' द्रौपदी वस्त्रहरण वरील जाहिरातीमुळे Myntra अडचणीत – InMarathi

द्रौपदी वस्त्रहरण वरील जाहिरातीमुळे Myntra अडचणीत

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

धार्मिक भावना हा एक नाजूक विषय आहे. त्यात ट्विटर, फेसबुक सारख्या सोशल नेटवर्किंग साईट्सच्या जमान्यात धार्मिक भावना दुखावल्या जाणं एकदम ‘viral’ होऊन जातं आणि त्याचा फटका मोठाल्या उद्योगांना बसतो.

सध्या हाच धडा scrolldroll आणि Myntra शिकत आहेत.

झालं असं की srolldroll ह्या creative agency ने myntra च्या जाहिरातींसाठी हिंदू देवी देवतांच्या आधारावर एक campaign बनवलं. परंतु त्यात अनेक गोष्टी आक्षेपार्ह होत्या आणि त्यावरून ट्विटरवर भडका उडाला.

 

ह्या चित्रात असं दर्शवलंय की द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना, भगवान श्रीकृष्ण myntra च्या मोबाईल app वर द्रौपदीसाठी “extra long sarees” म्हणजेच “खूप लांब साडी” शोधत आहेत.

 

असेच इतरही काही चित्र आहेत :

हे असं काही बघून, अर्थातच, लोक चिडले आणि ट्विटर वर #BoycottMyntra हा hashtag ट्रेंड व्हायला लागला.

ह्यात गंमत ही आहे की हे creatives स्वतः myntra ने तयार केले नाहीयेत. हे त्यांच्या जाहिरातीसाठी त्यांनी scrolldroll कडून करवून घेतले आहेत. त्यामुळे त्यांनी हात वर केले! —

 

 

 

 

 

आता इथे myntra सरळ कायदेशीर तक्रार करण्याबद्दल बोलत आहे, पण हे स्पष्टच आहे की scrolldroll काही स्वतःहून कुणाची अशी जाहिरात करणार नाही!

अर्थात, scrolldroll तर्फेसुद्धा दिलगिरी व्यक्त केली गेली आहेच –

 

पण लोक अश्याने थांबणारे नाहीत…त्यांनी आपला राग myntra चं app काढून टाकून आणि android play store वर रेटिंग खराब देऊन व्यक्त केलाच.

 

 

 

 

 

https://twitter.com/ModiiBHAKT/status/768990982075396096

 

 

 

एका भाजपच्या संयोजकाने तर Myntra ला कायदेशीर नोटीससुद्धा पाठवली आहे :

 

ह्याला कुणी असहिष्णुता म्हणेल तर कुणी भावनिक प्रक्षोभ.

पण जसं एका ट्विटर युजरने अगदी योग्य म्हटलंय, क्षणभर आपण धार्मिक भावना बाजूला ठेऊल्या तरी ही जाहिरात फार चांगली नाहीच.

एका महिलेचं वस्त्रहरण होत असताना कुणी मोबाईलवर साडी शोधतोय – हा विनोद देखील अयोग्य नाही का?

विनोद कसला, हा तर मूर्खपणाचा कळसच!

 

असे विनोद करताना आपण महिलेच्या विनयभंगाचा विषय विनोदी करत आहोत, ह्याचं भान तरी ठेवायला हवं.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा:InMarathi.com. तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi । Copyright (c) 2017 मराठी pizza. All rights reserved.

Omkar Dabhadkar

Founder@ इनमराठी.कॉम

omkar has 167 posts and counting.See all posts by omkar

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?