्रियांकाने एका मुलाखतीत सांगितले की, “मी जीडी गोएंकामध्ये शिकले. त्यानंतर बीबीए आणि जीमोलॉजीचा कोर्स केला. त्यानंतर अॅडव्हरटायझिंग आणि पीआरचा कोर्स पूर्ण केला.”

४. अजिंक्य रहाणे

Cricketer wife.marathipizza3
youthgiri.com

अजिंक्यच्या पत्नीचे नाव राधिका आहे. ती त्याच्या बालपणीची मैत्रीण आहे. या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले आणि त्यांनी शेवटी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

५. मुरली विजय

Cricketer wife.marathipizza4
thebridalbox.com

निकिता वंजारा ही भारतीय क्रिकेटपटू मुरली विजयची पत्नी आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, तिने याआधी भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिकशी लग्न केले होते. या दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले आणि त्यांचे लग्न चेन्नईमधील एका खाजगी हॉलमध्ये झाले.

६. मनोज तिवारी

Cricketer wife.marathipizza5
netdna-ssl.com

टाईम्स ऑफ इंडियानुसार, मनोज आणि त्याची पत्नी सुष्मिता हे एकत्र वेळ घालवताना खूप वेळा बघितले गेले आहेत. ते दोघे एका कॉमन मित्राकडून भेटले आणि नंतर त्यांनी लग्न केले.

७. चेतेश्वर पुजारा

Cricketer wife.marathipizza6
jagran.com

चेतेश्वर पुजाराच्या पत्नीचे नाव पूजा आहे. या दोघांचे लग्न २०१३ मध्ये झाले. चेतेश्वरची पत्नी पूजा ही व्यवसायिक पार्श्वभूमीतून आहे. पूजाचे वडील हे गुजरातमधील टेक्सटाईल मर्चंट आहेत.

८. रविचंद्रन अश्विन

Cricketer wife.marathipizza7
india.com

अश्विनची पत्नी प्रीती ही चेन्नईमधील आहे. या दोघांचे लग्न २०११ मध्ये झाले. या दोघांना सध्या दोन मुली आहेत. त्यांची नावे अध्या आणि अखिरा ही आहेत.

९. उमेश यादव

Cricketer wife.marathipizza8
dainikbhaskar.com

उमेश यादवच्या पत्नीचे नाव तनया आहे. तनयाने फॅशन डिझायनिंगमध्ये पदवी मिळवली आहे. उमेश आणि तनयाचे लग्न २९ मे २०१३ ला झाले.

१०. आशिष नेहरा

Cricketer wife.marathipizza9
wp.com

आशिष नेहराचे लग्न त्याची प्रेयसी असलेल्या रुश्मा हिच्याशी झाले. रुश्मा ही लंडनमधून आलेली आहे. एका मुलाखतीमध्ये आशिषने सांगितले की, रुश्मा त्याला प्रत्येकवेळी सपोर्ट करते आणि ती नेहमी त्याला सकारात्मक राहण्याचा सल्ला देते.

अश्या या क्रिकेटर्सच्या पत्नींनी आपल्या या पतींना नेहमी आपल्या जीवनात यश मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?