' उगवत्या सूर्याचा देश ‘जपान’ बद्दल या रंजक गोष्टी तुम्ही कधीही ऐकल्या नसतील – InMarathi

उगवत्या सूर्याचा देश ‘जपान’ बद्दल या रंजक गोष्टी तुम्ही कधीही ऐकल्या नसतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

नुकतंच जपानच्या पंतप्रधानांनी आपल्या देशात येऊन मोदीजींची भेट घेऊन काही विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा केली, जपान या देशाबद्दल आपण अनेक गोष्टी ऐकत असतो

पूर्व भागातील देशांपैकी नेहमीच चर्चेत असणारा देश म्हणजे जपान होय. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात नेहमी काहीतरी क्रांतिकारी आणि उलथापालथ करणारी गोष्ट घडवून आणण्याचा मान ह्या देशाला जातो. उगवत्या सूर्याचा देश म्हणूनही जपानची ख्याती आहे.

अश्या हा जपानबद्दल आज माहित नसलेल्या काही गोष्टी जाणून घेऊया.

१) जपानच्या 98 टक्के लोकांकडे वॉटरप्रूफ मोबाइल फोन आहे. यामुळे तुम्ही येथे आंघोळ करतानाही फोनवर बोलू शकता.

२) १९१४ च्या टायटॅनिक जहाज दुर्घटनेत एक जपानी मासाबुमी होसोनो जिवंत वाचला होता. त्यांना पूर्ण आयुष्‍यभर लोकांच्या टीका ऐकाव्या लागल्या. जिवंत वाचून टायटॅनिकमधून का पळून गेला, असा प्रश्‍न जपानी विचारत होते.

३) दुस-या महायुध्‍दाच्या वेळी जपानने चीनला पूर्णपणे उद्ध्‍वस्त केले होते. येथे जपानच्या सततच्या बॉम्ब वर्षावामुळे प्लेग फैलावला होता.

४) जपानमध्‍ये काळ्या मांजरी पाळल्या जातात. काळ्या मांजरी येथे भाग्याचे लक्षण मानले जाते. यावरुन जपानी नागरीक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात असे दिसून येते.

 

japan-marathipizza01
animalcafes.com

 

५) जपानची जुनी राजधानी क्वोटो आहे. याला युनेस्कोने ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून घोषित केले आहे. क्वोटोमध्‍ये १६०० पेक्षा अधिक मंदिरे आहेत.

६) जपानमध्‍ये ३००० पेक्षा अधिक मॅक्डोनाल्ड्स रेस्टॉरंट्स आहेत. यांची संख्‍या अमेरिकेनंतर या देशात सर्वाधिक आहे. जपानमध्‍ये प्रति व्यक्ती मासे सर्वाधिक खाल्ले जातात. जपानी प्रत्येक १ कोटी ७० लाख टन मासे फस्त केली जातात. हा देश जगात सर्वाधिक सागरी खाद्यपदार्थ निर्यात करतात.

७) टोकिओचे शिंजुकू रेल्वे स्टेशन जगातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन आहे. या स्टेशनहून प्रत्येक दिवशी २० लाख लोक प्रवास करतात.

८) जगातील सर्वाधिक छोट्या स्वयंचलित शिड्या जपानमध्‍ये आहे. जपानचे कावासाकी शहरातील मूरे स्टोरमध्‍ये केवळ पाच पावलांच्या स्वयंचलित शिड्या आहेत. याची लांब केवळ ३२.८ इंच आहे.

 

japan-marathipizza02
c2.staticflickr.com

 

९) जपानी लोक सर्वाधिक आयुष्‍य जगतात. येथील पुरुषांचे सरासरी वय ८१ वर्ष असून महिलांचे ८८ आहे. हे जगात सर्वाधिक प्रमाण आहे. जपानी लोक गंभीर व विनोदी आहेत.

१०) जपानमध्‍ये एकूण ६ हजार ८०० पेक्षा जास्त बेटे आहेत. बेटांचा विचार केल्यास जपान जगातील सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे.

११) जपानची राजधानी टोकिओ लोकसंख्‍येबाबत जगातील सर्वात मोठे शहर आहे. एकट्या टोकिओ-योकोहामा मेट्रोपॉलिटन शहरात ३ कोटी ३० लाख लोक राहतात. हे शहर जगातील सर्वात महागडे शहर आहे.

१२) जपानमध्‍ये जगातील एकूण अॅनिमेटेड चित्रपटांपैकी ६० टक्के चित्रपट बनवले जातात. जगात जपान अॅनिमेशनवर आधारित चित्रपटांचा केंद्र आहे. जपानमध्‍ये १३० व्हॉईस एक्टिंग स्कूल आहे.

japan-marathipizza03jpg
goboiano.com

 

१३) जपानमध्‍ये कार्टुन्सची निर्मिती 12 व्या शतकापासून चालू आहे. येथे टॉयलेट पेपरपेक्षा जास्त कार्टुन छापण्‍यात वापरले जाते.

१४) जपानमध्‍ये पूर्ण एक बेट फक्त उंदरांनी भरलेले आहे. या बेटाचे नाव ओकुनोशिमा आहे. दुस-या महायुध्‍दाच्या वेळी या बेटावर विषारी वायूंची चाचणी करण्‍यात आली होती.

१५) जपानमध्‍ये सुमोंची कुस्ती १५०० वर्षांपासून सुरु आहे. सुमो पहिलवानांचे वजन १३५ किलोपेक्षा जास्त असते. नवीन पहिलवानांना जुने पहिलवान प्रशिक्षण देतात.

१६) जपानमध्‍ये प्रेमी जोडप्यांसाठी ‘लव्ह हॉटेल्स’ बांधले गेले आहे. यात तासांचा विचार करता पूर्ण रात्रभर रुम्स मिळतात. अशा हॉटेल्सचे बार ह्दयाच्या आकाराचे असतात.

 

love hotels

 

१७) फुजी पर्वत जपानमधील सर्वाधिक उंच शिखर आहे. यावर प्रत्येक वर्षी १० लाख जपानी चढाई करतात.

१८) जपान जगातील वाहन उद्योगाचे सर्वात मोठे केंद्र आहे. जपानी कंपनी टोयोटा जगातील तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

१९) जगातील पहिली कादंबरी जपानी भाषेत मुरासाफी शिकिबूने ११ व्या शतकात लिहिली होते. त्या कादंबरीचे नाव ‘द टेल ऑफ गेंजी’ असे होते.

२०) जपानमध्‍ये बेसबॉल सर्वाधिक आवडीचा खेळ आहे. येथे बेसबॉलला यक्यू म्हटले जाते. जपानमध्‍ये सर्वप्रथम १८७३ मध्‍ये बेसबॉल खेळला गेला होता.

 

japan-marathipizza04
japantimes.co.jp/

 

२१) नागासाकीवर जगातील पहिला अणुबॉम्ब टाकला गेला. नागासाकी व हिरोशिमावर डागलेल्या अणुबॉम्बचे नाव ‘लिटिल बॉय’ व ‘फॅट मॅन’ असे होते. हिरोशिमावर डागलेला बॉम्ब खरेतर कुमामोटोवर टाकले जाणार होते. मात्र त्यावेळी कुमामोटो शहर ढगांनी झाकले गेले होते आणि बॉम्ब चुकून हिरोशिमावर टाकले गेले.

२२) सन्मानजनक आत्महत्येसाठी येथे हराकिरी शब्द वापरला जात होता. हराकिरी एक युध्‍दनीती वापरुन पराभव होत. कारण जपानमध्‍ये पराभवाचा अर्थ आहे मृत्यू.

२३) जपानी राजघराण्‍याचा इतिहास २,००० वर्ष जूना आहे. जगात इतके दीर्घकाळ कोणत्याही राजघराणे सत्ते नव्हते. जपानच्या पहिल्या महाराजाचे नाव जिम्मू तेन्नो असे होते.

२४)  जपानमध्‍ये मोठ्या इमारतींना चौथा मजला नसतो. जपानमध्‍ये तिस-या मजल्यानंतर पाचवा मजला येतो. येथे ४ अंकाचा प्रयोग केला जात नाही. जपानमध्‍ये ४ अंक अशुभ किंवा मृत्यूशी जोडले असल्याचे मानले जाते.

 

6japan-marathipizza01
tofugu.com

काय? आहे कि नाही जपान एक भन्नाट देश!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?