' नोकरी गेली, म्हणून लंडनमध्ये 'इंडियन बर्गर' विकून हा पट्ठ्या कोट्याधीश झाला

नोकरी गेली, म्हणून लंडनमध्ये ‘इंडियन बर्गर’ विकून हा पट्ठ्या कोट्याधीश झाला

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपल्या भारतामध्ये आपल्याला विविध पदार्थांची चव चाखायला मिळते. प्रत्येक ठिकाणी तेथील विविध प्रसिद्ध पदार्थ खाण्यास मिळतात. दक्षिणेत इडली, डोसा यांसारखे पदार्थ, तर उत्तरेला दाल- मखनी, पराठा यांसारखे पदार्थ. पण स्वस्तात मस्त म्हणजे आपल्या मुंबईचा वडापाव!

आज मुंबईचा वडापाव कुणाला माहीत नाही? मुंबईच्या वडापावने सगळ्यांनाच भुरळ घातली आहे. भारतातलेच नव्हे, तर जगभरामधून मुंबईला येणारे पर्यटक या मुंबईच्या वडापावची चव चाखल्याशिवाय परत जात नाहीत.

 

samosa inmarathi

 

कित्येक लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला तो या वडापावनेच! आज भर पावसाळ्यात गरम गरम वडा-पाव किंवा कांदा भाजीचा आस्वाद घ्यावा तो सुद्धा मुंबईच्या चौपाटीवर बसून!

या वडापावच्या जिवावर बऱ्याच मोठ्या फूड चेन चालल्या, जंबो वडा पाव त्यापैकीच एक, त्यानंतर ठाण्याचा कुंज-विहरचा वडापाव तर प्रचंड लोकप्रिय आहे!

 

kunjvihar inmarathi

 

आज मुंबईत कितीही मॅकडोनाल्ड येउदेत कितीही पिझ्झाची हॉटेल्स येऊ दे, मुंबईतल्या वडापाव चं वेड काही केल्या कमी होणार नाही! कारण ते म्हणतात नया मुंबईच्या नसानसांत वडापाव भिनला आहे!

आज आम्ही तुम्हाला याच वडापावची किमया सांगणार आहोत.

आपल्यामधीलच एका भारतीयाने हाच वडापाव परदेशात एवढा प्रसिद्ध केला कि, या वडापावच्या जीवावर तो आज कोट्यावधी रुपये कमवत आहे. विश्वास बसत नाही ना, पण ते सत्य आहे.

चला तर मग जाणून घेऊया कि, त्याने हे कसे साध्य केले…

 

sujoy_inmarathi

हे ही वाचा – डिलीव्हरी बॉयने सुरु केला अफलातून व्यवसाय कमावतोय महिना ८० हजार!

२०१० मध्ये आलेल्या मंदीमुळे कितीतरी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. लंडनमधील सुजय सोहनी हा देखील त्यातीलच एक होता. सुजय सोहनी याने मंदीमुळे पंचतारांकित हॉटेलमधील फूड आणि ब्रेवरेज मॅनेजरची नोकरी गमावली. सुजयची परिस्थिती एवढी खराब झाली कि, त्याला स्वत:चा उदरनिर्वाह करणे देखील कठीण होऊ लागले.

अश्यावेळी सुजयने आपल्या कॉलेजमधील मित्र सुबोध जोशीकडून मदत मागण्याचे ठरवले. त्रासलेल्या सुजयने मित्राला सांगितले कि, त्याच्याकडे वडापाव खाण्यासाठी देखील पैसे नाही आहेत. पण कोणाला माहित होते कि, वैतागलेल्या परिस्थितीमध्ये करण्यात आलेले हे भाष्य त्या दोघांचे जीवन पालटून टाकेल.

 

sujay sohni inmarathi

 

काही दिवसांनंतर सुजयच्या डोक्यामध्ये एक जबरदस्त कल्पना आली. त्याने विचार केला कि, लंडनच्या रस्त्यांवर वडापाव विकला तर…?!!!

कल्पना तर आली होती, पण त्याची अंमलबजावणी करणे सोप्पे नव्हते. दोन्ही मित्रांनी आपल्या ह्या कल्पनेवर विचारविनिमय केला आणि लंडन शहरामध्ये अशी जागा शोधली, जिथे ते आपला स्टॉल लावू शकतील.

सुजयने सांगितले कि,

हौन्स्लो ही एक चांगली जागा आहे, कारण  तेथे दक्षिण – उत्तर आशियाचे खूप लोक येत असत. आम्ही तिथेच स्टॉल शोधू लागलो. तिथे आम्हाला एक पोलिश कॅफे दिसला, ज्याचा बिजनेस चांगला चालला नव्हता.

आम्ही त्या कॅफेच्या मालकाशी बोललो आणि त्यांनी आम्हाला दोन टेबल लावण्याची परवानगी दिली. आम्ही त्याला ४०० पौंड (Pound) म्हणजे जवळपास ३५००० रुपये महिन्याला देण्याचे वचन दिले.

 

people inmarathi

हे ही वाचा – रग्गड पगाराची नोकरी सोडून त्यांनी उभा केला फूडट्रक, आज कमावतायत १.५ कोटी!

 

१५ ऑगस्ट २०१० रोजी सुजय आणि सुबोधने लंडनमधील रहिवाश्यांसाठी आपला स्टॉल खुला केला. सुजयने सांगितले कि,

आम्ही सर्वात आधी १ पौंड म्हणजे जवळपास ८० रुपयांना वडापाव आणि १.५० पौंड म्हणजे जवळपास १३१ रुपयांना दाबेली विकू लागलो. मित्रांनी आणि नातेवाईकांनी यासाठी प्रोत्साहन दिले. पण पहिल्या महिन्यामध्ये नफा जवळजवळ शून्य होता.

आम्हाला आमच्या उत्पादनाला लोकप्रिय बनवायचे होते आणि त्यासाठी जाहिरात गरजेची होती.

त्यानंतर सुजय आणि सुबोध हे दोन्ही मित्र हौन्स्लोमधील गर्दीच्या रस्त्यांवर लोकांना मोफत वडापाव वाटू वागले. सुजयने आपल्या बिजनेस स्ट्रॅटजीविषयी सांगताना सांगितले कि,

आम्ही आमच्या वडापावला बर्गर सांगून लोकांना खाऊ घालू लागलो. जवळपासच्या रेस्टॉरंटमध्ये बर्गर ५ पौंड म्हणजे जवळपास ४४० रुपयांना मिळत असे. जो बर्गर लोक खात होते, त्याचेच भारतीय वर्जन आम्ही लोकांना अर्ध्या किंमतीमध्ये उपलब्ध करून दिले.

 

vadapav in london.marathipizza3

 

अश्याप्रकारे सुजय आणि सुबोधने जुनाच पदार्थ नव्याने लंडनच्या लोकांसमोर आणून आपले नशीब बदलले. आज त्यांचा हा व्यवसाय वर्षाला ४.४ कोटी रुपये कमवत आहे. जिथे सुजयला वडापाव घेण्यासाठी देखील पैसे नव्हते, त्याच वडापावने आज त्याला कोट्याधीश बनवले आहे.

फक्त वडापाव विकून सुद्धा इतकं यशस्वी होता येतं ते या तरुणाकडे बघून जाणवतं,  गरज असते ती जिद्दीची आणि मेहनत करायची! 

त्यामुळे कधीही परिस्थितीला न जुमानता नेहमी पुढे जाणे गरजेचे आहे. या घटनेतून नक्कीच आताच्या तरुण पिढीने प्रेरणा घेतली पाहिजे.

===

हे ही वाचा – वय वर्ष ३४, रोज कोटींची उलाढाल….श्रीमंत तरुणांची अविश्वसनीय यशोगाथा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?