'जगाच्या विस्मरणात गेलेल्या हडप्पा-मोहेंजोदडो पेक्षाही जुन्या संस्कृती!

जगाच्या विस्मरणात गेलेल्या हडप्पा-मोहेंजोदडो पेक्षाही जुन्या संस्कृती!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आज आपण जे जग पाहत आहोत त्या जगाची निर्मीती अनेक उलथा पालथीनंतर आणि अनेक चढ उतारांनंतर झाली आहे. प्राचीन विश्वाचा इतिहास चाळला की, आपल्याला मिस्र संस्कृती, ग्रीक संस्कृती, माया संस्कृती यांच्या विषयी सहजपणे माहिती मिळते. मात्र या शिवाय ही अशा अनेक सभ्यता वा संस्कृती आहेत ज्यांच्या विषयी आपल्याला फारशी माहिती नाही. आज आम्ही आपल्याला अशाच काही सभ्यता वा संस्कृतीं विषयी सांगणार आहोत.

द सँजिंगडुई:

culture-marathipizza01
wikimedia.org

ही कांस्ययुगातील एक सभ्यता, जी चीनच्या सिचुआन प्रांतात विकसित झाली होती. हीची माहिती १९२९ मध्ये एका शेतकऱ्याला झाली. येथे कांस्ययुगातील प्रतिमादेखील मिळाल्या आहेत. ही सभ्यता २८०० ते ३००० पर्यंत होती.

 

द अॅट्रस्कान्स:

culture-marathipizza03
sjsu.edu

या संस्कृतीचा विकास ई.स.स.पूर्व ७०० ते ५०० ई.स.पूर्वदरम्यान झाला. या संस्कृतीनंतर रोमन साम्राज्य उदयाला यायला सुरुवात झाली. येथील एक विशेष लिपीही होती. एवढेच नाही तर, येथून २५,००० हून अधिक मौल्यवान ऐतिहासिक गोष्टी मिळवल्या आहेत.

 

सिल्ला (कोरिया)

culture-marathipizza04
antiquealive.com

कोरियातील तीन मोठ्या साम्राज्यांपैकी एक असलेले ‘सिल्ला’ साम्राज्य एकेकाळी प्रचंड नावारूपाला आले होते. सिल्लाची निर्मीती इ.स.वि.स.न.पूर्व ५७ मध्ये झाल्याचे मानले जाते. तेव्हा येथील लोकांचे कबिले असायचे, मात्र नंतरच्या काळात ते संपूर्ण कोरियन्स प्रायद्वीपावर साधारणपणे दक्षिणेकडे पसरले. येथे ‘किम’ या राजवंशाचे राज्य होते. हे साम्राज्य साधारणपणे इ.सन ९३५ पर्यंत आबाधित होते. याचाच अर्थ असा की, हे साम्राज्य ९९२ वर्षांपर्यंत आबाधित होते.

 

द इंडस(भारत):

culture-marathipizza05
crystalinks.com

ही जगातील सर्वात विकसित असलेल्या शहरी सभ्यतेपैकी एक आहे. या सभ्यतेचा विकास सिंधु आणि गंगा नदिच्या खोऱ्यात झाला. ही सभ्यता वा संस्कृती इ.स.वि.स.न. पूर्व ३३०० ते १६०० पर्यंत अबाधित होती.

 

द नोक:

culture-marathipizza06
i.pinimg.com

ही सभ्यता साधारणपणे १००० ते इ.स.वि.स.न. ३०० पर्यंत आबाधित होती. या संस्कृतीचा विकास सध्या असलेल्या नायजेरियामध्ये झाला होता. मात्र या संस्कृतीची माहिती १९४३ मध्ये मिळाली. एवढेच नाही तर येथूनच टेरा कोटाच्या मूर्ती मिळाल्या आहेत.

अश्या आहेत ह्या काही महत्त्वाच्या संस्कृती ज्यांनी जगाच्या इतिहासाला वेगळे वळण प्राप्त करून दिले आहे.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?