'"एक स्त्री कधी खोटे बोलूच शकत नाही का?" : हृतिक रोशनचा थेट सवाल

“एक स्त्री कधी खोटे बोलूच शकत नाही का?” : हृतिक रोशनचा थेट सवाल

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना राणावत आणि अभिनेता ह्रितिक रोषण यांच्यातील वाद उफाळून येतोय. कंगना हिने ह्रितिक वर अनेक गंभीर आरोप केलेत, तिने मिडियातर्फे अनेक वेळा ह्रितिकवर टिका केली. त्याने मला धोका दिला, आमचा जानेवारी २०१४ ला पॅरीस येथे साखरपुडा झाल्याचही तिने मिडीयाला सांगितले. एखादी स्त्री जेव्हा असे आरोप करते तेव्हा सहाजिकच आपण सर्वच तिच्याकडे सहानुभूतीने बघतो. पुरुषालाचं दोषी मानतो. शिवाय यावर ह्रितिक रोशनकडून कुठलेही उत्तर न मिळाल्याने ह्रितिकचं दोषी असेल असा सर्वांचा समज झाला. पण आता या प्रकरणावर ह्रितिकने स्वतःचा पक्ष ठेवत या प्रकरणाच्या सर्व बाजू उघड केल्या आहेत. त्यासंबंधी त्याने फेसबुकवर एक पोस्ट टाकली आहे…!

 

hrithik roshan kangana ranawat 01 marathipizza

 

ह्रितिकच्या पोस्टचं मराठीत भाषांतर पुढीलप्रमाणे…

===

मी सर्जनशीलता, क्रियाशीलता आणि विधायक कार्याच्या मार्गावर असणे पसंत करतो. ज्या गोष्टी या अलाइनमेंटमध्ये येत नाहीत एकतर मी त्याकडे दुर्लक्ष करतो, त्यापासून दूर होतो आणि त्याला एक व्यत्यय म्हणून बघतो.

मला वाटते की दुर्लक्ष करणे, रिअॅक्ट न होणे आणि प्रतिष्ठेच्या मार्गावर निरंतर चालत राहणे हे कोणत्याही नको असलेल्या गोष्टींना परावृत्त करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. परंतु काही वेळा जसे आरोग्यविषयक समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्या घातक रूप धारण करू शकतात, दुर्दैवाने माझ्यासाठी ही परिस्थिती तशीच झाली आहे.

पण या प्रकरणाचाबाबत अडचण अशी आहे की, प्रसारमाध्यमांचा हे प्रकरण सोडून देण्याचा विचारचं दिसत नाही. (…आणि म्हणून दुर्लक्ष करता येणार नाही.)

ज्या प्रकरणात मी अजिबात सहभागी नाही, त्याबद्दल मी माझ्या कॅरेक्टरच्या बचावाकरिता ग्वाही द्यावी यात मला कुठलाही रस नाही.

मी या एका गलिच्छ विकृत घोटाळ्यात ओढलो गेलो आहे, ज्याची निवड मी केलेली नाही. यातील काहीही मी केलेलं नाही.

सत्य हे आहे की, माझ्यावर एकावर एक प्रश्न उचलणाऱ्या त्या महिलेशी मी माझ्या संपूर्ण आयुष्यात एकदाही भेटलो नाही. हो आम्ही सोबत काम केले, पण आम्ही कधीही व्यक्तिगतरीत्या भेटलो नाहीत. हेच सत्य आहे.

कृपया समजून घेण्याचा प्रयत्न करा, मी माझ्यावर लागलेल्या आरोपांविरोधात लढत नाहीये. किंवा माझी ‘good guy’ इमेज सांभाळण्याचा बालिश प्रकारही करत नाहीये. मला माझ्या चुकांची जाणीव आहे, शेवटी मी देखील एक माणूसच आहे.

खरं तर, मी स्वतःचे त्याहून अधिक गंभीर, संवेदनशील आणि विध्वंसक अशा गोष्टींपासून रक्षण करत आहे.

पण खूप कमी प्रसारमाध्यमे आणि सामान्य लोक सत्य जाणून घेण्यात उत्सुक आहेत, जे अतिशय वाईट आहे. यामुळे ह्या प्रकरणात मला ही एक कठोर शिकवण मिळाली आहे.

जर लोकांसाठी ते खोटं सोयीस्कर आहे, त्यामुळे त्यांच्या model of the world ला काही धोका नाही – जिथे एक मुलगी नेहमी एक पिडीत असते आणि पुरुष नेहमी आक्रमक असतो – तर असू दे, माझी काही हरकत नाही.

महिलांनी नेहमीच पुरुषांची तुच्छ वागणूक सहन केली आहे. कुठलाही पुरुष एवढा क्रूर कसा असू शकतो ह्याचा नेहेमीच मला संताप वाटत आला आहे. असे लोक नक्कीच कठोर शिक्षेचे पात्र आहेत. पण जर लॉजिक असं म्हणत असेल की एक पुरुष कधी अशक्त/पीडित असूच शकत नाही आणि एक स्त्री कधी खोटे बोलूच शकत नाही – तर असू दे. माझी त्यावर काही हरकत नाही.

सदर प्रकरणात, ७ वर्षांपासून दोन हायप्रोफाईल सिलेब्रीटींमध्ये अफेअर आहे, ज्याचा कुणालाही पत्ता नाही.

काही पुरावा नाही, कुठलेही फोटोज नाही, कुठलाही साक्षीदार नाही. एवढचं काय त्यांच्या म्हणण्यानुसार २०१४ च्या जानेवारी महिन्यात झालेल्या एंगेजमेंटसारख्या क्षणाचा एकही सेल्फी नाही. एक रोमांटिक रिलेशनशिप वाटावी असा एकही पुरावा नाही.

तरीही आपण त्या दुसऱ्या पक्षावर विश्वास ठेवून आहोत कारण ते एका मुलीने मांडलं आहे – एक मुलगी खोटं का बोलेल?

माझ्या पासपोर्ट डीटेल्स सांगतात की, जानेवारी २०१४ ला मी देशाबाहेर गेलोच नाही. ज्या तारखेला पॅरीसमध्ये ती एंगेजमेंट झाल्याचा आरोप माझ्यावर लावल्या जात आहे, ती याच महिन्यातली.

या रिलेशनशिपसंबधी जो काही एकमेव पुरावा सादर केल्या जात आहे, तो आहे फोटोशॉप केलेले एक छायाचित्र. हे लगेच दुसऱ्या दिवशी माझ्या मित्रांनी उघड केले ज्यात माझी पूर्व पत्नी देखील होती.

 

hrithik roshan kangana ranawat 02 marathipizza

 

पण याबद्दल एकही प्रश्न विचारण्यात आला नाही. कारण आपल्याला नेहमी स्त्रीचे रक्षण करण्याची शिकवण दिली जाते, जे करायलाही हवं. मी स्वतः देखील याच प्रकारे विचार करत आलो आहे. माझे पालक आणि माझ्या आयुष्यातील सर्वात अप्रतिम महिला जी नेहमी माझ्या पाठीशी उभी राहिली, जी माझी सपोर्ट सिस्टीम आहे. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. माझ्या मुलांनाही मला शिकविण्यात आलेली सर्व मुल्ये आणि प्रतिष्ठांची शिकवण देण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करेल आणि हो मी त्यांना नेहमी एका स्त्रीचा पक्ष घेण्याचीही शिकवण देईल.

असे एकूण ३००० मेल आहेत, जे एकतर मी स्वतःला पाठवलेले आहे किंवा त्या महिलेने मला पाठविले आहेत. सायबर-क्राईम विभाग लवकरच या प्रकरणाचा छडा लावेल. त्यासाठी माझे सर्व डीव्हायसेस ज्यात माझे लॅपटोप/मोबाईल हे देखील आहे, मी सायबर सेलकडे सुपूर्द केले आहे, जे अजूनही त्यांच्याकडेच आहे. पण दुसऱ्या पक्षाने असे करण्यास साफ नकार दिला. यासंबंधीचा तपास अजूनही सुरु आहे.

मी परत हे सांगू इच्छितो की हे “प्रियकरांमधील भांडण” नाही. मी विनयपूर्वक सर्वांना विनंती करतो की कृपया ह्या प्रकरणाला तसं भासवणं बंद करा आणि एका सेकंदासाठी सत्य बघण्याचा प्रयत्न करा.

माझा मागील ४ वर्षांपासून यामुळे छळ केला जातोय आणि तेही जाणून बुजून. कदाचित महिलांवरील सामाजिक पूर्वाग्रहमुळे मी स्वत:चा बचाव करण्यास असहाय होईल असे समजले गेले असावे.

मी यावर रागावलेलो नाही, मी माझ्या जीवनात क्वचितच रागावतो. एवढच काय तर मी माझ्या जीवनात कधीच कुणाशी भांडलो नाही. मग ती स्त्री असो वा पुरुष. माझ्या घटस्फोटाच्यावेळी देखील मी भांडलो नाही. मी आणि माझ्या सभोवती असणारे इतर देखील शांतताप्रिय आहेत.

मी इथे कुणावरही आरोप करत नाहीये किंवा कुणाला जज करत नाहीये. पण आता वेळ आली आहे की मी सत्याचा बचाव करावा कारण जेव्हा सत्य संकटात सापडतं, तेव्हा त्या बरोबर सामूहिक चेतनाही संकटात सापडते. सभ्यता संकटात सापडते, जवळचे लोक, कुटुंब सर्वांना क्लेश होतात. मुलांवर देखील विपरीत परिणाम होतो.

===

हृतिक ची पोस्ट इथे संपते. आता यात कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं हे तर या प्रकरणाच्या तपासातून उघड होईलच. पण यामुळे आता या वादाला एक वेगळ स्वरूप प्राप्त होईल हे नक्की.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?